|
|
|
|
|
- ‘ठाकरे जोडो अभियान’ फ्लॉप
राज भेटलेच नाहीत, तर उद्धव म्हणाले.. शिवसेनेला कोणाची गरज नाही मुंबई, ५ सप्टेंबर / खास प्रतिनिधीमराठी माणसांच्या हितासाठी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे म्हणून ‘ठाकरे जोडो’ अभियानांतर्गत ‘माझी चळवळ, मी महाराष्ट्राचा’ या अभिनव चळवळीच्या वतीने आज उभयतांच्या निवासस्थावार मूकमोर्चा काढण्यात आला असता मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे घरीच नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. ‘मातोश्री’वर मोर्चा गेला असता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ...
- ठाण्यात जखमी गोविंदाचा मृत्यू
ठाणे, ५ सप्टेंबर/प्रतिनिधीदहीहंडी फोडताना छातीला मुका मार लागून, जखमी झालेला ठाण्याच्या ओमसाई मित्रमंडळ या संस्थेतील गोिवदा किशोर कांबळे (२०) या तरुणाचे आज सकाळी निधन झाले.ओमसाई मित्रमंडळातर्फे ठाण्यातील शास्त्रीनगर, यशोधननगर आणि सावरकरनगर या भागात लावलेल्या दहिहंडय़ा फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यात ज्ञानेश्वरनगरमधील संत रोहिदास चाळीतील राहणारा किशोर चौथ्या थरापर्यंत चढला होता. या प्रयत्नात तो चौथ्या थरावरून खाली पडला.
- ‘फिक्सिंग’ वर्ल्डच्या वृत्तांच्या ओव्हर सुरूच!
लंडन/कराची, ५ सप्टेंबर / वृत्तसंस्थापाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर स्पॉट फिक्सिंगचे आरोप झाल्यापासून फिक्सिंगविषयीच्या वृत्तांचा पाऊस सर्वत्र पडू लागला आहे. ब्रिटनच्या न्यूज ऑफ द वर्ल्ड या वर्तमानपत्राने बुकी माजिदचे स्टींग ऑपरेशन केल्यानंतर आज पुन्हा याच वर्तमानपत्राने पाकिस्तानचा सलामीवीर यासिर हमिदची मुलाखत प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात नव्या चर्चा रंगल्या, प्रतिक्रिया उमटल्या.
- शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
रविवार, ५ सप्टेंबर २०१०विजयाचा उन्माद पचविण्यासाठी पराभवाचे अश्रू गिळण्यासाठी कधीतरी, अंधाऱ्या वाटेला प्रकाश म्हणून कधीतरी, निराशेतही तगणारी आच म्हणून आजी-आजोबा आई-बाबा मित्र-मैत्रीण सखा-सहचारी सगळेच जेव्हा बोटभर कमी पडतात तेव्हा तुम्हीच असता पाठीवर हात ठेवून ‘लढ’ म्हणण्यासाठी तुमचा हात सदैव पाठीवर असू द्या मग मी कधीच ‘पाठी’ राहणार नाही! | | या सदरातील आणखी बातम्या... |
|
|
|
- नागपूरकरांनी अनुभवला सलमानचा उद्धटपणा
नागपूर, ५ सप्टेंबर / प्रतिनिधीकाळवीटांची शिकार असो की, मुंबईच्या पत्रकारांवर हल्ला असो अभिनेता सलमान खान सातत्याने त्याच्या उद्धट वागणुकीमुळे वादग्रस्त ठरला असून अशीच उद्धट वागणूक नागपूरकरांनी आजच्या पत्रकार परिषदेत अनुभवली. आगामी ‘दबंग’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान खान नागपुरात आला असता त्याने ‘दबंगगिरी’चेच दर्शन घडविले.अरबाझ खान व अभिनव सिंह कश्यप प्रस्तुत आगामी ‘दबंग’ चित्रपटात सलमान खान यांची प्रमुख भूमिका आहे.
- संगमेश्वर बसस्थानक कात टाकतेय
संगमेश्वर, ५ सप्टेंबर/ वार्ताहरराज्य परिवहन मंडळाची बसस्थानके म्हणजे असुविधांचे आगार असे म्हटले जाते. बसची सुविधा प्रवास कंटाळवाणा करणारी असल्याची टीका सातत्याने होते. मात्र आता राज्य परिवहन मंडळही नवा साज लेवून स्पर्धेत उतरले असून, कारभारात परिवर्तन झाल्याची साक्ष, प्रथम नव्या परिवर्तन बसनी प्रवाशांना दिलेली असतानाच आता बसस्थानके ऑनलाईन आरक्षण सुविधेने सज्ज होत आहेत. रत्नागिरीचे विभाग नियंत्रक सुहास जाधव हे तत्परतेने जिल्ह्यातील ...
- पश्चिम घाट वाचविण्यासाठी १४ सदस्यीय अभ्यास समिती
- जंगली प्राण्यांमुळे शेतकरी हैराण
| | या सदरातील आणखी बातम्या... |
|
|
|
- पाकिस्तानातील पुराचे खापर भारतावर
पाकिस्तानी नद्यांमध्ये भारताने पाणी सोडल्याचा हाफिझ महम्मद सईदचा आरोप लाहोर ५ सप्टेंबर/पीटीआयभारताने पाकिस्तानी नद्यांमध्ये पाणी सोडल्याने पूरस्थिती बिकट होत गेली असा आरोप मुंबई हल्ल्यातील सूत्रधार व जमात उद दावाचा प्रमुख हाफिझ महंमद सईद याने केला आहे. जमात उद दावाच्या जामिया मसजिद अल कदसिया या मुख्यालयात काल झालेल्या एका कार्यक्रमात त्याने सांगितले की, व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय करीत असलेल्या अत्याचारांबाबत पाकिस्तानी ...
- नांदेडमध्ये शिक्षक पुरस्कार वितरणावेळी घडलेली घटना
मुख्यमंत्र्यांमोर शिक्षकाचा आत्मदहनाचा प्रयत्न नांदेड, ५ सप्टेंबर/वार्ताहरशाळा न्यायाधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी पोलिसांचे सुरक्षाकवच सहजपणे भेदून मुख्यमंत्र्यांच्या जाहीर कार्यक्रमात स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशोक गीते या प्राथमिक शिक्षकास पोलिसांनी अटक केली. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या या प्रकाराने सुरक्षिततेतील अनागोंदी समोर आली आहे. नांदेडमध्ये आज ...
- पी. टी. उषाला लुकाकडून ‘गुरुदक्षिणा’
- ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
| | या सदरातील आणखी बातम्या... |
|
|
|
- फेडरर, सॉडर्लिग चौथ्या फेरीत
न्यूयॉर्क, ५ सप्टेंबर / वृत्तसंस्थाजागतिक टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेला स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर, रॉबिन सॉडर्लिग व नोव्हाक जोकव्हिच यांनी आपापल्या प्रतिस्पध्र्यावर मात करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला. महिला विभागात सातवे मानांकन असलेली व्हेरा झोनारेव्हा, ११ वे मानांकन असलेली स्वेतलाना कझन्सोव्हा, १४ वे मानांकन असलेली मारिया शारापोव्हा या रशियन टेनिसपटूंसह अव्वल मानांकित डेन्मार्कची ...
- फिक्सिंगसंदर्भात आयसीसी नेमणार स्वतंत्र आयुक्त
न्यूयॉर्क, ५ सप्टेंबर / पीटीआयसलमान बट्ट, मोहम्मद आसिफ व मोहम्मद आमिर या खेळाडूंना आयसीसीने अद्याप कोणतीही शिक्षा केलेली नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करताना या प्रकरणी एक स्वतंत्र आयुक्ताची नेमणूक करण्यात येईल आणि खेळाडू त्यांच्यासमोर आपली बाजू मांडू शकतील. या आयोगापुढे खेळाडूंनी आपले म्हणणे मांडल्यानंतर हे आयुक्त ज्या शिफारशी करतील, त्यानुसार खेळाडूंवर कारवाई केली जाईल. आयसीसीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही माहिती दिली.
- तरुण खेळाडू बुकींचे लक्ष्य - निल्सन
- प्रत्येक सामना सहकाऱ्यांकडून ‘फिक्स’
| | या सदरातील आणखी बातम्या... |
|
लोकरंग
‘चिनी ज्यादा’ !
अनिकेत साठे - रविवार, ५ सप्टेंबर २०१० ( \n sathe.aniket@gmail.com This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it )
पाकव्याप्त काश्मीरच्या गिलगिट-बाल्टिस्तान परिसरात चिनी लष्कराच्या मुक्त संचारामुळे भारताची चिंता वाढली असून त्यामागे ‘ड्रॅगन’ची नेमकी काय चाल आहे, असा प्रश्न होतो. त्याचे उत्तर शोधताना हा विषय केवळ गिलगिटपुरताच मर्यादित नाही, तर त्याला विविध स्वरूपाचे कंगोरे असल्याचे लक्षात येते. अमेरिकेला डोळ्यासमोर ठेवून संरक्षण क्षेत्रात अफाट गुंतवणूक करणारा चीन सध्या जी पावले टाकतो आहे, त्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भारतालाही गर्भित इशारा देण्याचा भाग आहे. |
दिनदर्शिका
दि. ६ सप्टेंबर २०१०. सोमवार, मिती श्रावण वद्य त्रयोदशी २३ क. ३७ मि.पर्यंत पुष्य नक्षत्र ८ क. ३७ मि.पर्यंत कर्क चंद्र. २९ क. ५५ मि.पर्यंत. सूर्योदय-६/२६, सूर्यास्त- ६/४८. सोम प्रदोष. मेष- चर्चा बैठकीत सूर लागेल. वृषभ- पेचप्रसंग सुटतील. मिथुन- शुभवार्ता समजतील. कर्क- कराल ती पूर्व. सिंह- घाईगर्दीत कृती नको. कन्या- महत्त्वाची माणसे भेटतील. तूळ- अभिनव प्रयोग यश देतील. वृश्चिक- नवे परिचय वाढतील. धनू- अवघड जबाबदाऱ्या टाळा. मकर- झटपट कृती आवश्यक. कुंभ- अडचणी वाढतील सांभाळा. मीन- आरोग्यावर लक्ष ठेवा. शुभराशी : मेष / मिथुन / कर्क.
|