कारमधील इंजिन बेअिरग झिजले आहे. त्यामुळे काही अडचण येऊ शकते काय?
 निर्मल जगताप, वाडा
बेअिरगची झीज होण्याची बरीच कारणे असू शकतात. ऑइलचा पुरवठा कमी झाला असेल किंवा बेअिरग बनवताना वापरले गेलेले मटेरियल योग्य नसेल. रिपेअिरग करताना अयोग्य पद्धतीने हाताळणी झाली असल्यास त्यामुळेही बेअिरगला धोका पोहोचू शकतो. म्हणून बेअिरग योग्य त्याच साइझची असावी, तिचे ल्युब्रिकेशन योग्य असावे. हाताळताना कुशल मेकॅनिकनेच हाताळावे. जर बेअिरग झिजले असेल तर इंजिन कार्यरत असताना निर्माण होणारे व्हायब्रेशन, घर्षण यांचा इफेक्ट वाढतो आणि ब्रेकडाऊन होऊ शकतो.

इंजिनमधून येणारा आवाज कसा कमी करता येईल ? सायलेन्सरविषयी उपाय सांगा.
 देवेंद्र पाटील, सैंदाणे
इंजिनमधून धूर वेगाने बाहेर फेकला जातो. हा धूर बाहेर पडताना मोठा आवाज होतो आणि त्याचे तापमान खूपच जास्त असते. जर सायलेन्सरमधून हा वायू पाठवला तर तापामान व त्याचा आवाज कमी होतो, पर्यायाने ध्वनिप्रदूषण कमी होते. आणि धुरामुळे निर्माण झालेले प्रेशरसुद्धा कमी होते. सायलेन्सरचे तीन भाग होतात एक्झॉस्ट पाइप, मफलर  किंवा टेल पाइप यांना तडा गेला असेल तर धुराची गळती होऊन आवाज येतो. त्याला लवकर रिपेअर करता येते, पण एक्झॉस्ट पाइप लीकेज असेल तर ते चटकन लक्षात येत नाही. व सायलेन्सर ब्रेक होऊ शकते. म्हणून वेळीच उपाययोजना करावी.

बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी काय उपाय करता येईल.  
सुनील दोंदे, चांदवड
कारमध्ये लेड अ‍ॅसिड बॅटरी वापराव्या लागतात ज्यामध्ये विद्युत ऊर्जा साठवली जाते आणि गरज लागेल तशी ऊर्जा वापरात आणली जाते. यात बॅटरीमध्ये असलेल्या इलेक्ट्रोलाइटची (द्रव) विशिष्ट ग्रॅव्हिटी कमी असेल तर बॅटरीची क्षमता कमी होते. बॅटरीकडून उच्च प्रमाणात करंट घेऊन वापरणे किंवा चार्ज करताना हाय रेटने चार्ज करणे तसेच द्रवामध्ये बुडलेल्या प्लेट्स कालांतराने वाकतात ही कारणे बॅटरी लवकर डिस्चार्ज होण्याला कारणीभूत ठरतात. यावर उपाय म्हणजे प्लेट्स योग्य उंचीपर्यंत बुडालेल्या असाव्यात. द्रवाची (इलेक्ट्रोलाइट) विशिष्ट ग्रॅव्हिटी प्रमाणबद्ध असावी. गरज असल्यास ते बदलावे. प्लेट्स वाकल्या असतील तर त्या बदलाव्या. बॅटरीवर लोड देऊन हाय रेटने करन्ट घेऊ नये व लो रेटने जास्तीतजास्त वेळ चार्ज होऊ द्यावी. बॅटरीत साधे पाणी अजिबात भरू नये. त्यामुळे द्रवाचे कॉन्सन्ट्रेशन कमी होते.