रेनॉ या फ्रेंच मोटार उत्पादक कंपनीला भारतीयांच्या मनात मानाचे स्थान खऱ्या अर्थाने मिळवून दिले ते डस्टर या गाडीने. साधारण तीनेक वर्षांपूर्वी भारतीय रस्त्यांवर उतरलेल्या या गाडीने मोटार बाजारात बराच धुरळा उडवला. रांगडा अवतार असलेल्या डस्टरने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. मात्र, टू व्हील ड्राइव्ह असल्याने ती ऑन रोडच चांगली धावत होती. ऑफ रोड ड्रायव्हिंगची हौस असणाऱ्यांचा त्यामुळे हिरमोड झाला होता. परंतु आता रेनॉने डस्टरचे ऑल व्हील ड्राइव्ह (एडब्ल्यूडी) मॉडेल बाजारात आणून ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठी एक चांगला, तगडा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ऑफ रोड गाडय़ांमध्ये मक्तेदारी असलेल्यांच्या उरात डस्टरच्या या मास्टर स्ट्रोकने धडकी भरवली आहे, यात शंकाच नाही.
रेनॉची डस्टर आता ऑल व्हील ड्राइव्ह झाली आहे, म्हणजे नक्की काय हे पाहू या. साधारणत: गाडय़ांचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे टू व्हील ड्राइव्ह आणि दुसरा म्हणजे फोर व्हील ड्राइव्ह. टू व्हील ड्राइव्ह प्रकाराच्या गाडय़ांमध्ये इंजिनाची शक्ती फक्त पुढील किंवा मागील दोन चाकांनाच दिलेली असते. त्या बळावर इतर दोन चाकांचे संचलन होत असते. फोर व्हील अर्थात ऑल व्हील ड्राइव्ह प्रकारातील गाडय़ांच्या इंजिनाची ताकद ही चारही चाकांना संचलित करत असते. त्यामुळे या गाडय़ा खडकाळ जमिनीवरून, निसरडय़ा जागांवरून, चिखल, पाणी, जंगलातील वाटा, उंच डोंगरातील कठीण वाटा, कच्चे रस्ते आदी ठिकाणी अगदी सहजपणे चालवता येऊ शकतात.

डस्टर एडब्ल्यूडीचे बाह्य़रूप
नव्या डस्टर एडब्ल्यूडीच्या बाह्य़रूपात फारसा बदल करण्यात आलेला नाही. मात्र, असे असले तरी डस्टरच्या नावापुढील एडब्ल्यूडी हा शब्द वगळता नवीन गडद राखाडी रंगातील अँथ्रासाइट अ‍ॅलॉय व्हील्स, हेडलाइटमागील काळी छटा आणि काळ्या रंगातील बी-पिलर्स हे बदल ठळकपणे जाणवतात.

19
अंतर्गत रचना

गाडीचा दरवाजा उघडताच एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे डॅशबोर्डच्या रंगसंगतीत करण्यात आलेले बदल. डस्टर टू व्हील ड्राइव्हचा डॅशबोर्ड काळ्या किंवा बेइज या रंगाचा होता, तर नव्या एडब्ल्यूडीचा डॅशबोर्ड काळ्या आणि करडय़ा अशा दुहेरी रंगसंगतीने तयार करण्यात आला आहे. डॅशबोर्डसाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक हे सॉफ्ट टच आहे. स्टीअरिंगच्या संरचनेतही बदल करण्यात आला असून, त्याला मुलायम लेदरचे आवरण चढवण्यात आले आहे. मल्टीफंक्शनल असे हे स्टीअरिंग असून ते चालकाच्या सोयीनुसार वर-खाली करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. नव्याने रचना करण्यात आलेल्या इन्स्ट्रमेंट क्लस्टरमधील मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्लेवर किती लिटर डिझेल वापरले गेले, सरासरी व वास्तविक डिझेलचा वापर, शिल्लक इंधनाच्या आधारे गाडी आणखी किती अंतर कापू शकेल याची माहिती, ओडोमीटर, एका ट्रीपमधील सरासरी वेग, बाहेरील तापमान इत्यादी सर्व माहिती समजते. हेडलाइट आणि वायपल स्टॉक्स यांची नव्याने रचना करण्यात आली आहे. वन टच लेन चेंज ही एक नवीन सुविधा अंतर्गत रचनेत देण्यात आली आहे. फक्त एकच त्रुटी आढळते, आणि ती म्हणजे दरवाजाच्या काचेला वन टच डाऊन बटनाची नसलेली सुविधा. त्याऐवजी स्पीड सेन्सिंग ऑटो लॉक डोअरची सुविधा मात्र नवी आहे. गाडीतील आसनव्यवस्था अतिशय आरामदायी असून त्यावर गडद रंगाचा वापर करण्यात आल्याने त्यांची स्वच्छता करणेही सोपे झाले आहे. आसनांना सपोर्ट सिस्टीम देण्यात आल्याने बसणाऱ्याच्या पाठीला योग्य आधार मिळतो.

मनोरंजन
मनोरंजनासाठी डस्टर एडब्ल्यूडीमध्ये मीडिया एनएव्ही ही टच स्क्रीन सिस्टीम सुविधा देण्यात आली आहे. याचा टच हा प्रतिबंधक असला तरी टचस्क्रीनला स्पर्श केल्यावर मिळणारा प्रतिसाद उत्तम प्रकारचा आहे. 21स्क्रीनवरील बनट आणि स्क्रीनटा इंटरफेस मोठा असल्याने गाडी चालवताना व खडबडीत रस्त्यांवरून जाताना तो वापरणे अगदी सुलभ आहे. काळोखात स्क्रीनच्या प्रकाशाचा त्रास होऊ नये म्हणून त्यात डार्क मोडची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रकाशमान स्क्रीनचा प्रकाश काही प्रमाणात कमी करता येतो व डोळ्यांना त्रास होत नाही. या सिस्टीममध्ये यूएसबी ऑक्झिनबरोबरच ब्लू-टूथची सेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, सीडी प्लेअर देण्यात आलेला नाही. जुन्या डस्टर टू व्हील ड्राइव्हमध्ये ही सुविधा होती, हे विशेष. स्पीकर्सची साऊंड क्वालिटीही उत्तम आहे. स्पीकर्सचा आवाज ३० डेसिबलपेक्षा जास्त नाही. परंतु २३ डेसिबलनंतर स्पीकर्सच्या आवाजाचा दर्जा थोडा खालवायला लागतो, हे येथे आवर्जून नमूद करावेसे वाटते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम अर्थात जीपीएस ही सुविधाही एडब्ल्यूडीमध्ये आहे. यात इन्फोटेन्मेंट सिस्टीमची स्क्रीन मोठी असूनही रिअर पार्किंग सेन्सर हे फक्त ध्वनी स्वरूपाचेच आहेत. रिअर पार्किंग कॅमेरा मात्र एडब्ल्यूडीमध्ये नाही. खरे तर रेनॉला अशी सुविधा देण्यास काहीच हरकत नव्हती.

साठवण क्षमता
डस्टर टू व्हील ड्राइव्हच्या तुलनेत एडब्ल्यूडीमध्ये सामान साठवण क्षमता ४१० लिटर एवढी आहे. ही क्षमता किंचित कमी आहे. कारण मागील चाकांमध्ये मल्टीलिंक विथ कॉइल स्प्रिंग सस्पेन्शन हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे आणि जास्तीचे राखीव चाकही गाडीच्या आतच बसवण्यात आले आहे. गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्सही २१० मिमी इतका आहे.

फ्युएल एफिशियन्स
रेनॉच्या दाव्यानुसार एडब्ल्यूडी एक लिटर डिझेलला १९.७२ किमी एवढा मायलेज देते. मात्र, प्रत्यक्षात 20गाडीचा अ‍ॅव्हरेज १५ ते १६ किमी प्रतिलिटर (हमरस्ता किंवा साध्या रस्त्यावर) असा आहे. मात्र, ऑफ रोडला गाडीचा अ‍ॅव्हरेज साधारणत: ११ ते १२ किमी प्रतिलिटर एवढाच आहे.

इंजिन व इतर तांत्रिक बाबी
डस्टर एडब्ल्यूडीमध्ये दीड लिटर क्षमतेचे ११० पीएसचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. परंतु डस्टर टूडब्ल्यूडीप्रमाणे यात ८५ पीएस इंजिन देण्यात आलेले नाही. दोन्ही प्रकारच्या गाडय़ांमध्ये एकाच प्रकारचे डिझेल इंजिन देण्यात आले असले, तरी त्यात खालील बदल करण्यात आलेले आहेत.

एडब्ल्यूडी :
१०९ पीएस @ ४००० आरपीएम,
२४५ एनएम टॉर्क @ १७५० आरपीएम
टूडब्ल्यूडी :
१०९ पीएस @ ३९०० आरपीएम,
२४८ एनएम टॉर्क @ २२५० आरपीएम

डस्टर एडब्ल्यूडीमध्ये टॉर्क व आरपीएम कमी करण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याची ऑफ रोडिंगची क्षमता हे होय. त्याचबरोबर एडब्ल्यूडीमध्ये शॉर्टर गीअर रेशो देण्यात आले आहेत. डस्टर टूडब्ल्यूडीमध्ये प्रकर्षांने जाणवून येणारा टबरेलॅग हा डस्टर एडब्ल्यूडीमध्ये नाहीसा करण्यात रेनॉच्या इंजिनीअर्सना यश आले आहे. त्याचबरोबर पूर्वीपेक्षा जास्त हलक्या क्लचमुळे शहरात तसेच डोंगराळ भागात गाडी हाताळणे अधिक चांगल्या प्रकारे शक्य झाले आहे. गाडीला इलेक्ट्रो हायड्रॉलिक पॉवर स्टीअरिंग देण्यात आले आहे. जे पार्किंग स्पीडला थोडे जड जाणवते. मात्र, वेग जसजसा वाढतो तसतसे ते उपयुक्त वाटायला लागते.

ट्रान्समिशन ऑल व्हील ड्राइव्ह
गीअर बॉक्स : सहा स्पीड मॅन्युअल
डायमेन्शन : लांबी : ४३१५ मिमी
रुंदी : १८२२ मिमी
उंची : १६९५ मिमी
व्हील बेस : २६७३ मिमी
ग्राऊंड क्लिअरन्स : २१० मिमी

सस्पेन्शन
पुढील बाजूस : मॅकफर्सन स्टट्र विथ कॉइल स्प्रिंग्ज व स्टॅबिलायझर बार
मागील बाजूस : मल्टीलिंक विथ कॉइल स्प्रिंग्ज

ब्रेक
पुढील बाजूला व्हेंटिलेटेड डिस्क व मागील बाजूस ड्रम ब्रेक

सुरक्षा
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, अँटिस्लीप रेग्युलेटर, अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन, क्रूझ कंट्रोल, मॅक्झिमम स्पीड लिमिटर.
याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिकदृष्टय़ा नियंत्रित तीन ड्रायव्हिंग मोडही एडब्ल्यूडीमध्ये देण्यात आले आहेत. एडब्ल्यूडी लॉकमध्ये इंजिनाची ताकद चारही चाकांना संचलित करत असल्याने वेग ५० किमी प्रतितासापेक्षा जास्त होताच गाडी आपोआप टूडब्ल्यूडी मोडमध्ये जाते.

या रंगांत उपलब्ध
पांढरा, काळा, ब्राऊन, ग्रे, सिल्व्हर, अ‍ॅमेझॉन ग्रीन

मिडलेव्हल मॉडेल :
११.८९ लाख रुपये
(एक्स शोरूम)
टॉपलेव्हल मॉडेल :
१२.९९ लाख रुपये
(एक्स शोरूम)