27वेगो आणि ज्युपिटरच्या यशानंतर टीव्हीएसने आता झेस्ट ही ११० सीसीची स्कूटी आणली आहे. ही स्कूटी मात्र वेगो आणि ज्युपिटरची आणखी थोडी सुधारित आवृत्ती आहे. खडबडीत आणि गुळगुळीत रस्त्यावर म्हणजेच ऑफ आणि ऑन रोड ही गाडी भन्नाट पळते. अगदी ९० ते १००च्या स्पीडने नेली तरी आपण स्कूटीवर बसलो आहोत, असे कुठेही जाणवत नाही..

tvsखास कॉलेज गोइंग मुलींसाठी किंवा महिलावर्गासाठी म्हणून खास तयार करण्यात आलेली स्कूटी भारतीय बाजारात आणण्याचे श्रेय जाते टीव्हीएस मोटर्सला. हा काळ होता १९९६चा. म्हणजे आíथक उदारीकरण वगरे होऊन फार तर पाचच र्वष झाली होती. बाइक, स्कूटर हा पुरुषांचाच प्रांत आहे, बाईमाणसाचं ते काम नाही, असा तो काळ. नेमक्या याच काळात खास महिलावर्गाला डोळ्यांसमोर ठेवून टीव्हीएसने स्कूटी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. भारतीय ग्राहकांना तो कितपत रुचेल याबाबत वाहननिर्मिती क्षेत्रात उत्सुकता होतीच. मात्र, स्कूटीला तुफान लोकप्रियता मिळाली. आणि बघता बघता गेल्या १८-१९ वर्षांत स्कूटीच्या अनेकानेक नवनवीन आवृत्त्या बाजारात आल्या. त्यातली अगदी अलीकडची म्हणजे स्कूटी झेस्ट ११०सीसी.
अर्थात महिलावर्गाला डोळ्यांसमोर ठेवून स्कूटीची निर्मिती करण्यात आली असली तरी ती फक्त महिलांनीच चालवावी, असा काही नियम नाही. झेस्टकडे पाहून तर नाहीच असं वाटणार. फ्रेश स्टाइल, चांगलं रुपडं, आकर्षक रंगसंगती, पुढे पाय ठेवायला भरपूर स्पेसबरोबरच गरजेनुसार वापरता येऊ शकणारं कॅरियर, मागच्याला बसायला कम्फर्ट वाटेल अशी आसनव्यवस्था असा सगळा जामानिमा असलेल्या झेस्टच्या प्रेमात न पडलो तरच नवल. आणि एवढं सारं असताना वजनाला हलकी असली तरी पळायला उत्तम अशी ही गाडी आहे. (कंपनीच्या दाव्यानुसार) साधारणत: एका लिटरला ६० किमीचा अ‍ॅव्हरेज झेस्टला सहज मिळू शकतो. शिवाय किक स्टार्टबरोबरच बटण स्टार्टची सुविधा आहे, आणि एका सेकंदात ० ते ४० किमी प्रतिलिटर एवढा वेग घेऊ शकते ही गाडी. साधारण वेगात चालवली तर २० ते ५० किमीचे अंतर अगदी आरामात कापू शकते आणि जरा वेग वाढवला तर ताशी ९० किमी वेगाने पळू शकते, झेस्ट.
23आपल्या गाडीला किती मायलेज मिळतो आहे, हे दर्शवणारी इकॉनॉमीटर पट्टिका आहे. शिवाय ओडोमीटर, स्पीडोमीटर व फ्युएल गॉज (इंधनटाकीत किती इंधन शिल्लक आहे ते दर्शवणारी व्यवस्था) ही नेहमीची यंत्रणा आहेच. आपण अनेकदा घाईगर्दीत गाडी साइडस्टॅण्डला लावत असतो. मात्र, गाडी स्टार्ट करतो त्या वेळी अनेक जण हा साइडस्टॅण्ड काढायला विसरतात. हे असे होऊ नये यासाठी टीव्हीएसने स्कूटी झेस्टमध्ये साइडस्टॅण्ड इंडिकेटर ही एक नवीन प्रणाली बसवली आहे. तुम्ही गाडी सुरू करता आणि साइडस्टॅण्ड तसाच ठेवत असाल तर ठरावीक वेळेने हा इंडिकेटर वाजायला लागतो व आपल्याला साइडस्टॅण्ड वर करण्याची आठवण करून देतो. तसेच गाडी प्रदीर्घ काळ नुसती उभी करून ठेवण्यात आली असेल तर गाडीला आयडल इंडिकेटर देण्यात आला आहे, तो अशा परिस्थितीत चालू राहतो. म्हणजे गाडी किती वेळ उभी होती, याची माहिती प्राप्त होते. स्कूटीसारख्या इतर गाडय़ांचे मेनस्टॅण्ड म्हणजे डोकेदुखी असते. ते सहजासहजी पायाला लागत नाही, शिवाय गाडी मेनस्टॅण्डला लावण्यासाठी खूप ताकद लावावी लागते. मात्र, स्कूटी झेस्टमध्ये तसे नाही. गाडी सहजपणे मेनस्टॅण्डला लागू शकेल, अशी व्यवस्था करून देण्यात आलेली आहे.
गाडीचे सर्व लाइट्स एलईडी स्वरूपातील आहेत. पुढच्या बाजूला स्टोअरेजसाठी जागा देण्यात आली आहे. मात्र, ते गरजेनुसार काढून ठेवता येऊ शकते. गाडीच्या सीटखाली १९ लिटर क्षमतेची साठवण जागा आहे. त्यात आपली हेल्मेटही आरामात बसू शकते. चालकाला बसताना त्रास होऊ नये यासाठी खास आसनपद्धती देण्यात आली आहे. मागच्यालाही आरामदायी वाटावे यासाठी खाली दोन फूटस्टेप्स देण्यात आल्या आहेत. एकंदर गाडीची रचना आणि रंगरूप चांगले आहे. तसेच चालकाच्या सीटच्या खाली एक हूकही देण्यात आले आहे, जे की जास्तीच्या सामानासाठी उपयुक्त ठरू शकते.

24इंजिन क्षमता
वेगो आणि ज्युपिटरसारखेच झेस्टचेही इंजिन (नेक्स्ट जनरेशन सीव्हीटीआय ११० सीसी) आहे. फोर स्ट्रोक, १०९.७ सीसीचे सिंगल सििलडर, एअर-कूल्ड आणि काब्र्युरेटेड इंजिन असून त्याची कमाल क्षमता ७.९ बीएचपी आहे. कमाल टॉर्क आऊटपुट ०.८९ किग्रॅ असून साडेपाच हजारांचा आरपीएम आहे. गाडी कोणत्याही परिस्थितीत लगेचच सुरू व्हावी यासाठी ऑटो चोक सिस्टीम देण्यात आली आहे. गाडीचे एकूण वजन ९७ किलो आहे. गाडीला ड्रम ब्रेक आहेत. टय़ूबलेस टायर प्रकारात उपलब्ध.

28