माझ्याकडे डिकॉर टाटा इंडिगो आहे. मी २००७ ही सेकण्ड हॅण्ड गाडी एक लाख ३१ हजार रुपयांना घेतली, पण सगळ्यांचे म्हणणे पडले की डिकॉरच्या इंजिनला प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे खर्च वाढतो. डिकॉरचे इंजिन कसे आहे, ते सांगून मला मदत करावी. – महेश दायमा

45होय, डिकॉर इंजिन खूप मेन्टेनन्स खाणारे इंजिन आहे. बहुतेकदा त्याचे इंजेक्टर बदलावे लागतात. इंजिन आवाजही खूप करते. टायिमग बेल्ट व्हायब्रेट होऊन झिजतो. पिस्टन सििलडर व्हायब्रेशनमुळे खराब होते. इंजिन थडथडते. तसेच मायलेजही आठ-नऊ किमी प्रतिलिटर एवढेच आहे. वॉल्व्ह टायिमगकडे सारखे लक्ष द्यावे लागते. त्यामुळे खूप काळा धूर येतो. हे इंजिन खूप डिझेल पिणारेही आहे. यावर उपाय एकच, तुम्ही वेळच्या वेळी इंजेक्टर स्वच्छ ठेवले आणि वॉल्व्ह टायिमगकडे लक्ष दिले तर ही गाडी तुम्हाला लाभदायी ठरेल.

येत्या दोन महिन्यांत माझा गाडी घेण्याचा विचार आहे. मी अनेक गाडय़ांचे निरीक्षण केले, तुलना केली आणि अखेरीस दोन गाडय़ांच्या तुलनेत अडकलोय. मारुती सेलेरिओ व्हीएक्सआय घ्यावी की ह्य़ुंदाई आय१० १.१. आयआरडीई२ घ्यावी. मार्गदर्शन करा. – किशोर गवारशेट्टीवार, यवतमाळ</strong>

47ग्रँड आय१० १.१ ही डिझेल कार आहे आणि सेलेरिओ व्हीएक्सआय ही पेट्रोलवर चालणारी कार आहे. डिझेल कार पेट्रोल कारपेक्षा एक लाख रुपयांनी महाग असतात. तुम्ही ग्रँड आय10चा पर्याय निवडला तर त्यात १.२ लिटर व्हीटीव्हीटी इंजिन असल्यामुळे तुम्हाला आनंद होईल आणि ही कार मारुती सेलेरिओपेक्षा हेवी आहे. त्यामुळे तुम्ही ग्रँड आय१०चा विचार करावा कारण ती पाच लोकांसाठी अगदी आरामदायी आहे. ग्रँड आय१० मधील डिझेल 1.1 इंजिन खूप चांगले असून तिचा मायलेजही २३ किमी प्रतिलिटर आहे. अखेर तुम्ही गाडी कितीदा वापरतात यावरच हे सर्व अवलंबून आहे.

सर, मला अर्टगिाविषयी माहिती द्या. गाडी कशी आहे. तिचा मायलेज कसा आहे. माझ्या आठ लाखांच्या बजेटमध्ये ती बसेल का. – संतोष पवार, औरंगाबाद</strong>
48हो, अर्टगिा पेट्रोल व्हीएक्सआय ही गाडी नक्की तुमच्या बजेटमध्ये येऊ शकते. तिचे मायलेज शहरात १२ किमी प्रतिलिटर आणि हमरस्त्याला १४.५० किमी प्रतिलिटर असे आहे. या गाडीचे १.४ के सीरिज इंजिन पॉवरफुल्ल आहे. गाडी छान आहे पण फुल लोड सात व्यक्ती बसणे जरा अडचणीचे ठरते. मागे जर दोन व्यक्ती विशेषत: लहान मुले असतील तर हरकत नाही. सस्पेन्शन छान आहे या गाडीचे. १५ इंच व्हील्सही छान आहेत पण जर तुम्ही चार-पाच व्यक्तींसाठी बघत असाल तर फोर्ड इकोस्पोर्टही तुमच्यासाठी चांगली आहे. तिचाही विचार करायला हरकत नाही.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.