* मी प्रथम वर्ष अभियांत्रिकीला आहे. मला गाडय़ांबद्दल खूप आकर्षण आहे. मला सीआरडीआय, एलएक्सआय, व्हीएक्सआय, व्हीडीआय, टीडीआय हे काय प्रकार असतात, हे जाणून घ्यायचे आहेत. कृपया सांगा.
– ज्ञानेश जगताप, बुलढाणा
* सीआरडीआय म्हणजे कॉमन रेल डिझेल इंजेक्शन आहे. ती टाटा, ह्य़ुंडाई अशा कंपन्यांच्या गाडय़ांमध्ये असलेली सिस्टीम आहे. एलएक्सआय, व्हीएक्सआय या मारुतीच्या गाडय़ांचे पेट्रोल व्हेरिएन्ट्स आहेत. व्हीडीआय, एलडीआय या मारुतीच्या डिझेल व्हेरिएन्ट्स आहेत. डीडीआयएस इंजिन १२४८ सीसीचे आहे. टीडीआय हे डिझेलचा प्रकार आहे आणि ते स्कोडा व फोक्सवॅगन या गाडय़ांमध्ये आढळते
* मी प्रकल्प सल्लागार (अर्थ) म्हणून काम करतो. माझे वय ६२ आहे. माझ्याकडे फोर्ड फिएस्टा ही गाडी आहे. २००८ पासून मी तिचा वापर करतो आहे. मात्र, आता मला नवीन गाडी घ्यायची आहे. माझा रोजचा प्रवास १५-१६ किमीचा असून वर्षांतून सहा-सात वेळा मी बाहेरगावी सहलीला जात असतो. टाटा झेस्ट घ्यावी की इंडिगो ईसीएस, कृपया मार्गदर्शन करावे.
– श्रीकृष्ण जोशी, मुलुंड, मुंबई
* टाटा झेस्ट घ्यावी. परंतु इतर पर्याय हवे असतील तर ह्य़ुंडाई एक्सेंट किंवा डिझायरसुद्धा बघायला हरकत नाही.
* मला ह्य़ुंडाई एक्सेंट एसएक्स आणि एसएक्स ऑप्शन यांच्यात कन्फ्युजन आहे. क्लिअर सिल्व्हर अलॉय व्हील आणि डायमंड कट अलॉय व्हील यांच्यात काय फरक आहे. १४ आणि १५ इंच व्हील्समुळे गाडी चालवण्यात वेगळं काय जाणवतं. मी महिन्याला साधारण एक हजार किमी एवढी गाडी चालवतो. त्यानुसार मी कुठली गाडी घ्यावी, पेट्रोल की डिझेल?
– स्वप्निल कावळे, यवतमाळ
* डायमंड कट अलॉय व्हील्स दिसायला खूप सुंदर आहेत, त्याने एक स्पोर्ट्स लुक येतो गाडीला. जर त्याची रिम साइझ १५ इंची असेल तर उत्तम. स्पीडलाही उत्तम ठरतात आणि खड्डेही जाणवत नाहीत. ग्रिप मिळते. जर तुम्ही दरमहा एक हजार किमी गाडी चालवत असाल तर नक्कीच पेट्रोल गाडी घ्यावी. कारण डिझेल गाडय़ा १.४ लाखांनी महाग आहेत. ती कॉस्ट रिकव्हर व्हायला आठ र्वष लागतील आणि मेन्टेनन्सही खूप असतो.