17‘कॉमेडी एक्स्प्रेस’ या गाजलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे अभिनेता कमलाकर सातपुते. टीव्ही मालिकांबरोबरच ‘दगडाबाईची चाळ’, ‘मर्डर मिस्टरी’ या आगामी मराठी चित्रपटांमध्ये ते झळकणार असून ‘कूर्मकथा’ या अंधश्रद्धा विषयावरील चित्रपटात त्यांनी विनोदी नव्हे तर गंभीर भूमिकाही समर्थपणे साकारली आहे.

15
‘एके दिवशी काय जाहले..’ असे आपल्या खास वैशिष्टय़पूर्ण लयीत आणि लकबीत अभिनेता कमलाकर सातपुते यांनी म्हणायला सुरुवात केली की लगेच प्रेक्षकांना हसू फुटते. स्टॅण्डअप कॉमेडीचा हा बादशहा कळव्यात राहून दररोज शूटिंगसाठी पश्चिम उपनगरांत जातो. कळव्यातून थेट मढ आयलण्डला शूटिंगच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गाडी तर हवीच. विनोदी भूमिका गांभीर्याने करणारा कलावंत अशी प्रतिमा ठसलेली असल्यामुळे स्वत: गाडी चालविण्यापेक्षा माझ्या मारुती अल्टोमधून मी आरामात बसून जातो. गाडी चालविण्याची हौस मलाही आहेच. परंतु अजून शिताफीने गाडी चालविण्याचे कौशल्य मिळविण्यासाठी सराव करायचा आहे. मारुती अल्टोची मरून रंगाची माझी गाडी आटोपशीर आहे. आकाराने लहान असल्यामुळे मुख्यत्वे ट्रॅफिक जाममधून जाताना झपाझप जाता येते हाच या गाडीचा मोठा फायदा आहे. त्याशिवाय मुंबईतील पार्किंगचा प्रश्न या गाडीमुळे फारसा भेडसावत नाही, हाही फायदा आहेच. मारुती कारचे इंजिन आणि परफॉर्मन्स यामुळे नजीकच्या काळातही मला मारुतीची अर्टिगा किंवा स्विफ्ट डिझायर घ्यायला आवडेल. ड्रीम कार म्हणण्यापेक्षा उपयुक्तता हा महत्त्वाचा मुद्दा मी अधोरेखित करेन. त्यामुळे भविष्यात निरनिराळ्या गाडय़ा घेणे मला नक्कीच आवडेल. परंतु, सध्या तरी मारुती अर्टिगा घेणार आहे.