* मी असे ऐकले आहे की, होंडा वेझेल नावाची डस्टरसारखी मिनी एसयूव्ही लाँच करते आहे. कृपया तुम्ही सांगू शकाल का, ती कधीपर्यंत बाजारात येईल आणि तिची किंमत किती असेल?
– संदीप संसारे, दादर
dr03 * होय, होंडाची वेझेल ही मिनी एसयूव्ही पुढील वर्षी बाजारात येत आहे. मुंबईत तिचे मे, २०१५ पासून बुकिंग सुरू होईल आणि सप्टेंबर, २०१५ पर्यंत ती बाजारात येईल. तिची किंमत नऊ लाखांपासून १३ लाखांपर्यंत असेल, ज्यात १.५ आयव्ही-टेक, आयडी-टेक ही इंजिने असतील. होंडा मोबिलिओमध्येही ती आहेत, मात्र वेझेलमध्ये टच स्क्रीनसारखी खूप अ‍ॅक्सेसरीज असतील.
* नवीन कार घेऊ की सेकंड हँड कार घेऊ, यात जरा माझा गोंधळ आहे. सेकंड हँड गाडीसाठी माझे बजेट साडेतीन लाख रुपये आहे, तर नवीन गाडीसाठीही तेवढेच बजेट आहे. ऑटोमॅटिक गाडी घेण्याकडे माझा जास्त कल आहे, कारण नऊ महिने मी बाहेर असेल. त्यामुळे नंतर मला मॅन्युअल कार ऑपरेट करायला अडचण होईल. मला सेकंड हँड हय़ुंडाई आय२० एॅस्टा ही जून, २०१० ची गाडी चार लाखांपर्यंत मिळते आहे. काय योग्य ठरेल?
– हितेश चव्हाण
dr04* आय२० एॅस्टा तुम्हाला मिळत असेल तर उत्तमच आहे. तुम्ही नऊ महिने बाहेर असता त्यामुळे सेकंड हँड गाडीचा विचार योग्यच आहे. तुम्ही डीलरकडे आय१० स्पोर्टझ् ऑटो हे २०१०चे मॉडेल आहे का याबाबत विचारा. ही उत्तम ऑटो कार तुम्हाला सेकंड हँडमध्ये मिळू शकेल. जर नवीनच गाडी घ्यायची असेल तर किमान चार लाख २० हजार रुपये बजेट धरावे लागेल, ज्यात अल्टो के१० ऑटो आरामात येईल.
* माझे तीन-चार लाख रुपयांचे बजेट आहे. या पशांत अल्टो के१० ऑटो, गीअर, अल्टो ८००, हय़ुंडाई आय१० या गाडय़ा येऊ शकतात काय? तसेच लो मेन्टेनन्स कार तुम्ही सुचवाल?
– अमोल बतुले
* तीन-चार लाखांमध्ये अल्टो के१० येऊ शकते; पण अल्टो के१०ची ऑनरोड किंमत चार लाख २० हजार रुपये आहे. गाडीची बॉडी वगळता सेलेरिओचेच इंजिन आणि गीअरबॉक्स त्यात आहेत. सेलेरिओ आज उत्तम परफॉर्मन्स देणारी गाडी आहे. मी तुम्हाला अल्टो के१० ऑटो हीच गाडी सुचवेन, कारण ती ऑटो असूनही १८ किमी प्रतिलिटर एवढा मजबूत मायलेज देते; पण सीएनजी ऑटो मॉडेल उपलब्ध नाही, हेही लक्षात घ्या.
* माझे वय ४५ वष्रे असून मी शिक्षिका आहे. माझे बजेट सात लाख रुपये आहे. मला सेडान प्रकारातली गाडी खूप आवडते. आमचे जास्त फिरणे नसते. मला लक्झरियस, स्पेशिअस आणि कम्फर्ट असणारी गाडी हवी आहे. होंडा अमेझ, स्विफ्ट डिझायर, टाटा झेस्ट यापकी कोणती गाडी घेणे जास्त सयुक्तिक ठरेल. लो मेन्टेनन्स आणि हाय मायलेज असलेली गाडी कोणती? कृपया सांगा.
– अनुश्री धटिंगण
* सेडान कारमध्ये तुम्हाला सुटसुटीत आणि योग्य गाडी म्हणजे स्विफ्ट डिझायर. तिचे मायलेज १९ किमी प्रतिलिटर आहे. यात पेट्रोल झेडएक्सआय हे मॉडेल घ्या. त्यात एबीएस आहे व ऑडिओ सिस्टीम वगरे सर्व सोयीसुविधा आहेत आणि मारुतीची गाडी असल्याने डोळे मिटून किमान दहा वष्रे तरी चालतेच. थोडे थांबून शक्य असेल तर नवीन होंडा जॅझ लाँच होतेय, तिचाही तुम्ही विचार करू शकता. ती हॅचबॅक आहे तरीही तुमच्यासाठी उत्तम ठरेल.