dr04ड्रायिव्हिंग लायसन्स आज अर्ज केला आणि ड्रायिव्हग टेस्ट दिली म्हणजे आपल्याला लगेचच मिळेल असे नाही. मात्र, ड्रायिव्हग जमते पण लायसन्स काढायला वेळ मिळाला नाही म्हणून लगेचच टेस्ट घेऊन टाका असेही नसते. ड्रायिव्हग लायसन्स प्राप्त करून घेण्यापूर्वीची महत्त्वाची पायरी म्हणजे लìनग लायसन्स. तुमच्याकडे चारचाकीचे लायसन्स असले आणि तुम्हाला मोटारसायकलचे हवे असेल तरी तुम्हाला आधी लìनग लायसन्स काढावेच लागते. वयाची १६ वष्रे पूर्ण झाली की पालकांच्या लेखी अनुमतीने ५० सीसीपेक्षा कमी क्षमता असलेल्या दुचाकी चालवण्यासाठी लìनग लायसन्सचा अर्ज करता येतो. मात्र, चाचणीच्यावेळी ५० सीसीपेक्षा कमी क्षमतेची दुचाकी असणे अनिवार्य असते. १८ वष्रे पूर्ण झाली की मोटारसायकल आणि व्यावसायिक वापरासाठी नसलेली चारचाकी किंवा इतर खासगी वाहनाच्या लìनग लायसन्ससाठी अर्ज करता येतो. सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांच्या लìनग लायसन्ससाठी वयाची २० वष्रे पूर्ण करणे अनिवार्य असते. लìनग लायसन्सची परीक्षा संगणकीय पद्धतीने घेतली जाते. त्यासाठीचे अपेक्षित प्रश्न www. mahatranscom.in या मोटार वाहन विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. लìनग लायसन्सच्या चाचणी देण्यासाठी ऑनलाइन अपॉइन्टमेंट घेणे अनिवार्य असते. मात्र, तुमच्याकडे आधीच काढलेले पर्मनन्ट लायसन्स असेल तर ऑनलाइन अपॉइन्टमेंट घेण्याची गरज नाही. इतर कोणत्याही पद्धतीने लìनग लायसन्सच्या परीक्षेला बसता येत नाही. ऑनलाइन अपॉइन्टमेंटचे सॉफ्टवेअर केंद्र सरकारच्या एनआयसीने तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये काम करण्यासाठी तुमच्या संगणकावर इंटरनेट एक्स्प्लोअरर किंवा ब्राऊजर हवा. तसेच एॅक्रोबॅट रीडर इलेव्हन किंवा त्यापुढील व्हर्जन असावे. तरच संगणकावरून ऑनलाइन अपॉइन्टमेंट घेणे शक्य होते. आधी http://www.sarathi.nic.in ही वेबसाइट उघडावी. नंतर issue learning licence to me ही लिंक क्लिक करावी. येणारा फॉर्म भरला आणि सबमिट बटन क्लिक करावे. फॉर्म नंबर लिहून घ्यावा. नंतर परत http://www.sarathi.nic.in  वर जावे. तेथे  appointment for slot booking  ही लिंक क्लिक करावी. फॉर्म नंबर व मोबाइल नंबर टाकावा आणि दिलेल्या सूचनांप्रमाणे अपॉइंटमेंट घ्यावी.
संजय डोळे,  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे

WhatsApp Soon Allow Users To update With privately mention contacts in status updates maintaining user privacy
व्हॉट्सॲपच्या स्टेटसमध्ये इन्स्टाग्राम फीचर; फोटो, व्हिडीओ टाकताना मिळणार ‘ही’ खास सोय; ‘असा’ करा वापर
Airtel Xtreme
लाईट्स, कॅमेरा, XStream : तुमचं वन स्टॉप एन्टरटेन्मेंट हब
Viral Video of Mother's Phone Addiction
बापरे! मोबाईलच्या नादात महिलेने चिमुकल्याला फ्रिजमध्ये ठेवले? व्हायरल व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा
only 5 rupees lemon will clean the kettle
५ रुपयाचे लिंबू करेल केटलची चकचकीत सफाई! पाहा व्हायरल जुगाड व्हिडीओ