माझी गाडी शिकण्याची आणि शिकल्यानंतर तब्बल २५ किमी लाँग ड्राइव्हला (!) जाण्याची मजेदार गोष्ट मला इथे शेअर करायला आवडेल. मी नुकताच ड्रायिव्हग क्लास लावला होता. फार फार तर १५ दिवस झाले असतील. मी सरावासाठी एक जुनी इंडिकाही घेतली. क्लास झाला की या गाडीवर सराव करण्याचा माझा परिपाठ असायचा. माझे घर जरा चढावर असल्याने मी घाबरून गाडी घरापासून दूरवरच पार्क करायचो. पहाटे चार वाजता मग गाडीपर्यंत पायी जाण्याची रपेट व्हायची आणि त्यानंतर तासभर सराव की पुन्हा गाडी पाìकगला आणि मी घरी, असा माझा परिपाठ असायचा. माझ्या गाडी शिकण्याच्या हौसेची मित्रांमध्ये चर्चा असायची. मी गणिताचा शिक्षक असल्याने सगळ्यांना माझ्या पर्फेक्शनबाबत खात्री असायची. असेच एकदा माझा मित्र नितीन याने माझ्यावर एक कामगिरी सोपवली. त्याच्या थोरल्या बहिणीला कासार आंबोली येथील निवासी शाळेतून आणायचे होते. सोबत त्यांच्या माऊलींनाही घेऊन जाण्यास सांगितले. कासार आंबोली माझ्या घरापासून २५ किमी अंतरावर. खरे तर माझ्या पोटात गोळाच आलेला. मात्र, मित्राने एवढय़ा विश्वासाने आपल्यावर एवढी जबाबदारी सोपवली आहे तर ती पूर्ण करायलाच हवी. मनाचा हिय्या करून गाडी काढली. मनातल्या मनात कुलदेवतेचे स्मरण केले आणि गाडी स्टार्ट केली. मला गाडी दोनच गीअरवर चालवता येत होती. कारण माझ्या ड्रायिव्हग क्लासमध्ये तेवढेच प्रशिक्षण दिले गेले होते. दुसऱ्या गीअरपुढे गाडी कशी चालवायची याचे ज्ञानच नव्हते मला. त्यामुळे कात्रज ते कासार आंबोली या २५ किमी प्रवासाला तब्बल तीन तास लागले. रस्त्याने माझी गाडी कासवगतीने चालतेय आणि आजूबाजूच्या गाडय़ा सशाच्या वेगाने, असे चित्र होते. मी गाडीचे स्टीअिरग घट्ट धरून ठेवले होते. मित्राची आई मला धीर देत होती. सावकाश चालवा, काही घाई नाही वगरे सांगून माझा उत्साह वाढवत होत्या. अखेरीस एकदाचे पोहोचलो आम्ही कासार आंबोलीला. तिथे तर शाळा थोडय़ा चढावर होती. ते पाहून माझी गाळणच उडाली. मी उसने अवसान आणून गाडी पुढे रेटली. तर शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ वॉचमनने गाडी अडवली. त्यांना माहिती सांगून गाडी पुढे नेण्याचा मी प्रयत्न करू लागलो तर घडले भलतेच. गाडी पुढे जाण्याऐवजी उताराला मागे जाऊ लागली. माझी तर भंबेरीच उडाली. गाडी काही थांबवता येईना. गाडी मागेमागे जात राहिली. नशीब मागे कोणतेही वाहन नव्हते. अखेरीस चढाच्या पायथ्याशी जाऊन गाडी एकदाची थांबली. वॉचमन पाहतच राहिला. अखेरीस गाडी तिथेच पार्क करून ताईंना घेऊन या, असे मी मित्राच्या माऊलींना सांगितले. परतीच्या प्रवासात थोडा धीराने गाडी चालवून माझ्यासकट सर्वाना सुखरूप घरी आणले. हा अनुभव मला खूप काही शिकवून गेला. आता मात्र मी व्यवस्थित गाडी चालवतो. मात्र, मी माझ्या परीने काही नियम ठरवून टाकले आहेत. एक म्हणजे रात्री गाडी चालवायची नाही. अडचणीच्या ठिकाणी गाडी न नेणे आणि गाडी योग्य ठिकाणीच लावणे. या नियमांचे मी काटेकोर पालन करतो. माझ्या या अनुभवातून नव्याने गाडी शिकणाऱ्यांनाही काही हाती लागेल, म्हणून हा पत्रप्रपंच.
सुनील पवार, पुणे

माझी सखी-माझी गाडी
dr06स्वत:ची गाडी घेऊन स्वत: चालवून घरच्यांना फिरवायचे माझे स्वप्न होते. बाबांचा- विजय कुळकर्णीचा- आदर्श डोळ्यांसमोर होताच. गाडी घेण्यासाठी पािठबा तसेच ड्रायिव्हग शिकण्यासाठी सासू सासऱ्यांनी प्रोत्साहन दिले. २००८ च्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आम्ही वॅगनआर ही गाडी घेतली व मी ड्रायिव्हगचा क्लासही लावला. माझा धाकटा मुलगा गौरव तेव्हा दीड वर्षांचाच होता, तरी मी ऑफिसमधून घरी आल्यावर सासरे म्हणायचे, ‘‘वर्षां, तू जा गाडी शिकायला, आम्ही गौरवला बघू.’’ कोर्स पूर्ण करून आरटीओची परीक्षा पास होण्यात त्यांचे आशीर्वाद मोलाचे आहेत. वेळ मिळताच एकटी गाडी बाहेर नेऊ लागले. मी ४७ वर्षांची आहे, माझ्या हातून कधीही कुणाला इजा होणार नाही  आत्मविश्वासाने मी ७-८ वष्रे झाली गाडी चालवत्येय. दुर्दैवाने सासरे आता नाहीत, पण पती, मुले, सासूबाई, कधी आईबाबांना सफर करवण्यात मला खूप समाधान मिळते. माझे पती ड्रायिव्हग करीत नसले तरी मला नेहमी गाईड करतात. मी पुणे, देवळाली, डहाणू, मुंबई, डोंबिवलीमध्ये खूप तसेच गुजरातमध्येही फेऱ्या केल्या आहेत. मोठा मुलगा विशाल कॉलेज-क्लासहून रात्री परततो, त्याला स्टेशनवरून आणणे हे माझे रोजचेच आवडीचे काम आहे. गाडीने मला कधी दगा दिला नाही. पण २-३ वेळा तेही रात्री १०.४५ च्या ऐन वेळी बॅटरी संपल्यामुळे पंचाईत झाली, पण मी व मुलाने १-२ लोकांना विनंती करून गाडीला धक्का मारून कशीबशी चालू करवून घरापर्यंत आणली, गाडीला कधीच कुठे ठेवले नाही. हरिहरेश्वरला आमच्या कुलदेवतेला,  कोल्हापूर, शेगांव व इतरही खूप ठिकाणी सुट्टय़ांच्या सोईने गाडीने जाऊन यायचे आमचे प्लॅिनग चालू आहे.
– वर्षां खोपकर, मालाड (मुंबई)

 dr08ड्रायिव्हग  शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com