मारुतीच्या गाडय़ा म्हणजे समस्त भारतीयांसाठी अभिमानाची बाब. अगदी मारुती ८०० पासून ते अलीकडच्या सिआझपर्यंत सर्वच गाडय़ांना भारतीयांनी डोळे झाकून पसंती दिली. मारुतीच्या अल्टोला तर सर्वाधिक खपाची कार म्हणून सन्मान दिला. गेल्या दशकभरात तब्बल २७ लाख मारुती अल्टोंची विक्री झाली. हा एक प्रकारचा विक्रमच आहे. यानिमित्ताने सध्या मारुतीतर्फे थँक यू कस्टमर अशी जाहिरात मोहीम राबवली जात आहे. अल्टोचा बाज आणि मध्यमवर्गीयांमध्ये तिची लोकप्रियता पाहता तिलाच धन्यवाद म्हणावेसे वाटते..
ज्यांच्याकडे कार नाही, परंतु कार घेण्याइतपत पसे आहेत त्यांची पहिली पसंती असते मारुतीला. त्यातही मग जो तो आपापल्या बजेटनुसार मारुतीच्या गाडय़ा घेतो. मात्र सर्वाधिक पसंती असते ती वॅगनआरला. परंतु तीही जर परवडणारी नसेल तर त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असतो, तो म्हणजे अल्टो के १०चा. मध्यमवर्गीयांना परवडणारी, छोटीशी आणि मारुती ८००शी साधम्र्य असलेली ही गाडी खरोखरच परिपूर्ण फॅमिली कार आहे.
नवीन अल्टो के १० ही अल्टो ८००शी समांतर असलेल्या  पूर्णपणे नव्याने आखण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे नवीन अल्टो के १०मध्ये  आता पर्यायी एॅटोमॅटिक गीअर बॉक्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याचबरोबर जे कमी वापर खर्चाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे.
के १० मध्ये बसवण्यात आलेले एक लिटर म्हणजेच ९९८ सी.सी क्षमतेचे इंजिन तिला अल्टो ८०० पासून वेगळे बनवते. तसेच नव्या के १० चे वजन ७५० किलोपेक्षा थोडेसे कमी असल्याने तिचा पॉवर टू वेट रेशो हा स्विफ्ट इतका असून तो उपयुक्त  ठरला आहे. इंजिनाबरोबरच के १० मध्ये नवीन अंतर्गत रचना आणि नवे बाह्य रूप देण्यात आले आहे .

अंतरंग
अधिक आकर्षक म्हणजे नव्या  के १० मध्ये नवीन अंतर्गत रचना देण्यात आली आहे. गाडीच्या डॅशबोर्डमध्ये दुहेरी रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे. हलक्या रंगसंगतीच्या वापरामुळे प्रशस्तपणा हा अधिक जाणवून येतो. चांगली गोष्ट म्हणजे या किमतीच्या गाडीसाठी डॅशबोर्ड हा जास्त उच्च दर्जाचा वाटतो. परंतु ुंदाई ईऑनच्या डॅशबोर्डइतका चांगला मात्र नक्कीच नाही.
नव्याने देण्यात आलेले स्टीअिरग हे थोडय़ाफार प्रमाणात स्विफ्टसारखे आहे. चालकाच्या सोयीसाठी मॅन्युअल व्हेरिएंटमध्ये गीअर लिवरच्या पुढे कप ठेवण्याची जागा पुरवण्यात आली आहे. परंतु ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या मॉडेलमध्ये मात्र ट्रान्समिशनच्या मोठय़ा आकारामुळे ही सोय देण्यात आली नाही याचे आश्चर्य वाटते. कारण ऑटोमॅटिक गाडीमध्येच चालकाचा एक हात हा मोकळा असतो. जुन्या के १० प्रमाणेच नव्यातही ग्लव्ह बॉक्ससमोर छोटा हूक देण्यात आला आहे जो एखादी लहान पिशवी अडकवण्यास नक्कीच कमी येऊ शकतो.
पुढील आसने ही पुरेशी आरामदायी आणि प्रशस्त असून उंच चालकालादेखील सहज सामावून घेऊ शकतात. मागील प्रवाशांच्या नी रूम आणि हेड रूममध्ये वाढ करण्यात आली अहे. परंतु हे साध्य करण्यासाठी पुढील आसनाचा मागील भाग हा जास्त पातळ आणि खोलगट करण्यात आला आहे. याचा तोटा असा की पुढील आसनाचा पाठीच्या बाजूचा मऊपणा कमी झाला आहे.

बारूप
नवीन अल्टो के १० ही अल्टो ८००शी समांतर असलेल्या प्लॅटफॉर्मवर आधारित असली तरी तिला नवा चेहरा देण्यात आला आहे हे तिला समोरून पाहताच लक्षात येते. बम्पर, मोठे स्वेप्ट, बॅक हेड लाइट, पुढील ग्रील, बॉनेट हे पूर्णपणे नवीन असून गाडीच्या पॅनेल्सवर असणाऱ्या हलक्या रेखीव कडांमुळे रांगडा अवतार प्राप्त झाला आहे . मागील दृष्य अधिक चांगले दिसावे म्हणून पूर्वीपेक्षा मोठे रीअर व्ह्यू मिर्स देण्यात आले आहेत. गाडीचे टेल गेट हे अधिक समांतर आणि सपाट करण्यात आल्यामुळे ती अल्टो ८०० पेक्षा जास्त रुंद असल्याचा भास होतो. त्याचबरोबर नव्याने डिझाइन करण्यात आलेले टेल लाइटगाडीला अधिक ताजे रूप देतात.

इंधन क्षमता
ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल हे दोन्ही मॉडेल एकाच क्षमतेचे असल्याचा मारुतीचा दावा आहे.
इंधन : पेट्रोल
मायलेज: २४.०७ कि.मी प्रतिलिटर
इंधन : सीएनजी
मायलेज: ३२.२६* कि.मी प्रतिकिलोग्राम
[* मायलेज ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांच्या परीक्षणानुसार]

स्टीअिरग
रॅक आणि पिनियन व इलेक्ट्रॉनिक असिस्ट

मनोरंजन
ऑडिओ सिस्टीममध्ये इंटिग्रेटेड सीडी प्लेयर, एम.पी ३, एफ.एम, यूएसबीबरोबरच ऑक्स-इनची सुविधादेखील पुरवण्यात आली आहे.   ऑडिओ सिस्टीमवर अतिशय आकर्षक अशा पिआनो ब्लॅक रंगाचे आवरण देण्यात आले आहे . ब्लू-टूथमार्फत आपला फोन कनेक्ट करण्याची सुविधा मात्र देण्यात आलेली नाही.

ट्रान्समिशन
प्रकार : फ्रन्ट व्हील ड्राइव्ह
गीअर बॉक्स : ५ स्पीड मॅन्युअल / ५ स्पीड ऑटोमॅटिक

के १० मध्ये मारुती सेलेरिओप्रमाणेच ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन(एएमटी) गीअर बॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. मारुतीने उपयुक्त तांत्रिक सुधारणा केल्यामुळे हा गीअर बॉक्स सेलेरिओपेक्षा अधिक सफाईदारपणे काम करू शकतो. एका गीअरमधून दुसऱ्या गीअरमध्ये जाताना जाणवणारे सूक्ष्म हिसके नाहीसे करण्यात मारुतीच्या अभियंत्यांना यश आले आहे.

डायमेन्शन :
* लांबी : ३,५४५ मि.मी
* रुंदी : १,४९० मि.मी
* उंची : १,४७५ मि.मी
* व्हील बेस : २,३६० मि.मी
* ग्राऊंड क्लिअरन्स : १६०मि.मी
* इंधन टाकीची क्षमता : ३५ लिटर
* टर्निंग रेडिअस : ४.६ मीटर
* सामान साठवण क्षमता : १७७ लिटर

सुरक्षा :
* चालकासाठी १ एअर बॅग ९ सेन्ट्रल लॉकिंग
* फॉग लॅम्प ९ कि-लेस एन्ट्री
* गियर शिफ्ट इंडिकेटर  ९ कि-ऑफ रिमाईडर
* हेड लाइट वाìनग

ब्रेक
* पुढे : व्हेन्टीलेटेड डिस्क ब्रेक
* मागे : ड्रम ब्रेक
* लॉक : नाही

किंमत
’     अल्टो के १० एलएक्स
    रु. ३,०६,०००/-
’     अल्टो  के १० एलएक्सआय
    रु. ३,२१,६८७/-
’     अल्टो  के १० व्हीएक्सआय
    रु. ३,३७,७५०/-
’     अल्टो  के १० व्हीएक्सआय
    (ऑटो गियर शिफ्ट )
    रु. ३,८८०,१८७/-
’     अल्टो  के १० व्हीएक्सआय
    (ओ) रु. ३,५६,६८७/-
’    अल्टो  के १० एलएक्सआय
    (सीएनजी) रु. ३,८१,६८७/-
(किमती एक्स शोरूम आहेत.)

उपलब्ध रंग
* टँगो ऑरेंज
* ग्रॅनाइट ग्रे
* सेरिल्यून ब्लू
* फायर ब्रीक रेड
* सिल्की सिल्व्हर
* सुपिरिअर व्हाइट

स्पर्धक
* हुंदाई ईऑन (१ लिटर इंजिन)
* डॅटसन गो
सर्वेश वैद्य – ls.driveit@gmail.com