जगातली चौथ्या क्रमांकाची वाहननिर्माती कंपनी असलेली ह्युंदाई भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणजे भारतात सर्वाधिक खपाच्या बाबतीत ह्युंदाईचा दुसरा क्रमांक लागतो. सँट्रो िझग, आय१०, ईऑन, ग्रँड आय१०, आय२०, व्हर्ना, अ‍ॅक्सेंट, सँटा फे यांसारख्या लघू, मध्यम आणि मोठय़ा आकाराच्या ह्युंदाईच्या गाडय़ा भारतात लोकप्रिय तर आहेतच, शिवाय त्यांची विश्वासार्हताही जास्त आहे. देशांतर्गत बाजारपेठेत आता अग्रस्थान मिळवण्यासाठी ह्युंदाईने नवनवीन गाडय़ांची रेंज भारतीय रस्त्यांवर उतरवण्याचे ठरवले आहे. अलीकडेच त्यांची व्हर्ना ही लोकप्रिय सेडान प्रकारातील गाडी नव्या रूपात लाँच झाली आहे.. २००६ मध्ये जेव्हा व्हर्नाचं लाँचिंग भारतात झाले होते त्या वेळी या गाडीला तुफान प्रतिसाद मिळाला. त्यानंतर २०११ मध्ये व्हर्नाचे रिलाँचिंग झाले आणि आता पुन्हा ही गाडी नव्या रूपात वाहनप्रेमींच्या भेटीला येत आहे.

ह्युंदाई मोटर्स इंडिया लिमिटेडने अलीकडेच नव्या रूपातील फ्ल्युइडिक फोर एस व्हर्ना ही गाडी लाँच केली आहे. फोर एसचा अर्थ आहे स्टाइल, सेफ्टी, सॉफिस्टिकेशन आणि स्पीड. नव्या रूपातील व्हर्ना लोकांच्या पसंतीला उतरते किंवा कसे यासाठी काही काळ नक्कीच जाऊ द्यावा लागेल. मात्र, या नव्या गाडीची वैशिष्टय़े तरी काय आहेत, हे जाणून घेऊ या.

बारूप
व्हर्ना फोर एसचा तोंडवळा जुन्या व्हर्नासारखाच असला तरी त्यात बऱ्यापकी बदल करण्यात आल्याचे जाणवतात. पुढील बम्परला थोडा बाक देण्यात आला असून फॉग लॅम्प्सनाही स्वतंत्र ओळख देण्यात आली आहे. बॉनेटला दोन क्रोम लायिनग्ज असून हेडलॅम्प्स अधिक बाकदार करण्यात आले आहेत. तर पुढील बाजूस ग्रिल लावल्याने गाडीच्या रूपात भर पडली आहे. मागील बाजू अशा रीतीने डिझाइन करण्यात आली आहे की गाडीच्या इंधनाचा एक्झॉस्ट पाइप पटकन दिसत नाही. मागील बूट स्पेसही मोठी असून चार बॅगा अंमळ जास्तच बसू शकतील अशी रचना आहे. तसेच टेल लॅम्प्समध्ये फारसा काही बदल करण्यात आलेला नाही. गाडीच्या खिडक्या मात्र थोडय़ा आखूड वाटतात. कारण आत बसलेल्याला खिडक्या थोडय़ा उंच आणि अरुंद वाटतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गाडीत अँटी ब्रेकिंग सिस्टीम (एबीएस) आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये सहा एअरबॅग्जची सुविधा आहे तसेच पाऊस पडल्यावर आपोआप सुरू होणारे वायपर्स आणि ऑटो हेडलॅम्प्स या खास सुविधाही आहेत. तर प्राथमिक स्वरूपाच्या मॉडेलमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सुविधा उपलब्ध आहे.

आतील लोकांना अधिकाधिक आरामाबरोबरच सुरक्षा प्राप्त होईल, याची काळजी ह्युंदाईने घेतली आहे. सुरक्षेसाठी एअरबॅग्ज देण्यात आल्या असून आरामासाठी सुविधाही देण्यात आल्या आहेत. मागे बसणाऱ्या प्रवाशाला पाय लांब करायचे असतील तर पुढील प्रवाशाची सीट पुढे ढकलण्याची अर्गो लिव्हर ही नवी सुविधा व्हर्ना फोर एसमध्ये देण्यात आली आहे. तसेच सीट अधिक आरामदायी व खोल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसल्यावर थोडे आणखी खाली गेल्यासारखे व आरामदायी वाटते. मात्र, त्यामुळे गाडीचा ग्राऊंड क्लिअरन्स कमी झाल्यासारखा वाटतो. चालकाच्या बाजूला व त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवासी यांच्यामध्ये स्लाइड करणार आर्मरेस्ट देण्यात आले आहे. त्यामुळे चालकाला स्टीअिरग पकडताना या आर्मरेस्टचा आधार तर होतोच, शिवाय कम्फर्टही प्राप्त होतो. तसेच गरजेनुसार त्याचा आकार वाढवता अथवा कमी करता येतो. स्लाइिडगमुळे हे शक्य होते. टॉप एन्ड व्हेरिएंटमध्ये नव्या प्रकारची म्युझिक सिस्टीम देण्यात आली आहे. त्यात एक जीबीपर्यंतच्या ऑडिओ फाइल्स सामावू शकतील अशी सोयही करण्यात आली आहे. बाकी डॅशबोर्डची रंगसंगती बदलण्यात आली आहे. गाडीतील व बाह्य तापमानाची माहिती देणारे इंडिकेटर, ओडोमीटर, स्पीडोमीटर, इंधनाची उपलब्धता याविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान तर आहेच. स्टीअिरग ड्रायव्हर फ्रेण्डली करण्यात आले आहे. चालक त्याच्या सोयीनुसार स्टीअिरग अ‍ॅडजस्ट करू शकतो. तुम्ही स्पेशिअस गाडीच्या शोधात असाल तर नक्कीच नव्या रूपातल्या ह्युंदाई व्हर्ना फोर एसचा विचार करू शकता.
गीअर प्रकार
१.६ लिटर क्षमतेचे सीआरडीआय व्हीजीटी डिझेल आणि व्हीटीव्हीटी पेट्रोल इंजिन या दोन्ही प्रकारांत ही गाडी उपलब्ध असून फोर स्पीड ऑटोमॅटिक व सिक्स स्पीड मॅन्युअल गीअरबॉक्स या दोन्ही प्रकारांत व्हर्ना फोर एस उपलब्ध आहे.
किंमत  
*  पेट्रोल
* १.४ लिटर व्हीटीव्हीटी पाच स्पीड मॅन्युअल (रु. सात लाख ७४ हजार)
* १.६ लिटर व्हीटीव्हीटी पाच स्पीड मॅन्युअल (रु. आठ लाख ८५ हजार)
* १.६ लिटर व्हीटीव्हीटी पाच स्पीड मॅन्युअल (ओ) (रु. नऊ लाख ३८ हजार)
*  १.६ लिटर व्हीटीव्हीटी चार स्पीड अ‍ॅटोमॅटिक एस (ओ) (रु. दहा लाख ११ हजार)
* १.६ लिटर व्हीटीव्हीटी पाच स्पीड मॅन्युअल एसएक्स (रु. दहा लाख १५ हजार)
* डिझेल
* १.४ लिटर सीआरडीआय सहा स्पीड मॅन्युअल (रु. आठ लाख ९५ हजार)
* १.६ लिटर सीआरडीआय व्हीजीटी सहा स्पीड मॅन्युअल (रु. दहा लाख)
* १.६ लिटर सीआरडीआय व्हीजीटी सहा स्पीड मॅन्युअल एस (ओ) (रु. दहा लाख ५९ हजार)
* १.६ लिटर सीआरडीआय व्हीजीटी सहा स्पीड मॅन्युअल एस एक्स (रु. ११ लाख ४६ हजार)
(सर्व किमती एक्स शोरूम आहेत)

स्पर्धा कोणाशी?
* फोक्सवॅगन व्हेन्टो
* स्कोडा रॅपिड
* होंडा सिटी
* मारुती सिआझ
टीम ड्राइव्ह इट – ls.driveit@gmail.com