नव्या आर्थिक वर्षांची सुरुवात होऊन आता महिनाही होईल. वाहन खरेदीसाठीचा गुढीपाडव्याच्या मुहूर्तही नुकताच येऊन गेला. गेल्या काही महिन्यांमध्ये या क्षेत्राने संथ वाटचाल नोंदविली आहे. उत्पादन शुल्कातील सवलत मागे जाणे, वाहन विक्रीत सातत्याने घसरण येणे, परकी चलनातील अस्वस्थतेचा फटका थेट आयातीवर होणे आदी संकटांना हे क्षेत्र सामोरे गेले आहे. या क्षेत्राचा आगामी कालावधीही फार सुरळीत आहे, असे दिसत नाही. क्षेत्रापुढील आव्हाने कायम आहेत. तेव्हा आता पुढील कालावधीत या क्षेत्राचा प्रवास कसा असेल, हे पाहणे खूपच उत्सुकतेचे असेल.
फक्त प्रवासी कारच्या बाबत सांगायचे झाल्यास नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षांत या क्षेत्राने तसे म्हटले तर गेल्या तीन वर्षांत सर्वोत्तम अशी कामगिरी बजाविली आहे. विपरीत परिस्थितीतही प्रवासी कारची देशातील विक्री ही वार्षिक तुलनेत ५ टक्के अधिक होत १८.७० लाख वाहनांची झाली आहे. आधीच्या दोन्ही वर्षांत ती घसरतीच राहिली आहे. कारसह, बहुपयोगी वाहने, व्हॅन यांची वाढही ३.९ टक्के वाढली आहेत. तर पायाभूत सेवा क्षेत्रातही हालचाली सुरू झाल्याने अवजड व मध्यम आकाराची वाणिज्यिक वाहनांची विक्रीही वाढू लागली आहे.
गेल्या आर्थिक वर्षांत भारतात विविध कंपन्यांच्या ३७ प्रकारांतील २६ वाहने सादर करण्यात आली. त्यातही प्रवासी कार तसेच दुचाकीत अनेक वाहने बाजारात उतरविली गेली. गिअरलेस स्कूटरला असलेली मागणी महिनागणिक वाढतच आहे. दुचाकी विक्री ८ टक्क्यांनी वाढली असताना स्कूटरची विक्री दुहेरी आकडय़ापर्यंत, तब्बल २५ टक्क्यांनी गेल्या आर्थिक वर्षांत वाढली. चालू आर्थिक वर्षांत वाहनविक्रीची वाढ ५ ते ७ टक्क्यांपर्यंत राहील, असे गणित मांडले जात आहे. तसे प्रत्यक्षात झाल्यास भारत हा चीनला वाहनविक्रीत मागे टाकेल, असे भाकीत आंतरराष्ट्रीय बँकेने केले आहे.
नव्या वर्षांत मात्र देशातील एकूण गुंतवणूकपूरक वातावरणाच्या जोरावर या क्षेत्राच्या व्यवसायवाढीच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. वाहनांच्या किमती या जानेवारी २०१५ पासूनच काही प्रमाणात वाढल्या असल्या तरी पूरक क्षेत्राने काहीसा हातभार वाहनखरेदीला दिला आहे. यामध्ये अर्थातच सध्या घसरत असलेल्या इंधनाच्या दरांचा मोठा हिस्सा आहे. त्याचबरोबर वाहनखरेदीसाठी मोठे पाठबळ असलेले वाहनकर्ज आता अधिक स्वस्त दरात उपलब्ध होत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने ताजे पतधोरण स्थिर ठेवल्यानंतर बँका त्यांचे कर्जदर कमी करत आहेत. पाव टक्क्याच्या स्वस्ताईचा दिलासा नक्कीच वाहन खरेदीदारांपर्यंत पोहोचत आहे. आगामी चांगल्या मान्सूनच्या जोरावरही वाहनखरेदी वाढण्याचा आशावाद व्यक्त केला जात आहे. मार्चमधील तिमाही नीचांक महागाई घसरणीने आगामी कालावधीत महागाई नरम राहण्याची शक्यता आहे. तेव्हा खरेदीदारांकडे अधिक पैसा हाताशी राहिला तर ते नव्या वाहनांवर आरूढ होणे नक्कीच पसंत करतील.

९ रेनो लॉजी
rainlogyजर्मन बनावटीचे लॉजी हे बहुपयोगी श्रेणीतील वाहन गेल्याच आठवडय़ात भारतीय रस्त्यांवर उतरविण्यात आले. होन्डाची मोबिलियो, शेव्हर्लेची एन्जॉय आणि मारुतीची एर्टिगा यांच्याबरोबरच्या स्पर्धेत ती कशी उतरते हे पाहावे लागेल. तुलनेत लॉजीची किंमतही त्याच रेन्जमध्ये आहे.

९ ट्रेलब्लेझर

 32थोडय़ा मोठय़ा गटातील एसयूव्हीला स्पर्धा देण्यासाठी शेव्हर्लेची ही कार येऊ घातली आहे. एन्जॉयद्वारे फारसे यश बहुपयोगी वाहन क्षेत्रात न मिळविलेल्या या कंपनीने टोयोटाच्या फॉच्युर्नरला टक्कर देण्यासाठी हे वाहन उतरवले. फोर्डची एन्डेव्हर असतानाच शेव्हर्ले या गटात स्पर्धा निर्माण करेल. फोर्डही या गटात तिची नवी एव्हरेस्ट आणण्याच्या तयारीत आहे.

९ आयएक्स२५
33हुंदाईची ही आय श्रेणीतील नवी कार. मारुतीप्रमाणेच तिही कॉम्पॅक्ट एसयूव्ही गटातीलच. गेल्याच वर्षी ती चीनमध्ये आली. आयचीच नवी विस्तारित श्रेणी कॉम्पॅक्ट एसयूव्हीतील स्पर्धा अधिक तीव्र करेल.

९ एस एक्स ४
स्विफ्ट ही हॅचबॅक तर एसएक्स४ ही सेदान श्रेणीत 34लोकप्रिय ठरली. तिची सिआज ही प्रीमियम गटात पाय रोवत असतानाच एसएक्स४चे नवे रूपडे लवकरच येणार आहे. मारुती सुझुकी या वाहनामार्फत कॉम्पॅक्ट एसयूव्ही या श्रेणीत प्रथमच उतरत आहे. थेट एसयूव्हीमध्ये तिची व्हिटारा आहेच, तर कॉम्पॅक्टमध्येही अनेक वाहने आहेत. मात्र या दोन्हीचा मिलाफ असलेली एसएक्स४ चा निभाव मातब्बर अशा रेनो डस्टर व फोर्ड इकोस्पोर्टसमोर कसा लागेल, हे कळेलच.

२०१५-१६ चे आकर्षण
२०१४-१५ दरम्यान भारतीय प्रवासी कार क्षेत्राने तुलनेत चांगली वाढ राखली आहे. व्यवसायविषयक देशातील वातावरणातील नैराश्यही आता संपुष्टात आले आहे. इंधनाचे दरही आता शिथिल होत आहेत. बँकाही त्यांचे व्याजदर कमी करत आहेत. चालू आर्थिक वर्षांतही हे क्षेत्र आधीच्या तुलनेत अधिक विस्ताराने वाढेल, असे दिसते.
विष्णू माथूर, महासंचालक, सिआम (सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स)

देशांतर्गत विक्री         २०१४-१५              २०१३-१४           वाढ/घट
प्रवासी वाहने              २६,०१,१११         २५,०३,५०९         +३.९०%
वाणिज्यिक वाहने        ६,१४,९६१           ६,३२,८५१          -२.८३%
दुचाकी वाहने              १,६०,०४,५८१       १,४८,०६,७७८     +८.०९%

वीरेंद्र तळेगावकर
veerendra.talegaonkar@expressindia.com