पऱ्यांच्या दुनियेत असल्यावर कसे हरवून जायला होते, अगदी तस्साच अनुभव मर्सिडीजच्या लालबुंद रंगाच्या सीएलए२०० च्या ड्रायिव्हग सीटवर बसल्यावर येतो. तुम्ही फक्त आवश्यकतेनुसार वेग वाढवायचा आणि कमी करायचा, बस्स.. ही लाल परी अशी काही भन्नाट पळते की प्रत्येकाने मान गर्रकन वळवून पसंतीची पावती दिलीच पाहिजे.
अंतरंग
एण्ट्री लेव्हल सेडान असलेल्या सीएलएचे अंतरंग म्हणजे एका छोटेखानी दिवाणखान्यात प्रवेश करण्यासारखे आहे. ड्रायिव्हग सीटवर स्टिअिरगच्या बाजूलाच गाडीच्या वेगाचे नियंत्रण आहे. म्हणजे न्यूट्रल (एन), रिव्हर्स (आर), पाìकग (पी) आणि ड्राइव्ह (डी) असे चारही मोड स्टिअिरगलगतच (जॉयस्टिक) आहेत. पाìकग लॉटला गाडी लावल्यानंतर या जॉयस्टिकच्या मधोमध एक छोटीशी कळ देण्यात आली आहे, ती दाबल्यानंतर आपोआप पाìकग मोड रीलीज होऊन गाडी सुरू होण्यासाठी सज्ज होते.
ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला टचस्क्रीन देण्यात आला आहे. यास कमांड असे नाव आहे. या टचस्क्रीनवर तुम्ही तुमच्या पुढील प्रवासासाठी नेव्हिगेशन सिस्टीम सुरू करू शकता अथवा मग म्युझिक सिस्टीम लावू शकता. रीअर कॅमेराही यालाच अ‍ॅटॅच असल्याने पाìकग करतेवेळी त्याची मदत होते. हायवेला तुम्ही गाडी बाजूला घेऊन काही वेळ थांबलात तर गाडी सुरू करतेवेळी सराऊंिडग कॅमेरा कार्यान्वित होतो. चेक सराऊंिडग म्हणून एक पर्याय स्क्रीनवर दिसतो. जेणेकरून गाडीच्या खाली, मागे, पुढे खड्डा आहे किंवा कसे तसेच मागून गाडय़ा येत आहेत किंवा कसे याचे निरीक्षण या कॅमेऱ्यातून करता येते. हायवेला टॉप स्पीडला (डी7) गाडी लागली की तुम्ही क्रूझ कंट्रोल हा पर्यायही निवडू शकता. गाडी सुरू केल्यानंतर शून्यापासून ते ६० सेकंदांपर्यंत उच्च प्रतीचा वेग गाठू शकते. डी1 ते डी7 अशी अ‍ॅटोमॅटिक गीअर शिफ्ट पद्धती यात आहे.
ड्रायिव्हग सीट मागे-पुढे अथवा गरजेनुसार वर-खाली करण्यासाठीचे बटन ड्रायव्हरच्या उजव्या हाताला दरवाजाच्या खोबणीत देण्यात आले आहे. ड्रायव्हरच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीसाठी भरपूर प्रमाणात लेगस्पेस देण्यात आला आहे. सीट मागे-पुढे करण्याची सोय असलले बटन त्याच्या डाव्या हाताला दरवाजाच्या खोबणीत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
* सूर्यछत (सनरूफ):
सनरूफ हे सीएलएचे आणखी एक वैशिष्टय़. पावसाळ्यात ते आपोआप बंद होण्याची सुविधा आहे. सनरूफचा वापर अर्थातच बच्चे कंपनीसाठी सुखावह आहे. हायवेवर गाडी वेगाने जात असताना सनरूफमधून डोके काढून वारा पिण्याचे सुख काही औरच. ती मजा सीएलए देतेच. सेडान असली तरी मागच्या बाजूला केवळ दोघेच जण आरामात बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तिसरा प्रवासी बसला तर थोडी अडचण होण्याची शक्यता जास्त आहे. मागच्या प्रवाशांना लेग स्पेस थोडी कमी मिळते. दोन प्रवाशांच्या मध्ये फोिल्डग सीटची व्यवस्था आहे. त्याचा वापर ड्राइव्ह करताना शीतपेये वगरे ठेवण्यासाठी होऊ शकतो. गाडीचा आकार मागच्या बाजूला निमुळता होत गेल्याने हेडरूम थोडी कमी आहे. परिणामी उंच व्यक्तीला मागच्या बाजूला बसताना त्रास होण्याची शक्यता जास्त आहे.
*  वातानुकूलन व्यवस्था :
एअरकंडिशन सिस्टीम अ‍ॅटोमॅटिक आहे. गाडीच्या वेगाशी ही सिस्टीम जोडण्यात आली आहे. गाडीचा वेग थोडा कमी झाला तर वातानुकूलन कमी होते. अर्थात ही सिस्टीम बंद करून खिडक्या उघडय़ा ठेवण्याचा पर्यायही आतील प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. पुढे तीन आणि मागे दोन व्हेंट्स देण्यात आल्याने गाडीत वातानुकूलन योग्य प्रमाणात होते. गाडीच्या चारही बाजूला हर्मन/ कार्डनचे स्पीकर्स देण्यात आले आहेत.
बारूप
सीएलएचा लूक आकर्षक आहे. बोनेटला पुढून सुरू होऊन मागच्या बाजूपर्यंत आलेल्या दोन स्ट्रिप्स आहेत. तसेच पुढील बाजूला मधोमध दिमाखात दिसणारे मर्सिडीजचे बोधचिन्ह लक्ष वेधून घेते. १७ इंच उंचीचे अलॉय चाकेही चटकन लक्ष वेधून घेणारी आहेत. दरवाजांच्या काचाही विशिष्ट पद्धतीने (फ्रेमलेस) डिझाइन करण्यात आल्या आहेत.
बूट स्पेस :
सीएलएला ४७० लिटर एवढा बूट स्पेस देण्यात आला आहे. दिसायला हा स्पेस खूप वाटतो, मात्र याच जागेत एक स्पेअर चाकही ठेवण्यात आल्याने बूट स्पेस थोडा अडचणीचा झाला आहे.
ग्राऊंड क्लिअरन्स :
सीएलएचा ग्राऊंड क्लिअरन्स थोडा कमी आहे. एखाद्या मोठय़ा स्पीडब्रेकरवरून गाडी न्यायची असल्यास गाडीचा वेग अत्यंत कमी करून नंतरच तो पार करावा लागतो. अन्यथा गाडी स्पीडब्रेकरला घासण्याची शक्यता आहे. सीएलए२०० ही पेट्रोल व्हर्जन तर सीएलए२०० सीडीआय ही डिझेल व्हर्जन गाडी आहे. लाल आणि पांढऱ्या रंगात या गाडय़ा उपलब्ध आहेत.
इंजिन क्षमता
१९०० सीसी असून प्रति लिटर १५ किमी एवढा अ‍ॅव्हरेज ही गाडी देते.
 एअरबॅग्ज :
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा एअरबॅग्जची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
 सुरक्षा :
* अँटिलॉक ब्रेकिंग सिस्टीम
* इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम
* अ‍ॅक्सिलरेशन स्कीड कंट्रोल
* फ्लॅिशग अडॉप्टिव्ह ब्रेक लाइट्स
* हिल स्टार्ट असिस्ट
* ब्रेक ड्राइंग आणि प्रायिमग
 सुरक्षित ड्रायव्हिंग:
* अटेन्शन असिस्ट
* टायर प्रेशर मॉनिटिरग (टय़ुबलेस टायर आहेत. टायरमधील हवेचा दाब कमी झाल्यास तशी सूचना ड्रायिव्हग सीटच्या समोरील स्क्रीनवर दिसते. टायरमध्ये अजिबात हवा नसली तरी किमान ५० किमीपर्यंत गाडी आरामात धावू शकते.)
* टायर रिपेअर किट टायरफिट
* स्पेअर व्हील विथ जॅक
अपघातानंतर :
* अपघातानंतरही गाडी दुरुस्त करणे सोपे
* अगदी किरकोळ प्रकारच्या टकरीचा आघात सोसू शकणारा क्रॅश बॉक्स
किंमत :
*  ३१ लाख ५० हजार (एक्स शोरूम किंमत)

विनय उपासनी -vinay.upasani @expressindia.com