dr03* मी गेल्या वर्षी वॅगन-आर पेट्रोल गाडी घेतली. मला काही शंका आहेत. ही गाडी सीएनजीमध्ये परावíतत करणे योग्य ठरेल का, माझे साप्ताहिक ड्रायिव्हग ८० किमीचे आहे, त्यामुळे इंजिनावर काही परिणाम होईल का, सीएनजीमध्ये परावíतत केल्याने गाडीच्या मेन्टेनन्सवर काय परिणाम होईल.
– रुपेश खेडेकर
* तुमचे साप्ताहिक ड्रायिव्हग २०० किमीपेक्षा कमी असल्याने सीएनजीमध्ये गाडी परावíतत करणे योग्य ठरणार नाही. तसेच सीएनजीमध्ये रूपांतरित केल्याने तुमच्या गाडीची वॉरंटी राहणार नाही. गाडीचा परफॉर्मन्स कमी होईल. दर दोन-तीन वर्षांनी क्लच प्लेट्स बदलाव्या लागतील. बूट स्पेसचे नुकसान होईल. त्यामुळे तुम्ही सीएनजीमध्ये रूपांतर करू नका गाडीचे. त्यामुळे फायद्यापेक्षा तोटाच जास्त होईल.
* सर माझ्या कुटुंबात सात सदस्य आहेत. त्यामुळे मी मारुती अर्टगिा गाडी घेणार आहे. तरी तुम्ही मला अर्टगिा व मोबिलिओ यांविषयी मार्गदर्शन करा. माझे बजेट नऊ ते दहा लाखापर्यंत आहे.
– संदीप तिडके, औरंगाबाद
* तुम्ही राहता त्या ठिकाणाहून जर होंडा सíव्हस सेंटर जवळ असेल तर मोबिलिओला पसंती देण्यास काहीच हरकत नाही. कारण मोबिलिओ जास्त स्पेशिअस आणि स्मूद कार आहे. तिचा मायलेजही जास्त आहे. अर्टगिा जरा ओल्ड स्टाइल आहे, परंतु तिची उंची जास्त असल्याने स्पेशिअस वाटते.
* सर, मला गाडी तर घ्यायची आहे परंतु थोडा गोंधळ आहे मनात. माझे महिन्याकाठी ५०० किंवा त्याहून अधिक किमी अंतर ड्रायिव्हग होते. कधीकधी कमीही होते. त्यामुळे मला पेट्रोल गाडी घेणे योग्य ठरेल की डिझेल. मी टाटा झेस्ट, एक्सेंट किंवा एलिट आय २० या गाडय़ांचा विचार करतोय. कोणती घ्यावी. झेस्टचा परफॉर्मन्स कसा आहे.
– विशाल गिरे
* तुम्ही नक्कीच पेट्रोलवर चालणारी कारच घ्यावी. तुम्हाला जास्त मायलेज देणारी गाडी हवी असेल तर डिझायर ही सर्वोत्तम गाडी आहे. तुम्हाला सर्वोत्तम वॉरंटी आणि वैशिष्टय़पूर्ण कार हवी असेल तर टाटा झेस्ट एक्सएमटी ही खूप चांगली गाडी आहे.
* मी पुण्यात नोकरी करतो. माझा गाडी घेण्याचा उद्देश् फक्त वीकेण्डला लाँग टूर करण्यासाठी आहे आणि वर्षांतून तीन-चारवेळा गावी जाण्यासाठी (एका बाजूने ३०० किमी अंतर) गाडीचा वापर करणार आहे. तसेच मला फक्त चार लोक बसतील अशी गाडी हवी आहे. आणि मागील बाजूस लेग स्पेस मोठा असलेली कार हवी आहे. माझे  बजेट सात ते आठ लाख रुपये आहे.
– सचिन पांगे, पुणे
*  मागच्या सीटलाही चांगली लेगस्पेस असलेली गाडी म्हणजे फियाट पुंटो किंवा मग टाटा इटिऑस. या दोन्ही गाडय़ा पेट्रोल व्हर्जनमधील चांगल्या गाडय़ा आहेत. तसेच चौघांसाठी या गाडय़ा पुरेशाही आहेत आणि त्यांचा मायलेजही चांगला आहे. मारुती रिट्झही उंच लोकांसाठी चांगली गाडी आहे.
* मला कार घ्यायची आहे, परंतु माझे बजेट चार ते पाच लाख रुपयेच आहे. मला गाडीचा रोज काही वापर करायचा नाही. आठवडय़ातून एक दिवस आणि सहा महिन्यांतून गावी जाण्यासाठीच गाडी वापरायची आहे. कृपया मला परवडेल अशी गाडी सुचवा.
    – गुरू तराळकर
* तुमच्या बजेटात बसणारी गाडी म्हणजे मारुती सेलेरिओ. ही एक मिडसाइज्ड पेट्रोल कार असून तुम्हाला ती परवडू शकेल. तिचा मेन्टेनन्स कमी आहे आणि मायलेजही चांगला आहे. मात्र, तुम्हाला चांगली प्रशस्त कार हवी असेल तर डॅटसन गो प्लस या गाडीचा विचार करा. खूप चांगली कार आहे.
समीर ओक
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.