यापूर्वी काही मोजक्या प्रकारच्या मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक वाहनांसाठी अँटी ब्रेक सिस्टीम (एबीएस) असणे अपरिहार्य केले होते. एबीएस ब्रेक सिस्टीम जर वाहनात असेल तर वाहन स्किड होण्यापासून बचाव होतो.
दिनांक १ एप्रिल २०१५ पासून उत्पादित झालेल्या परंतु नवीन मॉडेल्स अशा एम३ आणि एन३ प्रकारच्या वाहनांमध्ये वाहनाच्या उत्पादकाकडून एबीएस ब्रेक सिस्टीम अनिवार्य करण्यात आलेले आहे. एम३ आणि एन३ प्रकारच्या वाहनांच्या सध्या उत्पादन होत असलेल्या मॉडेल्समध्ये दिनांक १ ऑक्टोबर २०१५ पासून वाहनाच्या उत्पादक कंपनीने एबीएस ब्रेक सिस्टीम बसवून देणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
साधारण ३१-मे -२००२ पासून वाहनांची वर्गवारी करण्याची पद्धत सुधारण्यात आली. एल ने सुरू होणाऱ्या प्रकारात दुचाकी वाहने अंतर्भूत होतात. टी ने सुरू होणाऱ्या प्रकारात कमीत कमी चार चाकी तसेच त्यापुढील परंतु फक्त प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहने अंतर्भूत होतात. एन ने सुरू होणाऱ्या प्रकारात कमीत कमी चार चाकी तसेच त्यापुढील परंतु प्रामुख्याने मालवाहतूक आणि मालासोबत गरज असल्यास प्रवासी वाहतूक करणारी वाहने वाहने अंतर्भूत होतात. टी ने सुरू होणाऱ्या प्रकारात इतर वाहनांद्वारे ओढले जाणारे ट्रेलर अंतर्भूत होतात. एन३ वाहन याचा अर्थ असे मालवाहतूक वाहन ज्याचे मोटार वाहन कायद्यानुसार मालासहित वजन १२ टनांपेक्षा जास्त असते. एम३ प्रकारचे वाहन याचा अर्थ असे प्रवासी वाहतूक वाहन ज्यामध्ये ९ किंवा त्यापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करता येते आणि ज्या वाहनाचे मालासहित वजन ५ टनांपेक्षा जास्त आहे.