* मला पेट्रोलवर चालणारी आणि सगळ्यात कमी किंमत असणारी गाडी सुचवा. नॅनो नको.
– रावसाहेब पाटील, पुणे
* अल्टो के१० एलएक्स सर्वोत्तम. यात एसी आहे पण पॉवर स्टीअरिंग नाही. ही गाडी तुम्हाला साडेतीन लाखांत ऑन रोड मिळेल.
* मला कधीतरीच वापरण्यासाठी गाडी घ्यायची आहे. सर्व सुविधांनी उपयुक्त असावी आणि तिचा मायलेजही चांगला असावा. खरेदीनंतरचे विक्रीमूल्यही चांगले असावे.
– सदानंद सावंत, भांडुप
* तुम्हाला ऑटो ट्रान्समिशन कार घ्यायची असल्यास सेलेरिओ एटी ही गाडी घ्यावी. अथवा सहा लाखांत स्विफ्ट ही उत्तम व टिकाऊ गाडी उपलब्ध आहे.
* मला माझ्या वडिलांसाठी यूज्ड कार घ्यायची आहे. माझे बजेट तीन लाख रुपये आहे. माझ्या वडिलांना पाठदुखीचा त्रास आहे. आम्हाला आठवडय़ातून एकदा मुंबई-नाशिक प्रवास करावा लागतो. कोणती कार योग्य ठरेल? यूज्ड कारचं रिनग किती किमी झालेले असावे?
– मयूर कुलकर्णी
* मी शक्यतो तुमच्या वडिलांसाठी उंच कार घेण्याचे सुचवेन. मारुती रिट्झ किंवा वॅगन आर चांगल्या आहेत. तुम्हाला तीन लाखांत वॅगन आर हवी असेल तर दोन-तीन वष्रे वापरलेली गाडी घ्या. कमी किमतीच्या किंवा कमी उंचीच्या गाड्य़ा घेऊ नका.
* माझे बजेट आठ लाख रुपयांपर्यंत आहे. मारुती डिझायर, ह्युंडाई अ‍ॅक्सेंट आणि टाटा झेस्ट यांच्यापकी कोणती गाडी घेणे योग्य ठरेल? यापकी कोणती गाडी मेन्टेनन्ससाठी चांगली आहे? तसेच कोणत्या गाडीचा मायलेज चांगला आहे? एअर बॅग्जची सुविधा आहे का?
– योगेश पाटील
* तुम्हाला एअर बॅग्जसहित डिझेल गाडी हवी असेल तर तुम्हाला टाटा झेस्ट एक्सएमएस ही गाडी योग्य ठरेल. ही गाडी तुम्हाला आठ लाखांपर्यंत मिळू शकेल किंवा मग होंडा अमेझ ही गाडीही चांगली आहे, मात्र तिची किंमत नऊ लाख ४० हजार रुपये आहे. पेट्रोल व्हर्जनमधील गाडी हवी असल्यास डिझायर झेडएक्सआय ही उत्तम गाडी आहे. तिची किंमत आठ लाखांपर्यंत आहे.
या सदरासाठी तुमचे प्रश्न ’ls.driveit@gmail.com वर पाठवा.