प्रत्येक माणसाची आपले स्वत:चे घर असावे ही इच्छा असते, तसेच आपल्याकडे छोटेसे वाहन असावे हीदेखील इच्छा असते आणि आजच्या काळाची गरज आहे. छोटे कुटुंब असेल तर आपल्याकडे चार चाकी गाडी असावी, कधीही कोठेही जाता येते. हा विचार करून गाडी घेण्याअगोदर त्याचे रीतसर शिक्षण घ्यावे हे सोयीचे असते. वयाच्या पन्नशीनंतर गाडी शिकणे तसे जरा कठीण काम होते, कारण अंगाच्या हालचाली कमी होताना दिसतात. प्रयत्न करण्यास काय हरकत आहे हा विचार मनात पक्का केला आणि ट्रेनिंग क्लास लावला.
पहिल्या दिवशी गाडीचे विविध भाग ट्रेनरने दाखविले. गाडी स्टार्ट करण्यापासून क्लच, ब्रेक, अ‍ॅक्सिलरेटरचा उपयोग, हेडलाइट, टेललाइट, उजवीकडे किंवा डावीकडे वळण्यासाठी इंडिकेटरचा उपयोग करणे, गाडी होल्ड करण्यासाठी इंडिकेटर बटन, फ्युअल इंडिकेटर, वायपरचा उपयोग केव्हा करायचा, वळण घेताना क्लच किती प्रमाणात दाबायचा चढणीवर क्लचचा कंट्रोल, हँड ब्रेकचा वापर, गीअर बदलणे, गाडी स्लो करताना क्लचचा व ब्रेकचा वापर, जास्त स्पीड वाढविण्याच्या वेळी गीअर बदलणे, उतरणीवर वेगमर्यादा हे सर्व त्या २१ दिवसांत शिकविले जाते.
आरटीओकडून ट्रेनिंग लायसन्स मिळवायचे, त्यासाठी आरटीओ प्रमाणित परीक्षा घेण्यात येते. ती उत्तीर्ण झाल्यावर परमनंट लायसन्ससाठी अप्लाय करणे, ते मिळविण्यासाठी २-३ महिने वाट पाहावी लागते. या सर्वाची ट्रेनिंग क्लासवाल्याकडून पूर्तता केली जाते. तुमचे ड्रायव्हिंग स्किल तपासण्यात येते, गाडी चालविणे जमत नसेल तर तुम्हाला पुन्हा ती टेस्ट द्यावी लागते. या सर्वासाठी मुख्य म्हणजे आवड असावी लागते. गाडी चालविण्याचे पॅशन असावे लागते.
गाडी घेण्याचे निश्चित केले, थोडा सरावही झाला होता, पण आपण हल्ली पाहतो अनेक अ‍ॅक्सिडंट होतात. ही भीती मनात कोठे तरी होती आणि गाडी आपण स्वत: चालवायची ही भीती मनातून जात नव्हती. त्यासाठी सराव होणे आवश्यक असते. गाडी पूर्ण तुमच्या अंगात भिनली पाहिजे. गाडी चालवताना गाडीशी एकरूप व्हावे लागते. हळूहळू सराव होत गेला. काही दिवस दुसरा ड्रायव्हर बरोबर ठेवला, कठीण प्रसंगी तो सांभाळून घेत असे. गाडी पार्क करताना चिंचोळ्या ठिकाणी ती पार्क करणे, गर्दीच्या रहदारीमध्ये गाडी चालविणे, हायवेवर गाडी चालविणे, रात्रीच्या वेळी गाडी चालविणे, पावसात गाडी चालविणे हे सर्व सरावाने होत जाते. मी मारुती वॉगेनार गाडी आता व्यवस्थित चालवितो.

ड्रायिव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हिंग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा. ls.driveit@gmail.com

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र