’माझ्याकडे सीएनजी वॅगनआर आहे. परंतु मला जर मोठी गाडी घ्यायची असेल आणि तीही सीएनजीवर चालणारी, तर कोणता पर्याय उपलब्ध आहे
– प्रमोद आगाशे
’प्रमोदजी तुम्ही तुमच्या पाठदुखीचा उल्लेख केला आहे. या पाश्र्वभूमीवर तुम्हाला तुमची वॅगनआर योग्य वाटते. तुम्हाला जर मोठीच गाडी घ्यायची असेल आणि तीही सीएनजीवर चालणारी, तर मग तुम्ही इकोचा विचार करावा.
’माझे बजेट चार लाख रुपये आहे. ह्य़ुंडाई ईऑन, शेवरोले स्पार्क किंवा मग मारुती अल्टो यांपकी कोणता पर्याय योग्य ठरेल?
– महेश पाटील, औरंगाबाद
’तीनही उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणती गाडी जास्त आवडते ते ठरवा. तरीही स्पार्कचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्यामुळे तुम्ही शक्यतो या गाडीचा जास्त विचार करावा असे वाटते.
’मी प्रोफेसर आहे. माझ्या कुटुंबात पाच लोक आहेत. येत्या दोन वर्षांत लाँग टाइमसाठी आणि माझ्या कुटुंबाला शोभेल अशी दमदार गाडी घ्यावयाची आहे. सेडान, हॅचबॅक व एसयूव्ही अशा तीनही प्रकारांतील पर्याय सुचवा.
– मकरंद माळी
’तुमच्या कुटुंबात पाचच लोक असल्याने तुम्ही शक्यतो सेडानच घ्या. कारण एसयूव्हीचा मेन्टेनन्स जास्त असतो. सेडानमध्ये मारुतीची एसएक्सफोर चांगली आहे. शिवाय निसानची सनीही चांगली आहे. होंडा अमेझही चांगला पर्याय आहे. एसयूव्हीच घ्यायची असेल तर मग इनोव्हा सर्वोत्तम पर्याय आहे. होंडाची आता बाजारात आलेली मोबिलिओही चांगला पर्याय आहे. मात्र तिला वेटिंग खूप आहे.
’ माझे बजेट साडेचार लाख रुपये आहे. मी पेट्रोलवर चालणारी गाडी वापरू की डिझेलवर? कृपया सांगा. माझे काम शेतीचे असल्याने बहुपयोगी गाडी सांगा.
– विक्रांत ठाणगे, श्रीरामपूर
’पेट्रोलवर चालणारी गाडी केव्हाही चांगली. मेन्टेनन्सच्या बाबतीत तीच योग्य ठरते. तेव्हा तुम्ही शक्यतो पेट्रोलवर चालणारी गाडीच बघा. तुमच्याकडे सध्या मारुती 800 आहेच. तुम्हाला अधिक योग्य ठरणारी गाडी मग टाटांची आहे. याच बजेटमध्ये टाटांची इंडिका येऊ शकते किंवा अधिक खर्च करायची तयारी असेल तर मिहद्राची क्वांटोही तुम्ही घेऊ शकता. मिहद्रा आणि टाटाच्या गाडय़ा जास्त दणकट असतात.