१. इंजिनाच्या  बेिरगमधून आवाज येतो. कारची सव्‍‌र्हिसिंग करून एक वर्ष झाले आहे. बेिरग खराब होण्याचे तेच कारण असेल का ? – दिवाकर पाध्ये, वाशी
– बेिरग खराब होण्याची बरीच कारणे असू शकतात. त्यातील एक हे तुम्ही सांगितलेले असू शकते. बेसिकली इंजिन ओव्हर हिट होणे, इंजिन ल्युब्रिकेशन पद्धत खराब होणे इत्यादी कारणे बेिरगला हानी पोहोचवतात. बेिरग क्लिअरन्स हा एकाच पॉइंटला असावा. त्यापेक्षा जास्त किंवा कमी असल्यास बेिरगचे घर्षण वाढते आणि पर्यायाने हिट निर्माण होते. या हिटमुळे बेिरगची झीज होणे, बेिरग प्रसारण पावणे हे प्रॉब्लेम्स होऊ शकतात.  म्हणून इंजिन बेिरग व्यवस्थित चालण्यासाठी सव्‍‌र्हिसिंग  खूप महत्त्वाची ठरते. बेरिगसाठी केले जाणारे ल्युब्रिकेशन सुद्धा महत्त्वाचे असते. त्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते.

२. हायस्पीड डिझेल म्हणजे काय? साध्या डिझेलपेक्षा त्यात कोणते वेगळे गुणधर्म असतात ? – प्रशांत बोरोले
– हायस्पीड या नावानुसार त्याची वाहनक्षमता जास्त असते म्हणजेच ते वेगाने वाहते. कारण त्याची व्हीस्कोसिटी कमी असते त्यामुळे त्याचे लवकर ज्वलन होते. जास्तीत जास्त उष्णता निर्माण होऊ शकते. आणि पर्यायाने शक्ती निर्माण होते जी साध्या डिझेलपेक्षा जास्त असते.  हायस्पीड डिझेल हे त्वरित प्रज्वलित होते.  जेव्हा स्पार्क प्लग स्पार्क निर्माण करतो तेव्हा अग्नी संपूर्ण इंजिन चेंबर मध्ये वेगाने पसरतो यालाच फ्लेम प्रपोगेशन असे  म्हणतात. हे डिझेल जळल्यावर कमी धूर निर्माण होतो आणि ते न गोठणारे असते जे थंड हवेच्या ठिकाणी उपयुक्त ठरते.

३. कारचे मायलेज कमी झाले आहे.
– सचिन लबडे
– फ्युएल एफिशिएन्सी कमी होण्याची बरीच कारणे असू शकतात. कारचे वयोमान, तिची विशिष्ट काळानंतर किंवा अंतरानंतर केली जाणारी सव्‍‌र्हिसिंग इत्यादी बाबी मायलेजवर मोठय़ा प्रमाणात परिणाम करतात. तसेच फ्युएल इंजेक्टर, फ्युएल पंप सदोष असतील तर इंजिनचे टायिमग चुकते आणि इंजिनमध्ये पुरेशी शक्ती निर्माण न होता इंधनाचा काही भाग वाया जातो. याशिवाय ब्रेक घासला जाणे हे कारण असू शकते. जर ब्रेक ड्रम काही अंशी दाबलेल्या स्थितीत राहत असेल तर इंजिनमधून निर्माण होणाऱ्या शक्तीचा पूर्ण विनियोग होणार नाही आणि कार पूर्ण क्षमतेने वेग घेणार नाही.
मयुर भंडारी
या सदरासाठी तुमचे प्रश्न bmayurm@gmail.com वर पाठवा.