तुमची उंची, तुमचे वय आणि वजन याचा ताळमेळ आहे की नाही हे तपासण्यासाठी अनेक पर्याय असतात. पण याचा ताळमेळ घडविण्यासाठी नेमके काय करणे अपेक्षित आहे याची माहिती आता आपल्याला मोबाइलमध्ये उपलब्ध होऊ शकते. यासाठी ‘मॉनिटर युवर वेट’ हे अॅप तुमची मदत करू शकते. या अॅपमध्ये वय, उंची आणि वजन याची योग्य प्रमाणे देण्यात आली असून ज्यांचे हे प्रमाण योग्य नसेल त्यासाठी योग्य ते पर्यायही सुचविण्या आले आहेत. या अॅपमध्ये एकदा आपण आपली माहिती भरली की हे अॅप आपल्याला वेळोवेळी योग्य त्या गोष्टींची आठवण करून देत असते. याशिवाय अॅपमध्ये बॉडी मास इंडेक्स, दिवसाला किती कॅलरीज आपल्या पोटात गेल्या, एका दिवसात किती वजन कमी केले आणि किती वाढले याचा तपशीलही या अॅपमधून आपल्याला मिळतो. हे अॅप विविध १५ प्रादेषिक भाषांमध्येही उपलब्ध आहे. हे अॅप अँड्रॉइडच्या ३.६.१ या व्हर्जनपासून पुढच्या सर्व व्हर्जनवर उपलब्ध आहे, तसेच आयओएसवरही उपलब्ध आहे.

आयुर्वेद मात्रा : खोकला
वैद्य विश्वास जातेगावकर
hlt05असे का होते?
आयुर्वेदाची चिकित्सा असे सांगते की, वातावरणात हळूहळू ऊब वाढायला लागली की शरीरातील कफ बाहेर पडायला लागतो आणि खोकला होतो.

उपाय काय?
रोज सकाळी उठल्यावर कपभर कोमट / गरम पाण्यात काही थेंब मध किंवा चिमूटभर सुंठ घालून ते पाणी प्यावे. किंवा कपभर पाण्यात सागरमोथा घालून उकळावे आणि ते कोमट करून प्यावे.
यामुळे काय होते?
बाहेर पडणारा कफ असे केल्याने शरीरातच जिरतो. त्यामुळे खोकल्यासारख्या व्याधी होत नाहीत.

काय काळजी घ्यावी?
या कालावधीत आवर्जून करावयाची गोष्ट म्हणजे- व्यायाम. आपण व्यायाम करत असाल तर तो वाढवत न्यावा. त्यामुळे कफ शरीरात जिरण्यास मदत होते.

मोजमाप आरोग्याचे : एचआयव्ही-एड्स रुग्णांची संख्या
hlt04

आयुर्विचार
hlt03 प्रत्येकाने निरोगी राहणे गरजेचे आहे. ज्या देशात निरोगी नागरिक आहेत, तो देश खऱ्या अर्थाने समृद्ध आहे, असे म्हणता येईल. निरोगी नागरिक हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे.
विन्स्टन चर्चिल