१९ ४४ साली लियो कानर नावाच्या संशोधकाने मुलांमधील असाधारण विकासावर (atypical development) संशोधन केले. त्याला ‘इन्फन्टाइल ऑटिझम’ असे नाव दिले. त्या वर्णनात या मुलांची तीन वैशिष्टय़े नमूद केली – संपर्क साधण्यात अडचणी, संपर्क साधण्याच्या असाधारण पद्धती आणि ठराविक प्रकारच्याच गोष्टींबद्दल अतिजिव्हाळा. आजही याच तीन लक्षणांवरून या स्थितीचे निदान केले जाते. बहुतेकवेळा तीन वर्षांच्या पूर्वीच याचे निदान होते. ऑटिझम हा क्वचित घडणारा प्रकार आहे.  
गर्भावस्थेत किंवा जन्माच्या वेळी मुलामध्ये कोणतेही शारीरिक किंवा मज्जातंतूचे व्यंग दिसून येत नाही. काही महिन्यांनी हे मूल इतर मुलांसारखे आईकडे बघून पटकन हसत नाही, आपुलकी दाखवत नाहीत. कुणाच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे किंवा नजरेला नजर भिडवण्याचे ते मुद्दाम टाळत असल्याचे वाटते. त्यांचे बोलणे उशिरा किंवा विचित्र असते. बोलताना रुक्षपणा जाणवतो, किंवा काही ठराविक शब्द- ओळी परत-परत बोलतो किंवा कधीतरी ऐकलेले शब्द पुन्हा पुन्हा बोलले जातात. विशेष म्हणजे कुठल्याही वस्तूकडे बोट करून त्याला निर्देश करता येत नाही.  
त्याच्याशी खेळायला गेले तर कुटुंबीयांकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे बहुतेक वेळेला पालकांना मुलाला ऐकू येत नसल्याचा संशय येतो. कधी कधी संवाद साधायला गेलेल्या कुटुंबीयांचा जोरात रडून- मारून विरोध करतो. मग त्याचा स्वभाव विक्षिप्त आहे असे समजून पालक त्याच्याशी कसेतरी जुळवून घेऊ लागतात. रोजच्या दिनक्रमात, वापरणाऱ्या वस्तूत, घटनेत थोडाही बदल झाला तर ते खूप अस्वस्थ होतो. त्यामुळे त्याला कुठे घेऊन जाणे कठीण होते.
लपाछपी, टाळी देणे- घेणे असे प्रतिक्रियात्मक खेळ त्यांना आवडत नाही आणि गोष्टी देखील ते क्वचित ऐकतात. खेळण्याची आदळाआपट करणे, त्यांच्याकडे पाहत राहणे असे वेगळ्या प्रकारे खेळतात. काही मुलांना तासन्तास कुठे तरी एकटक पाहत राहणे, गोल-गोल फिरणे, पळत राहणे किंवा हातापायाच्या हालचाली करत राहण्याची सवय लागते. आवाज, स्पर्श आणि विशिष्ट पोत सहन होत नाहीत. आई-बाबा, टीचर – टीचर सारखे कल्पनात्मक खेळ त्यांना खेळता येत नाही. अर्थातच या मुलांना शाळेत आणि शेजारी खूप कमी मित्रमत्रिणी होतात. हा प्रकार वाढत गेल्यामुळे आपल्या मुलात काय समस्या आहे याचा शोध आई-वडील घेऊ लागतात.
बहुतेक वेळेला प्राथमिक चाचण्या नॉर्मल येतात. बुद्धय़ांक, गतिमंदता किंवा मतिमंदता दाखवली जाते. बऱ्याच मुलांमध्ये आकडी असू शकते. त्याचे पुरेसे निरीक्षण केल्यावर त्याच्या वागण्यातील वैशिष्टय़ दिसून येतात. या निरीक्षणावर आधारूनच निदान केले जाते.  
ऑटिझम होण्याची नेमके कारण क्वचितच समजतात. गर्भावस्थेत वाढणाऱ्या पेशींना क्षती पोहोचलेली असते. गर्भावस्थेत याचे निदान करणे अशक्य असते. ऑटीझमसाठी औषध देता येत नाही. त्यातील विशिष्ट लक्षणांसाठी काही प्रमाणात औषध दिले जाते. मानसोपचार उपचारपद्धती यावर अधिक योग्य ठरते. समाधानकारक सुधारणा होण्यासाठी प्रत्येक आठवड्यात ४० ते ५० तास थेरपी द्यावी लागते. जनसंपर्काची ओढ समाजात राहण्यासाठी खूप महत्त्वाची असते. ऑटिझममध्ये मुलात हेच बिघडलेले असल्यामुळे या व्यक्तींना जन्मभर काही ना काही अडथळे- अडचणी येत जातात. त्या- त्या वेळेला त्याचे आणि त्यांच्या कुटुंबीयाचे मार्गदर्शन करावे लागते. काम- नोकरी करू शकले तरी लग्नसंबंध करण्यात ते असमर्थ ठरू शकतात; त्यामुळे याबाबत खात्री केल्याशिवाय त्यांचे लग्न करू नये. असाधारण व्यक्तिमत्त्व असल्यामुळे असाधारण जीवन असते- हे लक्षात ठेवून पालकांनी या व्याधीसाठी पूर्ण उपचार करावे आणि वेळो-वेळी तज्ज्ञांचे सहाय्य- सल्ला घेऊन त्यांची पूर्ण मदत करावी.
डॉ. वाणी कुल्हळी -vanibk@rediffmail.com

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
changes in temperature and inflation marathi news, temperature change impact on inflation marathi news
विश्लेषण : उष्णतेच्या झळांमुळे अन्नधान्य महागाई? नवीन संशोधनामध्ये कोणते गंभीर इशारे?
Human evolution explained
विश्लेषण: केसांमधील उवांचा आणि माणसाच्या अंग झाकण्याचा काय संबंध? उत्क्रांतीचा इतिहास व नवे संशोधन काय सांगते?