चंचल मुले सर्वानाच आवडतात. पण मुलांमध्ये अतिचंचलपणा दिसून आला तर ते मानसिक आजाराचे लक्षण आहे. अतिचंचल मुलांच्या सर्व हालचाली तात्काळ व अविचारी असतात. एका ठिकाणी न बसणाऱ्या, सतत मस्ती करणाऱ्या या मुलांचा त्रास त्यांच्या पालकांना अधिक होतो.
मुलांमधील अतिचंचलपणा हे त्यांना मानसोपचारतज्ज्ञाकडे नेण्याचे सर्वाधिक प्रमाणात दिसून येणारे कारण आहे. साधारण 3 ते 5 टक्के मुलांचा चंचलपणा इतका जास्त असतो की, त्याचे उपचार गरजेचे होऊन जातात. चंचलपणाचे परिणाम मुलांच्या वागण्यावर पडतातच, पण त्यामुळे संपूर्ण कुटुंबामधील शांतीही हरवून जाते. उपचार केल्याने मुलांमध्ये चांगली सुधारणा होऊ शकतो.
अतिचंचलपणा असणारया मुलांच्या सर्व हालचाली तात्काळ (सडन), खूप जास्त प्रमाणात (एक्सेसिव्ह) आणि अविचारी (थॉटलेस) असतात. ते मूल सतत धावत, काहीतरी करत, चढत, उडी मारत राहते. काही सांगायला गेले तर पटकन राग येतो आणि हट्टीपणाही खूप असतो. त्याची एकाग्रता कमी असते. एका ठिकाणी थोडाही वेळ टिकून राहता येत नसल्याने त्याच्या मागे धावून भरवावे लागते, धावत्या मुलाचे कपडे बदलावे लागतात. या मुलांची झोप कमी असते. भित्रेपणा कमी असल्याने रस्त्यावर पळणे, अनोळखी माणसांशी बोलणे, आगीजवळ जाणे आणि प्राण्याशी खेळणे, असे प्रकार वारंवार होतात.
शाळेत मूल एके ठिकाणी बसू शकत नाही. अभ्यास, कला किंवा खेळाच्या कुठल्याही प्रकारात त्याचा सकारात्मक सहभाग नसतो. दुसरया मुलांना ढकलत, मारत, बडबड- चाळे करत राहतो म्हणून इतर मुलांशीही त्याचे जुळत नाही. कालपरत्वे मुलाचा शारीरिक चंचलपणा कमी होत जातो, पण एकाग्रतेत सुधारणा होत नाही. ही मुले तासनतास टीव्ही किंवा संगणकासमोर बसू शकतात कारण त्यात एकाग्रता लागत नाही. मूल शांत दिसत असले तरीही त्याला त्रास होत राहतो. मुलाचे आरोग्य आणि बुद्धी चांगली असते, पण गरवर्तवणूक आणि अभ्यासामध्ये लक्ष नाही- त्यामुळे त्याच्या वृत्तीवर संशय घेतला जातो. मुलाला कडक शिक्षा केली जाते किंवा त्याउलट त्याच्याबद्दलच्या सर्व अपेक्षा सोडून त्याला वाया जाऊ दिले जाते.
मेंदूच्या एकाग्रता देणारया भागाचा मंदगतीने विकास होणे, हे चंचलतेचे मूळ कारण असते. बहुतेक वेळेला हे अनुवांशिक असते. मेंदूची वाढ झाल्याने, चंचलपणा आपोआप कमी होत जातो. चंचलपणाचे काही कारण सापडले तर त्याचे उपचार केल्याने ते निघून जाते- उदा. आकडी. चंचलपणाचे प्रमाण थोडे कमी असेल आणि मूल लहान असेल तर पालकांचे समुपदेशन केले जाते. एकाग्रता वाढवण्यासाठी मुलाकडून काही प्रकार नियमितपणे करून घेणे, गरवृत्ती?असून दूर ठेवणे या गोष्टी पालकांना शिकवल्या जातात. या गोष्टी मुलांसाठी 4 वर्षांच्या आधी आणि रोज सातत्याने कराव्या लागतात. घरातील आयाबाईना/ आजी-आजोबाना सांगून, पाळणाघर किंवा शाळेत पाठवून, फक्त मुलाला समुपदेशन करून हे साध्य करता येत नाही. पालकांना स्वत यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मुलाच्या दृष्टीने लहान वयातच पालकांनी मेहनत घेणे हा पर्याय सर्वोत्तम आहे.
जर पालकांना पुरेसा वेळ नसेल किंवा चंचलपण खूप जास्त प्रमाणात असेल तर त्याला औषध देता येते.??? वर्षांच्या आधी औषध देणे खूप क्वचित. मिथाईल्फेनिडेट नावाचे औषध अगदी सुरक्षित आणि प्रभावशाली आहे. ते दिल्यानंतर काही मिनिटातच मुलाची एकाग्रता वाढते आणि वागण्यात सुधारणा होते. ही सुधारणा साधारण 6-7 तास टिकून राहते. त्यामुळे शाळेच्या वेळेतच हे दिले जाते. याशिवाय वागणुकीच्या तक्रारीसाठी पालकांना आणि मुलालाही समुपदेशन केले जाते. मुलाची एकाग्रता नसíगकपणे विकसित होईपर्यंत औषध दिले जाते. 25 टक्के मुलांना मोठेपणीही औषध घ्यावे लागू शकते. मात्र हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे. मोठेपणी चंचलपणा आपोआप कमी होईल म्हणून त्याचे लहानपणी उपचार टाळण्याकडे काही पालकांचा कल असतो. मात्र यामुळे मूल अभ्यासात मागे पडते आणि त्याला गरवागणुकीची सवय लागते. मोठेपणी त्याचा चंचलपणा कमी झाला तरी अभ्यासातली उणीव आणि वागणुकीच्या समस्या दुरुस्त करणे शक्य होत नाही. आपल्या क्षमतेनुसार त्यांना यश, सन्मान, आदर मिळत नाही. त्यांच्यात उदासीनता, आक्रमकता, अंमली पदार्थाच्या सेवनाची आणि नातेसंबंधांमधील त्रास असे प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच आपोआप कमी होणारे त्रास असले तरीही त्याचा उपचार लहानपणीच करायला हवा.