‘आवाज’ (VOICE) आणि ‘वाचा’(SPEECH) यात एक मूलभूत फरक आहे. आवाजाच्या निर्मितीसाठी स्वरयंत्र (LARYNX)) आणि वाचेच्या निर्मिती साठी शब्द उच्चारणासाठीचे अवयव म्हणजे ARTICULATORS हे महत्वाचे असतात. बहुधा आपण आवाज म्हणजे वाचा अशी गल्लत करतो.
‘आवाज’ आणि ‘वाचा’ यांचा परस्पर संबंध समजून घेण्यासाठी आधी आवाजाची निर्मिती कशी होते हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. एखाद्या तंतुवाद्याप्रमाणेच आपल्या शरीरातही तीन सिस्टिम्स असतात, ज्या आवाजाच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतात. ‘श्वसनाची संस्था’, ‘स्वरयंत्र’ व ‘तोंडातील अवयव व नाकातोंडातील पोकळय़ा.’ चांगल्या आवाजाच्या निर्मितीसाठी या तिन्ही पद्धती शारीरिक स्तरावर निरोगी व तंदुरुस्त असणे अतिआवश्यक असते.
फुफ्फुसांकडून पुरवल्या जाणाऱ्या हवेमुळे स्वरतारांमध्ये कंपने होतात व ध्वनीलहरींची निर्मिती होते. या ध्वनीलहरी घशाच्या मार्गाद्वारे तोंडात जातात व तोंडातील जीभ, दात, ओठ इत्यादी अवयवांद्वारे तसेच वेगवेगळया पोकळटय़ांद्वारे या ध्ननिलहरीनां एक आकार प्राप्त करुन दिला जातो व ‘वाचे’ची निर्मिती होते. यावरुन आपल्या लक्षात येईल की, आपल्या आवाजाच्या निर्मितीची खरी सुरुवात ही आपल्या ‘श्वसनसंस्थे’ पासून होते आणि ही प्रक्रिया पार आपल्या ओठातून शब्द बाहेर पडेपर्यंत सुरू असते म्हणजेच जेव्हा आपला आवाज  खराब होतो, त्यावेळी फक्त स्वरयंत्र किंवा घशामध्येच काही त्रास असतो, ही आपली समजूत पूर्णपणे चुकीची आहे.
श्वसनसंस्था, स्वरयंत्र व घशावरील RESONATORY सिस्टिम्स या तिन्ही सिस्टिमपकी एक किंवा जास्त सिस्टिममध्ये काही इजा अथवा आजार झाला असल्यास किंवा या तिन्ही सिस्टिम शारीरिक स्तरावर उत्तम आहेत, परंतु आपण त्यांचा आयोग्य पद्धतीने वापर करीत असलो, तर त्याचा परिणाम ‘आवाजाच्या गुणवत्ते’ वर होतोच होतो.
साधारणत आवाजाच्या तक्रारी या पुढीलप्रमाणे असतात
१    आवाज बसणे.
२    आवाज घोगरा होणे.
३    आवाज चिरका होणे अथवा आवाज फाटणे.
४    मोठय़ाने बोलताना घशात अथवा गळयात वेदना होणे.
५    घशात अडकल्यासारखे वाटणे व आवाज खरखरीत होणे.
६    एका श्वासात मोठे वाक्य बोलता न येणे, श्वास लागणे.
७    मोठय़ाने बोलता न येणे.
८    नाकातला आवाज येणे (Hyper / Hyponasal voice)
९    मुलाचा आवाज मुलीसारखा अथवा मुलीचा आवाज मुलासारखा असणे.
१०    गायक, अभिनेते, राजकीय नेते, रेडियो जॉकी, वकीलयांना मनासारख्या आवाजाच्या पट्टीत परफॉर्म करता न येणे, मनासारखा आवाज न लागणे.
११     घरात लहान मुलांवर ओरडून ओरडून आईचा आवाज बसतो (Hassled Mother’s Voice))
या व अशा प्रकारच्या आवाजाच्या इतरही तक्रारींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. कारण आपल्या आवाजात होणारा सूक्ष्म बदलही शरीरातील काही महत्त्वाच्या घडामोडींची नांदी असू शकतो. तो प्रत्येक वेळी कॅन्सरच असतो, असे अजिबात नाही. पण ती एक शक्यता नाकारताही येत नाही आणि म्हणून वेळेत तपासणी करून घेणे हे अतिआवश्यक ठरते. आवाजाच्या संबंधित जवळजवळ ८० टक्के व्याधी व तक्रारी या बिनाशस्त्रक्रियेच्या दूर केल्या जाऊ शकतात. पण त्यासाठी रुग्णांनी वरील सांगितलेली कुठलीही तक्रार ही अंगावर न काढता लवकरात लवकर तज्ज्ञांना म्हणजेच ईएनटी डॉक्टर व वॉईस थेरापिस्टना  भेटून तपासणी करून घेणे आवश्यक असते. जितका जास्त उशीर तितकी शस्त्रक्रियेची शक्यता वाढत जाते.
आवाजाच्या अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास, त्यास या तिन्ही सबसिस्टिम्सच्या त्याच प्रमाणे शरिराच्या अजून काही व्याधी या ढोबळमानाने कारणीभूत असू शकतात.

अप्रत्यक्षरित्या आवाजावर परिणाम करणाऱ्या शारिरिक व्याधी व बदल
’ उच्च रक्तदाब व ह्रदयविकार
’ मधुमेह
’ थायरॉईड
’ हार्मोनल बदल (विशेषत स्त्रियांमध्ये)
’ पोटाचे विकार (अपचन, अ‍ॅसिडीटी इ.)
’ स्नायुंचे विकार (विशेषत मानेचे)
’ मानसिक व्याधी व कारणे

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना

वॉकल अब्युज, वॉकल मिसयुज
’ ओरडणे, किंचाळणे,घसा ताणून बोलणे.
’ एका श्वासात लांब लांब बोलणे.
’ खोकणे,उलटया काढणे.
’ दुसऱ्या च्या आवाजाची नक्कल करणे.
’ सतत बोलणे.
’ धुम्रपान व मदयपान इत्यादी

तपासणी :
    तपासणी ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून होणे व वेळेत होणे हे अतिशय आवश्यक आहे. आवाजातला छोटय़ातल्या छोटय़ा बदलालाही सहज घेऊ नका. तेंडाच्या, घशाच्या, श्वसननलिका तसेच स्वरयंत्रांच्या त्वचेच्या रंगात झालेला फरकही कर्करोगाचे लक्षण असू शकते. यास्तव या सर्व भागाची दूर्बणिीद्वारे तपासणी होणे (Endoscopic Examination) गरजेचे असते. वरवरच्या तपासणीने हे सूक्ष्म बदल लक्षात येणे कठिण असते. रिजिड लॅिरगोस्कोपी, फ्लेक्झिबल लॅिरगोस्कोपी, स्ट्रॉबोस्कोपी तसेच हाय स्पिड इमेजिंग अशी अनेक उपकरणे आता अद्यावत ई.एन.टी. तसेच वॉईस क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. या शिवाय लंग फंक्शन टेस्ट, स्पायरोमेट्री, कॉम्प्युटराईज्ड वॉईस अ‍ॅनालिसिस या तपासण्याही अतिआवश्यक आहेत. गरज भासल्यास तुमचे डॉक्टर तुम्हाला अधिक तपासणी व माहितीसाठी न्युरॉलॉजिस्ट, रेस्पिरेटरी फिजिशयन, ह्रदयरोगतज्ञ, एन्डोक्रायनॉलॉजिस्ट, सायकिएट्रिस्ट या व अशा इतर तज्ज्ञांकडे पाठवू शकतात.
एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे उपाय हे ‘आवाज बदललाय’ यावर होण्यापेक्षा ‘आवाज का बदललाय’ ते शोधून मग मूळ कारणावर केले गेले पाहिजेत. या सर्व तपासण्या या उपचारांचा अतिशय महत्वाचा भाग आहेत.
उपचार :
आवाजाच्या सर्व समस्यांवरील उपचारांचा अविभाज्य भाग म्हणजे वॉईस थेरापी. ऑपरेशन न करता स्वरयंत्राच्या व्याधी व आवाजाच्या समस्या सोडवणारी उपचार पद्धती म्हणजे वॉईस थेरापी. आवाज निर्मितीच्या तिन्ही सबसिस्टिममधील बॅलन्स पूर्ववत करणे, सिस्टिम्स अतिशय प्रभावी व्यायाम पद्धतीने अधिक समक्ष व मजबूत करणे, जेणेकरुन भविष्यात परत असा त्रास होऊ नये, आवाजाची गुणवत्ता सुधारणे, आपल्या आवाजाच्या रेंजचा जास्तीत जास्त आणि सुरक्षित वापर कसा करता येईल ते प्रशिक्षण देणे या सर्वाचा या उपचारपद्धतीत अंतर्भाव होतो.
ज्या व्याधींसाठी औषधोपचार व शस्त्रक्रिया हेच उत्तर आहे. अशा स्वरयंत्राच्या व्याधींसाठीही शस्त्रक्रियेआधी व नंतर वॉईस थेरपी उपचार आवश्यक असतात, जेणेकरुन शस्त्रक्रियेचा परिणाम अधिक परिणामकारकरित्या मिळू शकतात, तसेच Relapse किंवा Recurrence चे प्रमाणही कमी होते.
आवाज हा ज्यांच्या व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे, अशा सर्वानी वर्षांतून एकदा तरी आवाजाचा व स्वरयंत्राचा तपास करून घेणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे आवाजाची यंत्रणा अधिक समक्षपणे काम करावी यासाठी वॉकल वॉर्म अप, श्वासनाचे व्यायाम इत्यादी करणे हा दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे हे अतिशय गरजेचे आहे.
शास्त्र दिवसेंदिवस प्रगत होत चालले आहे. अधिकाधिक आरोग्यविषय सुविधा आपल्याला हाताच्या अंतरावर अतिशय सहज उपलब्ध होत आहेत. आवाजात होणाऱ्या बदलांबाबत सावध रहा, त्याची काळजी घेतलीच गेली पाहिजे आणि वेळीच काळजी घेतली तर भविष्यात काळजी करावी लागत नाही. म्हणून या उपलब्ध सुविधांचा वेळीच फायदा घ्या कारण.. मेरी आवाजही मेरी पहचान है!

१.श्वसनसंस्थे संबंधित व्याधी      –    अप्पर रेस्पिरेटरी टेक इन्फेक्शन   (URTI)    
    –    फुफ्फुस्साचे विकार फुफ्फुस्साचे विकार     
            (Restrictive / Obstruction)(Restrictive / Obstruction)    
            अस्थमा / दमा/ क्षयरोग इ.अस्थमा / दमा/ क्षयरोग इ.    
            फुफ्फुसाचा किंवा इतरफुफ्फुसाचा किंवा इतर    
            भागाचा कॅन्सर इत्यादी    
२. स्वरयंत्र संबंधित व्याधीस्वरयंत्र संबंधित व्याधी    –    स्वरतारांना सूज येणे, रक्तस्त्राव होणे    
    –    कॅन्सरची नसलेली गाठ, (वॉकल नोडुल, पॉलिप, सिस्ट)    
    –    स्वरतारांचा पॅरॅलिसिस     
    –    स्नायूंमध्ये अतिताण येणे    
            (Muscle Tension  Dysphosia)     
    –    न्युरॉलॉजिकल व्याधी- (pastic Dysphosia,         Myasthenia  gravis, Parkinson’s etc.)    
    –    कॅन्सरच्या गाठी इ.    
३. तोंड, नाक व घसा (Resonatory System )संबंधित व्याधी    
–    टाळुचे विकार (Cleft palate, High Arch Palate etc)
–    नाकाचे विकार (Deviated Nasal Septum, Nasal     Polyp etc.)                –    टाळूचा पॅरॅलिसिस (Palatal Palsy))
    –    सायनस चे विकार
    –    घसा व नाकाचे (Viral infection) इत्यादी