असे का होते?
उष्ण हवामानामुळे शरीरातील उष्मा ही वाढतो. तसेच कमी होत असलेल्या द्रवांशामुळे त्यात आणखीनच भर पडते.
काय करावे?
चंदन , वाळा, धने, ताजा गुलाब हे पाण्यात भिजत घालून सकाळ संध्याकाळ घ्यावे. काळे मनुके, तुळशीचे बी, अंजीर रात्री पाण्यात भिजत ठेवून सकाळी खावे. दूध तूप यांचा वापर करावा.
यामुळे काय होते?
शरीरातील उष्मा कमी होतो व शरीर थंड राहते. शरीरातील द्रवांशाचा समतोल राखला जातो.
इतर काळजी काय घ्यावी?
* तिखट खारट पदार्थ टाळावेत.
* तळपाय व हाताला तूप लावून काशाच्या वाटीने घासावे.
* चंदन, दूर्वा यांचा लेप लावावा.