व्यसन सुटेल का?
प्रत्येक अमली पदार्थ मेंदूच्या विशिष्ट भागावर परिणाम करतो आणि त्याने विशिष्ट परिणाम होतो. काही पदार्थामुळे मन शांत वाटून भीती कमी वाटते. काही पदार्थानी उत्साह आणि स्फूर्ती वाढते. बहुतेक अमली पदार्थ घेतल्यावर मेंदूमधील ‘डोपामिन’ नावाचे द्रव्य वाढते. हे द्रव्य बक्षिसासारखे काम करून व्यक्तीला आनंदी करतात म्हणून तो पदार्थ परत घ्यावासा वाटतो. सातत्याने अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे मेंदूमधील ‘सिंगलेट गायरस’चे काम कमी होते (सिंगलेट गायरस हे भावना निर्मिती, शिकणे आणि आठवणींशी निगडित काम करते) आणि त्यामुळे पदार्थाची सवय लागते. आनुवंशिकतेमुळेही काही व्यक्तींना व्यसन लागण्याची शक्यता असते. मानसिक आणि शारीरिक आजारांमध्ये अमली पदार्थ वापरण्याचे प्रमाण वाढते. व्यसनाधीन होण्यामागे मेंदूची ठेवण आणि मेंदूमधील बदल हे महत्त्वाचे असल्यामुळे जागतिक आरोग्य संस्थेने व्यसनाला मानसिक आजार ठरवले आहे.
समाज आणि व्यसन
अमली पदार्थ घेणे हे त्याची उपलब्धता आणि सामाजिक मान्यतेवर अवलंबून असते. काही व्यक्ती झोप, भूक, थकवा, शारीरिक दुखणे, पचन, लंगिक क्रिया यांचा त्रास कमी करण्यासाठी अमली पदार्थ घेतात. मानसिक ताण- तणाव, राग, दुख, आनंद यासारख्या मन:स्थितीतही या पदार्थाचा वापर केला जातो. या घटनांवेळी अमली पदार्थ घेणे बऱ्याचदा गर समजले जात नाही. काही सामाजिक आणि धार्मिक कार्यातही अमली पदार्थ घेण्याची प्रथा आहे. थोडय़ा प्रमाणात नियमितपणे दारू घेतल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते, अशक्तपणा आणि थंडी वाजणे कमी होते असे काही गैरसमज आहेत. आजकाल दारू घेणे हे ‘स्टेट्स’साठी जरुरी झालेले आहे.
अमली पदार्थ कोणते?
दारू, तंबाखू आणि चरस हे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाणारे अमली पदार्थ आहेत. तंबाखूचे उत्पादन आणि सेवन करण्यात महाराष्ट्र अग्रगण्य आहे. हे पदार्थ सर्व धर्म, जाती, स्तर, व्यवसाय, स्त्री आणि पुरुष घेताना आढळतात. कोकेन, हेरॉइनसारखे पदार्थ निवडक गट घेतात. अलीकडे उग्र वास येणाऱ्या रसायनांचाही वापर वाढत आहे. वैद्यकीय औषधे जसे झोपेची, खोकल्याची, अंगदुखीची, पोट साफ करण्याच्या औषधांचेसुद्धा व्यसन वाढलेले आहे.
यावर उपचार काय?
व्यसनाधीन व्यक्तीची संमती आणि इच्छा असल्याशिवाय त्यांना व्यसनमुक्त करणे अशक्य आहे. व्यसनी व्यक्तीच्या नकळत जेवणातून औषध देऊन त्याला बरे करणे हे धोक्याचे, बेकायदेशीर आणि निरुपयोगी असून अशा प्रकारच्या जाहिराती चुकीच्या असतात. फक्त काही पदार्थाच्या बाबतीत असे उपचार करण्याची कायद्यात तरतूद आहे. उपचारासाठी औषध आणि मार्गदर्शन दिले जाते. काही व्यक्तींना यासाठी विशिष्ट रुग्णालयात म्हणजे व्यसनमुक्ती केंद्रात राहावे लागते. त्यानंतर निदान एक-दोन वर्षांसाठी व्यक्तीचे आणि कुटुंबाचे समुपदेशन केले जाते. अमली पदार्थ सोडलेल्या व्यक्तीकडून समुपदेशन मिळाले तर ते सर्वात जास्त परिणामकारी असते. व्यसनमुक्त होण्यासाठी एकदाच उपचार करून भागत नाही, ते परत परत करावे लागतात. खरे तर यामुळे निराश न होता, चिकाटीने उपचार चालू ठेवावे.
टाळलेलेच बरे!
बहुतेक वेळेला अमली पदार्थाची सवय लहानपणी सुरू होते, कारण लहान मुलांना अमली पदार्थ घेऊन मोठे झाल्यासारखे, काही तरी नवीन केल्यासारखे किंवा मित्रांचा मान मिळवल्यासारखे वाटते. आनुवंशिकता किंवा मेंदूची ठेवण कशीही असली तरी अमली पदार्थ मिळालेच नाहीत तर व्यसन टळू शकते. व्यसन लागले की जन्माचा ग्राहक मिळतो आणि लहान मुले लवकर भूलतात म्हणूनच अमली पदार्थ बनवणारे लहान मुलांना आपल्याकडे आकर्षति करण्यावर खूप भर देतात. भरपूर जाहिरात केली जाते. पदार्थाच्या नावाचे जणू पाठांतर करून घेतले जाते. मुलांना पदार्थाकडे आकर्षति करण्याच्या या पद्धती आहेत. याबद्दल पालकांनी जागरूक राहून त्या संदर्भातून मुलांना बाहेर काढले पाहिजे. शाळा – घराच्या परिसरात पदार्थ विकला जात आहे का, याकडे लक्ष ठेवायला हवे. अमली पदार्थाच्या समस्येकडे गांभीर्याने पाहावे आणि त्याबद्दल मुलांना योग्य माहिती द्यावी. हा मानसिक आजार आहे. पूर्णपणे टळू शकतो आणि तो टाळणेच परवडण्यासारखे आहे.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात