वृद्धापकाळामुळे होणारे मेंदूतले बदल

मेंदूच्या पेशी कमी होत जातात. मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होत जातो. स्कॅनमध्ये पाहिले तर मेंदूच्या सुरकुत्या कमी झालेल्या दिसतात आणि पाण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते. मेंदूचे वजन कमी होत जाते आणि ८० वर्षांपर्यंत जवळ जवळ १५ ते १८ टक्के वजन कमी होते.
या बदलांमुळे वृद्धपणी स्मृती कमी होते, बौद्धिक काम करण्याची गती कमी होते. नावं, शब्द पटकन आठवत नाहीत आणि ठेवलेल्या गोष्टी सापडत नाहीत. शरीराच्या हालचाली हळू होत असल्याने कामांना जास्त वेळ लागतो. हे बदल खूप हळूहळू घडतात आणि त्याने होत असलेल्या त्रासाची सवय होते किंवा त्यासाठी पर्याय शोधले जातात. उदाहरण : विसरू नये म्हणून यादी करण्याची सवय करणे,  किंवा उशीर होऊ नये म्हणून खूप आधीपासून तयारी करायला घेणे, असे केल्याने ज्येष्ठ नागरिक परावलंबी होत नाहीत.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
Electrolyte-rich drinks in summer is good for health
उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये फायदेशीर; डिहायड्रेशन दूर करण्यासाठी तज्ज्ञांच्या खास टिप्स

मेंदूसाठी आहार
मेंदूत ७० टक्के पाणी असते. पुरेसे पाणी प्यायल्याने मेंदूचे आरोग्य नीट राहण्यास मदत होते. (वृद्धांचे दात खराब झाल्याने त्यांना कच्च्या भाज्यांचे सलाड किंवा फळांच्या फोडी खाण्याची सवय नसते. पण फळभाज्यांचे बारीक कीस करून किंवा अगदी थोडे वाफवून तरी ते खाल्ले पाहिजे. त्यातून मिळणारे जीवनसत्त्व आणि धातू मेंदूसाठी गरजेचे असतात.) मात्र त्यात मीठ, तेलाचे प्रमाण कमी असावे. तेल आणि मिठाने रक्तवाहिन्यांवर विपरीत परिणाम होऊन मेंदूचा रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. मेंदूसाठी फॅटी असिड खूप चांगले असते, ते अक्रोड आणि मासे यांमध्ये जास्त प्रमाणात असते.
तंबाखू, दारू आणि इतर अमली पदार्थ मेंदूसाठी विषारी असतात. कुठल्याही परिस्थितीत थोडय़ाही प्रमाणात या पदार्थाचे सेवन करू नयेत. झोपेच्या गोळ्या डॉक्टरना सांगितल्याप्रमाणेच घेतल्या पाहिजेत.
मेंदूचे व्यायाम
शारीरिक व्यायाम नियमित केल्याने मेंदूमध्ये काही चांगली द्रव्ये तयार होतात. त्याने मेंदूचे भावनात्मक (ीे३्रल्लं’) आजार होण्याची शक्यता कमी होते. त्याशिवाय हृदय आणि रक्तवाहिन्या चांगल्या राहतात आणि मेंदूला चांगला रक्तपुरवठा होतो.
मेंदूला बौद्धिक व्यायामाचीही गरज असते. रोजच्या कामांपलीकडे जाऊन मेंदूला आव्हान देणे जरुरी आहे. नवीन पुस्तके वाचणे, कोडे सोडवणे, कुणाला शिकवणे, काहीतरी नवीन शिकणे, आपले काही छंद असतील तर ते जोपासणे. या सर्व गोष्टींमुळे मेंदूमध्ये नवीन जाळ्या (ल्ली३६१‘२) तयार होतात आणि पेशींचे काम चांगले होते.

प्रतिबंधात्मक उपाय
रक्तदाब, मधुमेह, मूत्रिपडाचे आजार नियंत्रणात ठेवल्याने मेंदूवरचा धोका टाळता येईल. वृद्धांचा मेंदू छोटा झालेला असल्याने त्याची कवटीमध्ये जास्त हालचाल होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहानशा धक्क्यानेही त्यांच्या मेंदूला गंभीर मार बसू शकतो. हे लक्षात घेऊन दुचाकी वाहनावरून जाताना जपून जावे आणि डोक्याला मार लागला असेल तर लवकर तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
अवयव बिघडल्याने शरीरातले प्रत्येक अवयवाचे प्रत्यारोपण करू शकतो. मेंदूचे मात्र तसे नाही. त्यामुळे आपला मेंदू सांभाळून ठेवण्याशिवाय पर्याय नाही.