कसकस, थंडी-ताप, कमी-जास्त प्रमाणात येणारा ताप, विशिष्ट वेळेत येणारा ताप, मुरलेला ताप.. तापाचे असे विशिष्ट प्रकार. सध्याच्या वातावरणात ताप येण्याचे प्रमाण खूप आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. ताप हा विकार नसून, ते एखाद्या विकाराचे लक्षण आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास जिवावरही बेतू शकते.
ताप म्हणजे नेमके काय?
शरीराचे तापमान एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेले की ताप येतो. तापाची व्याख्या आपण शारीरिक तापमान नियंत्रित ठेवणे अशी करू शकतो. खरे म्हणजे ताप येणे हे चांगले लक्षण आहे. ताप येणे म्हणजे प्रतिकारशक्ती येणे. मात्र ३७ अंश सेल्सिअस या शारीरिक तापमानाच्या मर्यादेपलीकडे तापमान गेल्यास ताप येतो.

तापाचे विविध प्रकार
ताप किती आहे, यापेक्षा तो कोणत्या कारणामुळे आला आहे, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अनेकदा १००अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास आपण खूप ताप आहे, असे संबोधतो. मात्र तापाचे नेमके कारण काय याचे निदान होणे आवश्यक आहे. त्यानुसारच पुढील उपचार करता येतील.
१. विषाणुजन्य ताप
तापाचा सर्वात महत्त्वाचा प्रकार म्हणजे विषाणुजन्य ताप. आपल्याला काही विषाणू माहीत आहेत, जसे बर्ड फ्लू, एच१एन१, एच२एन२. मात्र विषाणू अनेक प्रकारचे असतात. त्यामुळे साथीचे आजार पसरू शकतात. मुंबईत गर्दीचे प्रमाण अधिक असल्याने असे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे विषाणुजन्य तापाकडे दुर्लक्ष न करणेच योग्य.
२. पॅरॉसॅटिक इन्फेक्शन
डास चावल्याने हा ताप येतो. उदा. मलेरिया, डेंग्यू. मलेरियाचे तीन प्रकार असून, डेंग्यूचे चार प्रकार आहेत. मलेरियामध्ये एका विशिष्ट वेळेला ताप येतो. डॉक्टरांकडून योग्य उपचार न घेतल्यास हा विकार बळावू शकतो. डेंग्यूला अशी मूलभूत उपचारपद्धती नाही. त्यामुळे डॉक्टरांकडून या विकाराचे निदान झाल्यास तात्काळ उपचार करण्याची गरज आहे.
३. जंतुसंसर्ग ताप
अनेकदा ताप हा बॅक्टेरिया म्हणजेच जंतूचा संसर्ग झाल्याने होतो. उदा. विषमज्वर (टायफाइड), नवज्वर (निमोनिया), क्षय (टीबी), लेप्टोस्पारयस (पावसाळय़ात पायाला एखादी जखम झाल्यास हा ताप येतो.)
४. दुर्मीळ ताप
ताप येण्याची सामान्य कारणे असली तरी काही तापाचे निदानच होत नाही. विषाणुजन्य ताप पाच दिवसांत बरा होतो. मात्र काही ताप विविध उपचार केले तरी बरा होत नाही. दोन आठवडय़ांत ताप नाही गेला तर तो दुर्मीळ ताप आहे, असे ओळखावे.
हृदयाच्या झडपांमध्ये जंतुसंसर्ग होऊन ताप येणे, टॉन्सिलचा ताप, कानाचा जंतुसंसर्ग, गळू, हत्तीरोगामुळे येणारा ताप, काला आजार (या विकारामध्ये लघवीचा रंग काळा असतो.), कर्करोग आदी विकारांमध्ये येणारा ताप दुर्मीळ प्रकारातील असतो.

‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे
summer
सुसह्य उन्हाळा!
Holi 2024, Natural Colors, Children, Celebrate, Harmful Chemicals, parents, caring tips, skin, eye, infection,
होळीतील रासायनिक रंगाने डोळे, त्वचेच्या आजाराचा धोका! मुलांची विशेष काळजी घेण्याची गरज
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती

तापांमधील फरक कसा ओळखाल?
कोणत्या प्रकारचा ताप आला आहे, हे समजण्यासाठी तापाचे कारण शोधणे आवश्यक आहे. त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या तपासण्या करणे गरजेचे आहे. मलेरिया आणि विविध जंतुसंसर्ग तापांमध्ये रक्ताची तपासणी केली जाते. विषमज्वरच्या विविध तपासण्या आहेत. टीबी, डेंग्यू, न्यूमोनिया यांच्याही तपासण्या आहेत. डॉक्टरांना विचारून या तपासण्या केल्या तरच तापाचे कारण समजू शकेल. ताप आल्यास डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.
तापाचे घातक परिणाम
अधिक प्रमाणात ताप असेल किंवा ताप खूप काळ असेल आणि रुग्णाला अन्य काही आजार असतील तर तापाचे घातक परिणाम होऊ शकतात. अतितापामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. काही विकारांमध्ये ताप मेंदूत जातो आणि रुग्ण दगावू शकतो. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पारस, विषमज्वर आदी विकारांचे निदान झाल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार करा. तापाला गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
उपचार
विश्रांती घेणे : बऱ्याचदा ताप आल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि विश्रांती घेतली जात नाही. तापामध्ये प्रतिकारशक्ती कमी झालेली असते. त्यामुळे कामाचा ताण न घेता पूर्ण दिवसभर विश्रांती घेणे आवश्यक आहे. झोपेमुळे शरीरातील तापमान कमी होण्यास मदत होते.
आहार : तापामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहार घ्यावा. बहुधा द्रव पदार्थ घेणे आवश्यक आहे. भरपूर पाणी व फळांचा रस घ्या, ज्यामुळे डिहायड्रेशन होणार नाही. हलके अन्न घ्यावे, जे पचण्यास सोपे असते.
औषधे : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विशिष्ट औषधे घ्यावीत. विशेष म्हणजे स्वमर्जीने औषधे घेऊ नये. अनेकदा ताप आल्यास औषधांच्या दुकानातून तापावरील गोळी आणून ती घेतली जाते. मात्र ताप कोणत्या प्रकारचा आहे, हे माहीत नसल्याने अशा प्रकारची औषधे स्वमर्जीने घेऊ नका. त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.
वातावरण थंड : ताप आल्यास उष्णतेवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील वातावरण थंड ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे पंखा, एसी लावला तरी चालेल. मात्र थंडी वाजत असल्यास हा उपाय करू नये.

घरगुती उपचार : ताप आल्यास अनेकदा कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्टय़ा ठेवल्या जातात. मात्र तापमान नियंत्रित ठेवायचे असल्यास संपूर्ण अंग थंड पाण्याने पुसून काढणे आवश्यक आहे.
कपडे : ताप आल्यास पातळ व तलम कपडे घालावेत.