वयोमानापरत्वे मान दुखणे ही नेहमीची तक्रार होऊन जाते. मध्यमवयीन व वृद्ध व्यक्तींमध्ये ‘सव्‍‌र्हायकल स्पाँडिलोसिस’ हे मान दुखण्याचे एक प्रमुख कारण असते. असे असले तरी प्रत्येकालाच स्पाँडिलोसिस असतो असे नाही. नियमित व्यायामाने मानेच्या स्नायूंना बळकटी आणणे हा मानदुखीच्या उपचारांमधील महत्त्वाचा भाग ठरतो. मानेला स्थिरता येण्यास देखील मदत होते. अर्थात रुग्णाला मानेचा स्पाँडिलोसिस असल्यास त्यामुळे झालेली झीज केवळ व्यायामाने भरून येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान प्रचंड दुखत असताना मानेचे व्यायाम करू नका. मानदुखी बऱ्यापैकी कमी झाली की मगच हे व्यायाम करावेत. मानदुखी कमी होण्यासाठीचे काही साधे व्यायाम पाहूया-

Height of Your Shadow Tells How Much Vitamin D Is Absorbed In Body
तुमच्या सावलीची उंची सांगते शरीराविषयी खूप महत्त्वाची ‘ही’ बाब; तज्ज्ञ सांगतात, उन्हाळ्यात कसा घ्यावा अंदाज?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…

व्यायाम क्र. १
सरळ बसा. आता छायाचित्र क्रमांक १ मध्ये दाखवल्याप्रमाणे उजवा तळहात उजव्या कानशिलाच्या वरच्या बाजूस ठेवून मान वाकवण्यासाठी दाब द्या. त्याच वेळी मान अजिबात वाकवली जाऊ नये म्हणून मानेने तळव्याच्या दिशेने जोर लावा. थोडक्यात काय, तर या व्यायामात तळहाताने मानेला आणि मानेने तळहाताला असा दोन्ही बाजूने जोर लावल्यामुळे मान वाकवली जात नाही; पण त्याच वेळी मानेच्या स्नायूंवर योग्य ताण येतो. हाच व्यायाम दुसऱ्या हात दुसऱ्या कानशिलाच्या वर ठेवून करा. हाताने दाब दिल्यावर मान वाकवली जात असेल तर आपण हा व्यायाम योग्य रीतीने करत नसल्याचे समजा.


व्यायाम क्र. २
पाठ भिंतीला टेकवून उभे राहा आणि छायाचित्र क्रमांक २ मध्ये दाखवल्याप्रमाणे डोक्याचा मागचा भाग (टाळू) भिंतीला टेकवा. उभे राहण्याची ही स्थिती योग्य असेल तरच या व्यायामाचा फायदा होतो. आता डोक्याचा मागचा भाग भिंतीला टेकलेल्या अवस्थेतच छायाचित्र क्रमांक ३ मध्ये दाखवल्यानुसार मान खाली वाकवण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम करताना पूर्ण वेळ टाळू भिंतीला टेकलेलीच हवी हे विसरू नका. यातही मानेच्या स्नायूंना योग्य ताण बसतो. ‘सव्‍‌र्हायकल स्पाँडिलोसिस’ असलेल्या व्यक्तीही हा व्यायाम करू शकतील. अर्थात मान दुखत असेल तेव्हा हा व्यायाम करू नका.
 

डॉ. अभिजित जोशी, अस्थिरोगतज्ज्ञ
dr.abhijit@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)