kalaचित्रपट अभिनेते, उद्योजक, खेळाडू, बँकर्स, राजकीय नेते यांना व्यक्तिगत सुरक्षा रक्षकांची गरज भासते. याशिवाय विविध प्रकारच्या गृहसंकुलांनाही सुरक्षा रक्षक आवश्यक ठरतात. सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी मोठी रक्कमही खर्ची केली जाते. या क्षेत्रासाठी प्रशिक्षित व्यक्तींची गरज दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. विशेषत: गृहसंकुलाच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणं, आग व इतर नसíगक संकटांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशी उपकरणे गृहसंकुलांमध्ये बसवली जात आहेत. त्यासाठी नियंत्रण कक्षाची स्वतंत्रपणे निर्मिती केली जाते. या सर्व बाबी हाताळण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती लागतात. ही गरज लक्षात घेऊन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सिक्युरिटी ट्रेिनग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट या खासगी संस्थेने काही प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केले आहेत. सुरक्षाविषयक कुशल मनुष्यबळ विकसित करणारे हे अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सुरक्षा अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नुकसान प्रतिबंधक अधिकारी, सुरक्षा मार्शल अशा नामसदृश पदांवर काम करण्याची संधी मिळू शकते. बँका, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, बहुराष्ट्रीय कंपन्या, हॉटेल्स, विमानतळं आदी ठिकाणीसुद्धा काम करण्याची संधी मिळू शकते.
बारावी उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींसाठी या संस्थेने ‘सर्टििफकेट कोर्स इन सिक्युरिटी मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी चार महिन्यांचा आहे. यामध्ये तीन महिने प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि एक महिन्याच्या इंटर्नशिपचा समावेश आहे. १८ ते ३५ वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला हा अभ्यासक्रम करता येतो. हा अभ्यासकम बहुआयामी असून यामध्ये भौतिक सुरक्षा व्यवस्थापन (फिजिकल सिक्युरिटी मॅनजमेंट) म्हणजेच मूलभूत तत्त्वे, येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींच्या नियंत्रणाचे व्यवस्थापन, विशिष्ट उद्योगासाठी लागणारी सुरक्षा, सुरक्षा व्यवस्थेच्या कायदेशीर बाजू, धोक्यांचे निरीक्षण, त्याचे विश्लेषण, बॉम्ब व इतर धोके आदी), इलेक्ट्रॉनिक
सुरक्षा व्यवस्थापन (क्लोज सíकट टीव्ही, अग्निशमन यंत्रणा, इतर यंत्रणेची देखभाल, प्रवेश नियंत्रणप्रणाली आदी), आपत्ती व्यवस्थापन, आगीपासून सुरक्षा, प्रथमोपचार या बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय आत्मविश्वासवृद्धी, संवादकौशल्य, भावनिक व नेतृत्वकौशल्य इंग्रजी संभाषण, आवश्यक असणारे संगणकीय कौशल्यसुद्धा शिकवले जाते.

इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स्ड सिक्युरिटी ट्रेिनग अ‍ॅण्ड मॅनेजमेंट
पत्ता- ४५, चिम्बई रोड, सेंट अँड्रय़ू चर्चच्या पाठीमागे, वांद्रे (पश्चिम), मुंबई-४०००५०. ईमेल- institute@astm.co.in
संकेतस्थळ- http://www.astm.co.in