सर्टििफकेट कोर्स इन केअर अ‍ॅण्ड कन्झर्वेशन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट, बुक्स अ‍ॅण्ड आर्काइव्ह.
नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया या संस्थेने सुरू केलेला दुसरा अल्प मुदतीचा अभ्यासक्रम म्हणजे सर्टििफकेट कोर्स इन केअर अ‍ॅण्ड कन्झर्वेशन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट, बुक्स अ‍ॅण्ड आर्काइव्ह. या अभ्यासक्रमात पुस्तके, ग्रंथ, ऐतिहासिक कागदपत्रे, हस्तलिखिते यांचे शास्त्रीयदृष्टय़ा संवर्धन, संरक्षण, दुरुस्ती, साठवणूक, हाताळणी आणि जतन याचे तंत्र शिकवले जाते. या अभ्यासक्रमाचा कालावधी आठ आठवडे असून हा अभ्यासक्रम जुल-ऑगस्ट आणि नोव्हेंबर-डिसेंबर अशा दोन सत्रांत आयोजित केला जातो. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीधराला हा अभ्यासक्रम करता येतो. तथापि, विज्ञान पदवीधराला प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. इच्छुकांची निवड गुणवत्तेनुसार केली जाते.

सर्टििफकेट कोर्स इन रेप्रोग्रॅफी
हा सव्वा महिने कालावधीचा अभ्यासक्रम आहे. यंदाच्या शैक्षणिक कालावधीचा पहिला अभ्यासक्रम ६ एप्रिल ते १५ मे २०१५ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. दुसरा अभ्यासक्रम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयोजित केला जाईल. कोणत्याही शाखेतील पदवीधारकाला हा अभ्यासक्रम करता येतो. तथापि, विज्ञान पदवीधराला या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. या अभ्यासक्रमाचे शुल्क ३०० रुपये आहे. या संस्थेमार्फत राहण्याची अथवा भोजनाची व्यवस्था केली जात नाही.

नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया या संस्थेमार्फत सर्टििफकेट कोर्स इन रेप्रोग्रॅफी हा अभ्यासक्रम चालवला जातो. विविध प्रकारचे दस्तावेज आणि हस्तलिखितांचे पुनर्मुद्रण करणे, मायक्रोफिल्मचे तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते. साठवलेल्या माहितीचे संरक्षण, संनियंत्रण आणि देखभाल करणे, अशी माहिती पुनर्मुद्रित करणे आणि वितरित करणे अशा बाबींचाही या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
ऐतिहासिक कागदपत्रांचे जतन करणे हा महत्त्वाचा विषय आहे. शिवाय हस्तलिखित आणि विविध प्रकारचे अभिलेख यांचा सतत वापर होतो. कालानुरूप या कागदपत्रांचे आयुष्यही कमी होत जाते. त्यामुळे त्यांचे संरक्षण, देखभाल आणि पुनर्निर्मिती हे महत्त्वाचे क्षेत्र ठरते. परदेशात हा विषय अभ्यासासाठी महत्त्वाचा ठरतो. अनुभवी व्यक्तींना या क्षेत्रात उत्तम करिअर करता येऊ शकते.

पत्ता- डायरेक्टर जनरल ऑफ आर्काइव्ह, जनपथ, नवी दिल्ली-११०००१.
ई-मेल- archives@nic.in
वेबसाइट- nationalarchives.nic.in