बेकरी उत्पादनं घरगुती स्तरावरही बनवणं शक्य असतं. या वस्तूंची गुणवत्ता आणि दर्जा उत्तम ठेवल्यास त्याला चांगली मागणीही मिळू शकते. स्वयंरोजगार करण्यासाठी हा एक उत्तम व्यवसाय आहे. याद्वारे व्यक्तिगत स्वरूपात पदार्थ बनवून मोठय़ा बेकऱ्यांना ऑर्डरनुसार विविध वस्तूंचा पुरवठा करण्याची संधीसुद्धा मिळू शकते. बेकरीचे पदार्थ बनविण्याची आवड असणाऱ्या व्यक्तींनी या विषयातील तंत्रकौशल्य प्राप्त केल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. 

बेकरी उत्पादनांच्या निर्मितीचा एक अभ्यासक्रम मुंबईस्थित इन्स्टिटय़ूूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटिरग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अप्लाइड न्युट्रिशन या संस्थेने सुरू केला आहे.
या अभ्यासक्रमाचा कालावधी १२ आठवडे आहे. हा अभ्यासक्रम जानेवारी ते मार्च आणि जुल अशा दोन सत्रांमध्ये चालवला जातो. प्रत्येक बॅचला प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
या अभ्यासक्रमात ब्रेड, बिस्कीट, केक, पेस्ट्री, बिस्किट्स, कूकीज, आयसिंग करायला शिकवले जाते.
या अभ्यासक्रमासाठी ३० हजार रुपये एवढे शुल्क आकारले जाते. किमान दहावी उत्तीर्ण कुणाही व्यक्तीला हा अभ्यासक्रम करता येईल.

पत्ता- इन्स्टिटय़ूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटिरग टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड अ‍ॅप्लाइड न्युट्रिशन, व्ही. एस. मार्ग, दादर (पश्चिम), मुंबई- ४०००२८.
वेबसाइट- www.ihmctan.edu 
ईमेल -info@ihmctan.edu