आजच्या धावपळीच्या दैनंदिन जीवनाला सुकर करण्यासाठी रेफ्रिजरेटर, वॉिशग मशीन, मायक्रोवव्ह ओव्हन यांसारख्या उपकरणांची मोठी मदत होते. या उपकरणांमुळे वेळ वाचतो आणि जीवनमानही सुधारते. आज घरोघरी अशा उपकरणांची रेलचेल असते.

ही उपकरणे घरी आली की कालांतराने त्यात काही ना काही बिघाडही होतो. त्या उपकरणांची तातडीने आणि अचूकरीत्या दुरुस्ती होणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊनच इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन ऑफ इलेक्ट्रिकल मेझिरग इन्स्ट्रमेन्ट्स या संस्थेने अ‍ॅडव्हान्स्ड रिपेअर अ‍ॅण्ड इंडस्ट्रियल स्कील एन्हान्समेंट इन रेफ्रिजरेटर्स, वॉिशग मशीन, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह ओव्हन (होम अप्लायन्सेस) हा चार महिने कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे.

या प्रशिक्षणामध्ये रेफ्रिजरेटर्स, वॉिशग मशीन,  डिशवॉशर, मायक्रोवेव्ह ओव्हनच्या मूलभूत संकल्पना शिकवल्या जातात. ग्राहकांच्या घरी किंवा कार्यालयात या तिन्ही बाबी  व्यवस्थितरीत्या कशा स्थापित करायच्या याचे प्रात्यक्षिकही दिले जाते. याशिवाय या तिन्ही वस्तूंची सíव्हसिंग, दुरूस्ती, नादुरूस्त भाग बदलणं, रेफ्रिजरेटरमधील गॅस बदलणं या बाबीचं प्रशिक्षण दिलं जातं. याशिवाय रेफ्रिजरेटर, वॉिशग मशीन, डिशवॉशर, मायक्रोवेव्ह ओव्हनच्या अनुषंगाने येणाऱ्या विविध समस्या आणि प्रश्नांचे निराकरण केले जाते.

या प्रशिक्षणासाठी अर्हता- आयटीआयमधून रेफ्रिजरेशन अ‍ॅण्ड एसी/ फिटर/ टेक्निशियन/ इन्स्ट्रमेंट मेकॅनिक्स किंवा इलेक्ट्रिकल अथवा मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील पदविका किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांतील बी.एस्सी. किंवा कोणत्याही विषयातील बी.ई. यापकी कोणताही एक अभ्यासक्रम केलेला असावा.