’पूर्वतयारी – जर आपण घरीच राहून अशा प्रकारची मुलाखत देणार असाल तर प्रथम त्यातील तांत्रिक प्रक्रिया समजून घेणे आणि तिच्या वापराचा सराव झालेला असणे गरजेचे आहे. वेबकॅम, संगणक आणि इंटरनेटद्वारा बाहय़ व्यक्तीशी संपर्क, या सर्व गोष्टी कौशल्याने करता आल्या, तर उमेदवार आत्मविश्वासाने व्हिडीओ मुलाखत देऊ शकतो. अन्यथा तंत्रज्ञान वापराच्या दडपणाने, उमेदवार  एकाग्र होऊ शकत नाही. याचा सराव होण्याकरता आपले मित्र किंवा समवयीन भावंडे आपल्याला मदत करू शकतात. मुलाखत सुरू करण्याआधी आपला रेझ्युमे, आवश्यक कागदपत्रे, गरज भासल्यास पिण्याचे पाणी जवळ घेऊन बसणे उत्तम. तुम्हाला मुलाखतकर्त्यांना विचारायचे आहेत अशा मुद्दय़ांची यादी तसेच अपेक्षित प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपात स्वत:जवळ बाळगणे सोयीचे होईल.

’बाहय़ वातावरणावर नियंत्रण –

indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन
Analysis of adulterated food will be expedited report will be available within 14 days
भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे

मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे लक्ष फक्त आपल्यावरच राहील याकरता वेबकॅम/संगणकपटल अशा विशिष्ट पद्धतीने स्थिर ठेवायला हवा. खोलीतील इतर वस्तू, रस्त्यावरील वाहने, आपल्याभोवतीच्या हलणाऱ्या वस्तू यांचे दर्शन वेबकॅममधून होऊन मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे लक्ष विचलित होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाही या गोष्टीची कल्पना देऊन मुलाखत संपेपर्यंत कोणताही व्यत्यय येणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी.

’ध्वनी नियंत्रण – या तंत्रज्ञानात वापरले जाणारे ध्वनिग्राहक(मायक्रोफोन) तीव्र संवेदन क्षमतेचे असतात, परिणामी, आपल्याकडून झालेल्या बारीकशा हालचालींचा आवाजही ऐकणाऱ्या व्यक्तीला त्रासदायक वाटू शकतो, तेव्हा अशा हालचाली मुलाखत काळात टाळणे योग्य. काही वेळा आपला आवाजही ऐकणाऱ्या व्यक्तीला कर्कश वाटू शकतो. यासाठी संगणक किंवा

वनिग्राहकापासून ठरावीक अंतर ठेवून संवाद साधण्याचा सराव आधीपासूनच करायला हवा. दर वेळी विचारलेल्या प्रश्नाला आपण उत्तर दिल्यानंतर, मुलाखतकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकू येईपर्यंतच्या अवधीत शांत राहणे गरजेचे असते. (इंटरनेट संपर्काच्या वेगमर्यादा, ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आहे.)

’स्वत:वर लक्ष – मुलाखत सुरू करण्याआधी दीर्घ श्वास घेऊन, स्वत:शीच छानसे हसून सामोरे गेल्यास, मनावरील दडपण कमी होऊन आवाजातील कंप टाळण्यास मदत होईल. मुलाखत सुरू असताना संगणकाच्या पटलावर कोपऱ्यातल्या चौकटीत आपली छबी आपल्याला बघता येते. मधूनच तेथे नजर टाकून स्वत:चा चेहरा आणि हावभावही तपासून आपल्या हालचालीत बदल करणे आवश्यक आहे. उत्तर देताना प्रत्येक वेळी कॅमेऱ्यात पाहून बोलणे महत्त्वाचे. या तंत्रात प्रश्नकर्त्यां व्यक्तीला आपला चेहरा अगदी जवळून दिसणार असतो, तेव्हा आपल्या मनातील भीती, चीड, आनंद या भावनांचे चेहऱ्यावर होणारे प्रदर्शन नियंत्रणात ठेवणे जरुरीचे ठरते.

’ थेट संवाद – येथे नेहमीप्रमाणेच एकापेक्षा जास्त व्यक्ती प्रश्न विचारू शकतात. मात्र, उमेदवाराला कोणा एका विशिष्ट प्रश्नकर्त्यांकडे वळून पाहत थेट संवाद साधणे शक्य होत नाही, अशा वेळी त्या व्यक्तीला नावाने संबोधून उत्तर देणे योग्य ठरते. अर्थात यासाठी मुलाखतीला सुरुवात करतानाच उमेदवाराने आदरपूर्वक सर्व मुलाखतकर्त्यांची नावे विचारून घेणे अपेक्षित असते.

’ तंत्रज्ञानाची भीती नको – संपूर्ण मुलाखतीची यशस्विता तंत्रज्ञानाच्या वापरावर अवलंबून असल्याने, त्याबद्दलची भीती उमेदवाराला सतावणे साहजिक आहे, पण काही कारणाने तंत्रज्ञान किंवा संगणक व्यवस्थेत बिघाड झाल्यास, पुन्हा नवीन वेळ ठरवून मुलाखत पुढे नेता येते. त्यासाठी मुलाखतीदरम्यान विनाकारण दडपणाखाली राहण्याची गरज नाही.

’पेहराव – प्रत्यक्ष मुलाखतीप्रमाणेच येथेही पेहराव कार्यालयीन वातावरणाला साजेसा असणे उत्तम. फक्त शांत निळा, करडा असे रंग पेहरावात असावेत. पूर्ण पांढरे, पिवळा किंवा चित्रांकित, चौकटी असलेले कपडे टाळावेत. संगणक पटलावरून अशा रंगांचे दर्शन डोळ्यांना त्रासदायक ठरू शकते.

’उत्तम श्रोता – मुलाखतीच्या कोणत्याही प्रकारात उमेदवाराने उत्तम श्रोत्याची भूमिका निभावणे श्रेयस्कर ठरते. मुलाखतकर्त्यांचे वक्तव्य पूर्ण झाल्यानंतर काही क्षणांनी उमेदवाराचे उत्तर किंवा प्रतिक्रिया येणे अपेक्षित असते. दुसऱ्याचे बोलणे मध्येच तोडून आपण बोलणे सुरू करणे शिष्टसंमत समजले जात नाही. तेव्हा बोलणे शांतपणे ऐकत असतानाचा वेळ हा तर्कसुसंगत उत्तराची योजना करण्यासाठी वापरता येईल.

’निवडीची शक्यता – सर्व शक्यता लक्षात घेऊन, जर व्हिडीओ मुलाखत विनाअडथळा आपल्याला पार पाडता आली तर तो उमेदवार कार्यालयीन कामकाजासाठी योग्य आहे याची खात्री पटते आणि निवडीची शक्यता वाढू शकते. यातील काही मुद्दे दूरध्वनीच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या मुलाखतीसाठीही उपयुक्त ठरू शकतील.

टेलिफोनिक आणि व्हिडीओ इंटरव्हय़ूम्

प्रगत तंत्रज्ञान, जागतिकीकरण या स्थित्यंतरांचा परिणाम नोकरीसाठीच्या मुलाखत तंत्रावरही झालेला आपल्याला दिसून येतो. अलीकडे प्रत्यक्ष मुलाखतीच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा दूरध्वनी किंवा दृक्-श्राव्य माध्यमातील मुलाखत पद्धतींचा वापर अधिक केला जातो. प्रवास, खर्च, वेळ वाचावा याकरता आणि देशाच्या कानाकोपऱ्यांतून, परदेशातून योग्य उमेदवार शोधणे शक्य व्हावे या उद्देशाने निवडप्रक्रियेतील प्राथमिक टप्पा म्हणून  याचा वापर केला जातो.

हे तंत्र मुलाखत देणारा आणि घेणारा अशा दोघांच्याही दृष्टीने सोयीस्कर असते.मुख्यत्वे  मध्यम-उच्चस्तरीय व्यवस्थापकीय नेमणुकांसाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो. व्हिडीओ मुलाखतीत उमेदवार आणि मुलाखतकार यांना समोरासमोर आणण्यासाठी व्हिडीओ तंत्रज्ञानाची मदत घेतली जाते. कधी प्लेसमेंट एजन्सीच्या कार्यालयात तर काही वेळा उमेदवार स्वत:च्या घरातून संगणक, वेबकॅम, इंटरनेट सुविधा यांचा वापर करून मुलाखतकर्त्यांशी थेट संपर्क साधतो. बऱ्याच वेळा प्रत्यक्ष मुलाखतीच्या दरम्यान उमेदवाराची भेट व्हिडीओ माध्यमाद्वारे त्या कंपनीच्या परदेशस्थ वरिष्ठाशी किंवा देशातील इतर शाखांच्या विभागीय मुख्य व्यक्तींशी घडवून आणली जाते.