अभ्यास करावा नेटका
‘एकाग्रता आणि स्मरणशक्ती’ यासंदर्भात लिहिलेल्या लेखांना वाचकांनी जो प्रतिसाद दिला त्यात अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी ‘अभ्यासात लक्ष लागत नाही’ अशी तक्रार नोंदवली आहे.

मन विचलित होणे, भलभलते विचार मनात येणे हे थोडय़ाफार प्रमाणात सर्वानाच अनुभवायला येते. मात्र याचा खूप त्रास होत असेल अथवा अभ्यासात मोठे अडथळे येत असतील तर मात्र त्यावर इलाज शोधायला हवा आणि त्याकरता इतर कुणाही व्यक्तीपेक्षा तुम्हाला तुमचीच मदत अधिक होईल.

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
Supreme Court ban Patanjali from advertising
अग्रलेख : बाबांची बनवेगिरी !

सर्वप्रथम लक्ष लागत नाही म्हणजे नेमके काय होते, का होते याचे आत्मपरीक्षण तुम्हाला करावे लागेल. सामान्यपणे अभ्यासात लक्ष न लागण्याची दोन प्रकारची कारणे असतात-  अंतर्गत आणि बाह्य़.

’ बाह्य़ कारणांमध्ये अभ्यासाला जागा नाही, बैठक व्यवस्था नीट नाही, पुरेसा प्रकाश नाही, वायुवीजन नीट नाही, आसपास सारखे आवाज, गोंगाट, असा गोंधळाचा माहोल आहे, असे असू शकते. हे टाळण्यासाठी तुमच्या अभ्यासाच्यावेळा बदला.

’जवळपास वाचनालय, अभ्यासिका आहे का याचा शोध घ्या. तिथे तुम्हाला अभ्यासासाठीची शांतता मिळू शकेल.

’ जर भोवतालच्या परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही असे लक्षात आले तर निराश होऊ नका. प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी झालेल्यांची उदाहरणे लक्षात घेत, त्यांच्यापासून प्रेरणा घ्या. त्यांना आदर्श मानून नकारार्थी विचारांना थारा न देता, अडचणींचा बाऊ न करता, आपल्या ध्येयाप्रत वाटचाल करा.

’अनेकदा या समस्यांचे मूल कारण बाह्य़ नसून अंतर्गतच असते. उदा. अध्ययन अक्षमता, शारीरिक व्यंग, घरातील वादविवाद, आर्थिक विवंचना, प्रवासात मोडणारा वेळ,

उत्तम शैक्षणिक साहित्याची अनुपलब्धता या सगळ्याचा येणारा ताण..

’तुमच्याबाबतीत यातील नेमके कुठले कारण आहे याचा प्रथम विचार करा. शोध घ्यायचा प्रयत्न करा आणि या गोष्टीने मनातल्या मनात कुढत राहण्यापेक्षा विश्वासू मित्र, आई-बाबा, शिक्षक, शाळेतले समुपदेशक अशा जवळच्या कुणाशी तरी बोलून मन मोकळे करा. तेही शक्य नसल्यास मनातले सारे विचार लिहून काढा. त्यामुळेही मन हलके आणि शांत होते.

’अनेकदा आई-बाबा, शिक्षक यांच्या आपल्यासंदर्भातील अपेक्षांनीही ताण येतो. अशा वेळेस त्यांच्याशी संवाद साधावा. तुम्ही तुमचे म्हणणे स्पष्टपणे मांडायला हवे.

’साधारणपणे सातवी-आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा अंदाज यायला हवा. अन्यथा, तज्ज्ञांकडून त्यांची चाचणी करून घ्यायला हवी. काही सामाजिक संस्थांमध्ये अत्यल्प मूल्य आकारून अध्ययन क्षमता चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध असते. आपल्या क्षमता आणि इच्छा, आकांक्षा, ध्येय यांची योग्य सांगड आपल्याला घालता यायला हवी. तसेच क्षमतांचा आपण खरोखर योग्य वापर करतो का,  अक्षमतांमुळे (दृष्टीदोष, श्रवणदोष, डिसलेक्सिया, डिसकॅलक्युलिया इ.)  मर्यादा येत आहेत याचे भान आपण राखायला हवे.

’विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कितीतरी संस्था विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी कार्यशाळांचे आयोजन करत असतात. या कार्यशाळांमध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध होऊन शैक्षणिक समस्यांवर उपाय सापडू शकतात.