अनेकजण आपल्या आयुष्यातल्या अविस्मरणीय क्षणांमध्ये लग्नाचा समावेश नक्कीच करतील. असा हा महत्त्वाचा क्षण आठवणीत राहण्याजोगा साजरा व्हावा, याकरता प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. मात्र, हा सोहळा कसा असावा, याबाबत  प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते.

ज्यांना आपला लग्नसोहळा देखणा व्हावा, झोकात व्हावा असं वाटत असतं, त्यांच्यासाठी लग्नसोहळ्याचे शाही आयोजन करून देणाऱ्या व्यवस्थापन कंपन्या गेल्या काही वर्षांमध्ये उपलब्ध आहेत. इव्हेन्ट मॅनेजमेन्ट क्षेत्राचे आणखी एक मागणी असलेले स्पेशलायझेशन म्हणजे वेिडग प्लानर!

लग्न सोहळ्यातील सर्व बाबींची उपलब्धता, नियोजन आणि सादरीकरणाची जबाबदारी वेडिंग प्लानर म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती अथवा कंपन्या स्वीकारत असतात. यांत  लग्नसोहळ्याची संकल्पना, त्यानुसार व्यासपीठाचे नेपथ्य, आर्थिक तरतुदीचा आराखडा तयार करणे, धार्मिक विधी, छायाचित्रण, व्हिडीयो चित्रीकरण, भोजन समारंभ, स्थळाची निवड अशा वेगवेगळ्या कामांचा समावेश होतो.

या वेडिंग प्लानर व्यवसायाला गेल्या काही वर्षांत बरकतीचे दिवस आले आहेत. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना स्वतंत्रपणे हा व्यवसाय सुरू करता येईल अथवा लग्नसमारंभाच्या आयोजनाचे काम करणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी करता येईल.

या क्षेत्रात वाढणारी मागणी आणि त्यात होणारी मोठी उलाढाल लक्षात घेता या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना संबंधित बाबींचे उत्तम प्रशिक्षण मिळावे याकरता ‘डिप्लोमा इन वेिडग प्लॅिनग’ हा अभ्यासक्रम वेिडग अकॅडमी या संस्थेने सुरू केला आहे.

हा अभ्यासक्रम सहा महिने कालावधीचा अर्धवेळ अभ्यासक्रम असून बारावी उत्तीर्ण अशा कोणाही उमेदवाराला हा अभ्यासक्रम करता येईल.

संस्थेचा  पत्ता- ११/१२, पहिला मजला,
फोरम बििल्डग, रघुवंशी कम्पाऊंड,
सेनापती बापट मार्ग,
लोअर परळ- पश्चिम, मुंबई- ४०००१३ 
वेबसाइट-  www.weddingacademy.in