जया आणि आपण आपल्या अपत्यांना नेहमीच समान वागणूक दिल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे. महिला समानता दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये लैंगिक समानतेविषयी बोलताना पालक म्हणून मुलगा अभिषेक आणि मुलगी श्वेता हे दोघे आम्हाला सारखेच असल्याचे त्यांनी सांगितले. अमिताभ बच्चन यांनी मदर तेरेसांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त त्यांना टि्वटरच्या माध्यमातून श्रध्दांजली वाहिली आहे.