प्रश्न – मला मोबाइलवरील काही गेम्स किंवा व्हॉट्सअ‍ॅपसारखे अ‍ॅप्स संगणकावर वापरायचे आहेत, तर त्याला काही पर्याय आहे का? – सुशांत विचारे

उत्तर – अँड्रॉइड ही सर्वाधिक वापरली जाणारी मोबाइल ऑपरेटिंग सिस्टीम आहे. यामध्ये आपण अनेक गेम्स डाऊनलोड करतो. अनेकदा घरी असताना आपल्याला हे गेम्स संगणकावर असावेत असे वाटते. अशा वेळी तुम्ही मोबाइलमधील सबवे सर्फर किंवा अन्य गेम्स संगणकावर खेळू शकता. यासाठी तुम्हाला ब्ल्यूस्टक्स हे सॉफ्टवेअर तुमच्या संगणकात डाऊनलोड करून घ्यावे लागेल. हे सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यावर ते संगणकात इन्स्टॉल करा. त्यानंतर सॉफ्टवेअर सेटिंग अप होईल. हे झाल्यावर तुम्हाला माय अ‍ॅप्स, टॉप चॅट्स असे पर्याय दिसतील. यातील माय अ‍ॅप्स पर्याय निवडा. यानंतर एक वन टाइम सेट अप येईल. हा सेट अप आल्यावर तुम्हाला तुमचे गुगलचे लॉगइन करावे लागेल. हे लॉगइन झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते अ‍ॅप्स सर्च करून इन्स्टॉल करू शकता. यानंतर तुम्ही त्या इन्स्टॉल अ‍ॅपच्या माध्यमातून गेम्स खेळू शकता. यामध्ये तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपही वापरू शकता.

9

प्रश्न – माझ्याकडे ब्ल्यूस्टक हे सॉफ्टवेअर संगणकात उपलब्ध आहे. मात्र त्यात सबवे सर्फर किंवा व्हॉट्सअ‍ॅप चालत नाही. काय करू? -आदित्य कांदेकर
उत्तर – सहसा ब्ल्यू स्टकच्या बाबतीत तक्रारी येत नाहीत. तुमच्याकडे असलेले सॉफ्टवेअर बिटा व्हर्जनमधले आहे की फूल व्हर्जन आहे हे तपासा. बिटा व्हर्जन असेल तर अनेक अ‍ॅप क्रॅश होतात. यामुळे फूल व्हर्जन डाऊनलोड करा आणि मग अ‍ॅप्स वापरून पाहा. तरीही नाही झाले तर नव्याने सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून लॉगइन केल्यावर तुमची अडचण दूर होईल.

या सदरासाठी प्रश्न lstechit@gmail.com या मेल आयडीवर पाठवा.