6
तरुणांबरोबरच आता वयोवृद्धांपासून अनेकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरत असलेले फेसबुकने आता आपल्याला आपल्या भाषेत गप्पा मारण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. संगणकावरून आपण लॉगइन करताना ही सुविधा उपलब्ध आहेच. पण आता आपल्या फोनवरून म्हणजे अगदी साध्या फिचर फोनवरूनही फेसबुक सुरू केल्यावर आपल्या भाषेत गप्पा मारता येणे शक्य होणार आहे. 

समाज माध्यमांमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या फेसबुकने आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यातील आपल्या मित्रांशी तसेच नातेवाईकांशी जोडले. इतकेच नव्हे तर अनेक नवे मित्रही मिळवून दिले. गप्पा मारताना अनेकदा आपण इंग्रजीत टाइप करून आपल्या भाषेत गप्पा मारतो. पण हीच टायपिंगची सुविधा जर आपल्याला आपल्या भाषेची मिळाली तर. ही लोकांची गरज ओळखून फेसबुकने भारतीय भाषांची सुविधा फेसबुकवर आणली. सुरुवातीला केवळ संगणकावरच उपलब्ध असलेली ही सुविधा आता स्मार्टफोनवरील फेसबुक, अ‍ॅप्स इतकेच नव्हे तर साध्या फिचर फोनमध्येही वापरता येणे शक्य होणार आहे. यामुळे आता आपण कोणताही फोन वापरणाऱ्या आपल्या मित्राशी आपल्या मातृभाषेत गप्पा मारू शकतो. इतकेच नव्हे तर जर कुणी आपल्याशी त्याच्या मातृभाषेत बोलले आणि ती जर आपल्याला समजत नसेल तर फेसबुकने भाषांतराची सुविधाही दिली आहे. यामुळे फेसबुकवर गप्पा मारण्यासाठी आता भाषेची कोणतीही अडचण असणार नाही.

‘फेसबुक फॉर एव्हरी फोन’ अ‍ॅप
7तुम्हाला तुमच्या भाषेत फेसबुक वापरायचे असेल तर तुम्ही सर्वप्रथम ‘फेसबुक फॉर एव्हरी फोन’ हे अ‍ॅप डाऊनलोड करा. हे अ‍ॅप तुमच्या फिचरफोनमध्येही डाऊनलोड होते. हे अ‍ॅप मोफत असून त्याच्या सेटिंगसाठी काही क्षणांचाच वेळ लागतो. यासाठी तुम्ही तुमच्या फोनवरून ब्राऊझिंग करताना <www.facebook.com/mobile> हे संकेतस्थळ सुरू करा. त्यात ‘डाऊनलोड अ‍ॅप’ हा पर्याय निवडा. हे डाऊनलोड झाले की तुम्ही फेसबुकच्या नव्या सुविधा वापरण्यासाठी तंत्रसज्ज झालात असे समजा.

तुमच्या भाषेत संदेश पाठवा आणि मिळवा
हे अ‍ॅप डाऊनलोड झाल्यानंतर तुम्ही तुम्हाला पाहिजे ती भाषा निवडू शकतात. यानंतर तुम्हाला तुम्ही 8निवडलेल्या भाषेत संदेश मिळतात. तसेच तुम्ही त्याच भाषेत संदेश पाठवूही शकता. सध्या या अ‍ॅपमध्ये हिंदी, गुजराती, तामिळ, मल्याळम, कानडी, पंजाबी, बंगाली आणि मराठी या भाषांमध्ये उपलब्ध आहे. अनेक फोनमध्ये भाषांचे पर्याय दिलेले असतात. त्यातील पर्याय निवडून मोबाइलधारक त्याच्या भाषेतून पोस्ट करू शकतो. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमचे स्टेटस अपडेट करून तुमच्या वेळोवेळीच्या भावना व्यक्त करू शकता. फेसबुकने तर सुविधा केवळ पोस्ट पुरतीच मर्यादित न ठेवता चॅटिंगसाठीही हे पर्याय दिले आहेत. यामुळे या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ऑनलाइन मित्रांशी थेट तुच्या मातृभाषेत गप्पा मारू शकता.