२०१४ हे वर्ष टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. या वर्षभरात अनेक नवे तंत्रज्ञान आपल्यासाठी बाजारात उपलब्ध झाले. यामुळे आपल्या जीवनशैलीत अनेक बदल घडले. या वर्षभरात बाजारात आलेले स्मार्टफोन, विविध अ‍ॅप्स, टॅबलेट्स, गेम्स, लॅपटॉपमध्ये कोणती उत्पादने सरस ठरलीत हे पाहुयात.

स्मार्टफोनमध्ये या वर्षभरात नानाविध प्रकार समोर आले. कुणी बॅटरी लाइफ चांगली दिली तर कुणी कॅमेरा सुधरवला. काहींनी बजेट फोन्समध्ये सुधारणा केल्यात तर काहींनी सॉफ्टवेअर अपग्रेड केले. या सर्व स्पध्रेत वर्षभरात सवरेत्कृष्ट पाच स्मार्टफोन कोणते हे पाहुयात.

गेल्या वर्षी म्हणजे २०१३ मध्ये उदय झाल्यानंतर बाजारात एकच खळबळ उडवून देणाऱ्या टॅब्लेटसाठी यंदाचं वर्ष मात्र फारसं लाभदायी नव्हतं. स्मार्टफोनचा वाढतच चाललेला आकार आणि लॅपटॉपकडे वाढत चाललेला कल यामुळे टॅब्लेटची लोकप्रियता काहीशी ओसरत चालल्याचे दिसून आले, मात्र तरीही २०१४ या वर्षांने अनेक आकर्षक आणि बहुसुविधा देणारे टॅब्लेट लाँच करत या क्षेत्रातील चुरस कायम ठेवली. मूव्हीज पाहण्यासाठी किंवा गेम्स खेळण्यासाठी टॅब्लेटला पसंती देणाऱ्या ग्राहकांवरच लक्ष केंद्रित करून बहुतांश टॅब्लेट बनवण्यात आल्याचेही दिसून आले, मात्र यापेक्षाही अधिक चांगल्या वैशिष्टय़ांमुळे खालील टॅब्लेट या वर्षी ‘हिट’ ठरले.

अॅपल एअर २

अॅपलच्या ‘आयपॅड एअर’पेक्षाही १८ टक्क्यांनी हलका आणि पातळ असलेल्या ‘एअर २’ने चालू वर्षांचा उत्तरार्ध गाजवला. फिंगर प्रिंट स्कॅनर सुविधेमुळे या टॅब्लेटची सुरक्षा वाढलीच; शिवाय आठ एमपी कॅमेरा, १.२ एमपी फ्रंट कॅमेरा, ९.७ इंची डिस्प्ले, अॅपल ए८एक्स सिस्टीम अशा वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असलेला हा टॅब सध्या ग्राहकांच्या इच्छायादीत पहिल्या स्थानी आहे.
किंमत ३५९०० रुपये

अॅमेझॉन किंडल फायर एचडीएक्स ७
किंडल बुक रीडरच्या निर्मितीवरून थेट टॅब्लेटच्या निर्मितीवर उडी मारणाऱ्या अॅमेझॉनच्या ताफ्यातील हा दुसरा टॅब्लेट. सात इंची डिस्प्ले, २.२ गिगाहार्टझ क्वाड कोअर प्रोसेसर, २ जीबी रॅम, फुल एचडी डिस्प्ले आणि ६४ जीबीपर्यंतची स्टोअरेज क्षमता असलेल्या या टॅब्लेटने ग्राहकांना चांगलेच आकर्षित केले. विशेष म्हणजे, अँड्रॉइडच्या ऑपरेटिंग सिस्टीममधील काही तांत्रिक गोष्टी दूर करत एचडीएक्स ७ फायर ओएस ३.० या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.
किंमत  १९५४० रुपये

सॅमसंग टॅब एस ८.४
गॅलक्सी नोटच्या यशानंतर आयपॅडला टक्कर देण्यासाठी सॅमसंगने या वर्षी गॅलक्सी टॅब एस ८.४ आणि १०.५ हे टॅब्लेट लाँच केले. अतिशय स्पष्ट डिस्प्ले, अल्ट्रा थिन बॉडी असलेला एस ८.४ २५६० बाय १६०० पिक्सेल रेझोल्यूशनचा टॅब्लेट आहे. याचा प्रोसेसरही वेगवान आहे. शिवाय सॅमसंगबाबत वारंवार केली जाणारी बॅटरीबाबतची तक्रारही या टॅब्लेटबाबत करता येणार नाही.
किंमत : २७९९० रुपये

मायक्रोसॉफ्ट सरफेस प्रो ३
टॅब्लेटला लॅपटॉपचा पर्याय म्हणून पाहिला जात असला तरी अनेक टॅब्लेट त्याबाबतीत योग्य ठरत नाही. याउलट मायक्रोसॉफ्टचा सरफेस प्रो ३ हा लॅपटॉप म्हणावा इतपत वैशिष्टय़े असलेला टॅब्लेट आहे. १२ इंची डिस्प्ले, उच्च दर्जाचे स्क्रीन रेझोल्यूशन, कीबोर्ड कव्हर, डिजिटल पेन अशा अनेक वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असा सरफेस प्रो ३ हा टॅब्लेटच्या वर्गातील ‘बिझनेस क्लास’साठीचा चांगला पर्याय ठरत आहे.
किंमत: अंदाजे ६५००० रुपये

नोकिया ल्युमिया ६३८
मायक्रोसॉफ्ट या कंपनीने ग्राहकांची गरज ओळखून नोकिया ल्युमिया ६३८हा मोबाइल नुकताच भारतीय बाजारपेठेत दाखल केला आहे. विंडोज ८.१ या ऑपरेटिंग सिस्टिमवर काम करणारा हा मोबाइल असून याचा डिस्प्ले ४.५ इंचांचा आहे. यात क्वाड कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असल्यामुळे तो अधिक जलद काम करू शकतो. यामध्ये व्हॉट्स अॅप, इंस्टाग्रामसारखे अॅप्स जलद गतीने काम करू शकतात असा कंपनीचा दावा आहे. या फोनमध्ये बॅटरी क्षमता १८३० एमएएचची देण्यात आली आहे. यामुळे दिवसभर मोबाइल वापरूनही बॅटरी कमी संपते. यामध्ये पाच मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला असून त्यामध्ये ल्युमिया कॅमेरा आणि सिनेमाग्राफ हे दोन खास फोटो अॅप्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये एक जीबी रॅम देण्यात आली असून यात आठ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी आपण एसडी कार्डच्या साह्याने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो.
किंमत : ८,२९९ रुपये.  (अॅमेझॉनवर)

जिओनी व्ही6एल
जिओनी या कंपनीने फोर जीवर चालणारे दोन फोन बाजारात आणले आहेत. यातील व्ही 6एल हा फोन पाच इंचाच्या डिस्प्लेसह उपलब्ध आहे. याची जाडी ६.९ इतकी आहे. यामध्ये अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. या फोनमध्ये एक जीबी रॅम आणि आठ जीबी अंतर्गत मेमरी देण्यात आली आहे. ही मेमरी आपण एसडी कार्डच्या साह्याने १२८ जीबीपर्यंत वाढवू शकतो. यात क्वाड कोर १.२ गीगाहार्टझचा प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. फोनची बॅटरी १९५०एमएएच इतकी आहे. याची किंमत ८ हजार ५०० ते १० हजार ५०० दरम्यान आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट ४
सॅमसंगने वर्षभरात अनेक उत्पादने बाजारात आणली. यापैकी नोट ४ हा त्यांचे विशेष इनोव्हेशन आणि अत्याधुनिक सुविधा युक्त फोन मानला गेला. हा फोन सर्वचबाबतीत सरस ठरला. हा फोन खूप चांगल्याप्रकारे चालतो याचबरोबर याची बॅटरी लाइफ ही चांगली ठरली. सॉफ्टवेअर आणि एस-पेनमधील इनोव्हेशनसाठी हा फोन विशेष ओळखला जातो. यामध्ये कॅमेराचा दर्जाही खूप जास्त देण्यात आले आहे. हा फोन गॅलेक्सी एस ५च्या तुलनेत खूप जास्त चांगला असल्यामुळे तो सर्वापेक्षा जास्त सरस ठरतो. या फोनमध्ये आपण फोरजी वापरू शकतो. याचबरोबर अँड्रॉइडच्या अद्ययावत ऑपरेटिंग प्रणालीही या फोनमध्ये वापरणे शक्य होणार आहे. हा फोन पाच.सात इंचांचा असून यामध्ये तीन जीबी रॅम देण्यात आली आहे. यामध्ये बॅटरीची क्षमता ३२२० एमएएच इतकी आहे. या फोनची किंमत ५८३०० इतकी आहे.

अॅपल आयफोन ६
आयफोन ५नंतर अॅपल कंपनीने आयफोन ६ बाजारात आणला. अॅपलच्या नानाविध इनोव्हेशन्समुळे हा फोन बहुचर्चित ठरला. या नवीन फोनमध्ये काय असणार याबाबत अनेक अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या होत्या. त्यानुसार आयफोन ६चा डिस्प्ले हा ४.२ इंचाचा आहे तर ६ प्लसचा डिस्प्ले हा ५.५ इंचांचा आहे. या फोनमध्ये अॅपलची आयओएस ८ ही नवीन ऑपरेटिंग सिस्टिम वापरण्यात आली आहे. या दोन्ही फोनचे प्रोसेसर हे आयफोनच्या आत्तापर्यंतच्या मॉडेलमधील प्रोसेसरच्या तुलनेत ५० टक्के अधिक जलद काम करणार आहे. ग्राफिक्सचा वेगही ८४ टक्के जास्त असेल. यामुळे आयफोन ६प्लस हा गेमिगसाठी उत्तम फोन असेल असे कूक यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही फोन हे आत्तापर्यंतच्या आयफोनच्या मॉडेल्सच्या तुलनेत कमी जाडीचे असतील. यामुळे ते हाताळण्यासही सोपे जातील. आयफोन ६मध्ये आठ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. आपल्या सादरीकरणामध्ये आयफोन ६मधून टिपलेले छायाचित्र आणि चित्रिकरणही दाखविण्यात आले. सेल्फी काढण्यासाठी आयफोन ६मध्ये फेस डिटेक्शन अधिक चांगल्या प्रकारे देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामध्ये वाय-फाय कॉलिगचा एक नवा पर्याय देण्यात आला आहे. यासाठी आयफोन ५ एसच्या तुलनेत आयफोन ६मध्ये वाय-फायचा वेग हा तिप्पट अधिक देण्यात आला आहे. यावेळी ’आय वॉच’चेही अनावरण करण्यात आले. या फोनची किंमत ४५ हजारापासून जीबीनुसार वाढत जाते.

स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वाढत्या मागणीने लॅपटॉपबद्दलच आकर्षण बरंच कमी केलं आहे. किमतीने कमी असूनही हाताळण्यात लॅपटॉपइतकाच सहज असलेल्या टॅब्लेटला गेल्या वर्षी चांगली मागणी होती, मात्र लॅपटॉप निर्मात्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये अनेक बदल करून बाजारात दाखल केल्याने लॅपटॉपच्या विक्रीला पुन्हा तेजीचे दिवस आले आहेत. स्मार्टफोन किंवा टॅब्लेटइतके ‘स्मार्ट’ बनण्याबरोबरच वापरकर्त्यांना नवा अनुभव देणारे अनेक लॅपटॉप या वर्षी बाजारात आले. यातील काही लॅपटॉपची चर्चा आणि लोकप्रियता वर्षभर टिकून राहिली.

गुगल नेक्सस ७
टॅब्लेटच्या क्रमवारीत गुगलच्या नेक्सस टॅब्लेटला स्थान दिले गेले पाहिजे. अवघ्या २६० ग्रॅम वजनाचा हा टॅब्लेट सात इंची डिस्प्ले असलेला, १.५ गिगाहार्ट्झ प्रोसेसर आणि दोन जीबी रॅम असलेला आहे. अँड्रॉइड किटकॅट ऑपरेटिंग सिस्टीम आणि ४जीची सुविधा यामुळे या वर्षीच्या अनेक टॅब्लेटपेक्षा तो अधिक वेगळा ठरला.
किंमत १५९९९ रुपये

तोशिबा सॅटेलाइट प्रो
१४ इंची आकाराचा एलईडी बॅकलाइट आणि एचडी स्क्रीन असलेला तोशिबा सॅटेलाइट प्रो बी४० ए१००३३ हा नोटबुक वेगवान आहे. २.४ गिगाहार्ट्झचा थर्ड जनरेशनचा प्रोसेसर, चार जीबी रॅम आणि ५०० जीबी हार्ड डिस्क अशा मजबूत वैशिष्टय़ाच्या या नोटबुकची बॅटरी क्षमताही चांगली आहे.

एचपी १५-जी
१५.६ इंच आकाराच्या या नोटबुकमध्ये नेहमीप्रमाणे इंटेल कोअर प्रोसेसर देण्याऐवजी एचपीने एएमडी १.५ गिगाहार्टझ क्वाड कोअर प्रोसेसर पुरवला आहे. १३६६ बाय ७६८ अशा स्क्रीन रेझोल्यूशनमुळे दृश्यस्पष्टता चांगलीच जाणवते. याखेरीज ५०० जीबी हार्ड डिस्क आणि चार जीबी रॅममुळे त्याच्या प्रक्रियेचा वेगही चांगला आहे.

एसर अॅस्पायर ई१५
एसरने लॅपटॉपच्या बाजारात नेहमीच स्वस्त, पण चांगल्या दर्जाचे उत्पादन पुरवले आहे. ई१५ श्रेणीतील हा लॅपटॉपही त्या निकषांवर खरा उतरतो. १.६ गिगाहार्ट्झचा प्रोसेसर, चार जीबी रॅम, ५०० जीबी हार्ड डिस्क आणि विंडोज ८.१ अशा वैशिष्टय़ांनी परिपूर्ण असलेल्या या लॅपटॉपची बॅटरी क्षमताही चांगली आहे.

आसूस एक्स४५०सीए
डब्ल्यूएक्स२१४० लॅपटॉप आणि नोटबुकमध्ये आपले नाव टिकवून ठेवणाऱ्या आसूसच्या एक्स मालिकेतील या लॅपटॉपचे सर्वात चांगले वैशिष्टय़ त्याची डिझाइन आहे. आधीच्या लॅपटॉपपेक्षा पातळ आकाराच्या या लॅपटॉपमध्ये १.८ गिगाहार्टझ कोअर आय३ प्रोसेसर असून दोन जीबी रॅम आहे. याची स्क्रीन १४ इंची आहे. विशेष म्हणजे, यावर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमखेरीज अन्य ऑपरेटिंग सिस्टीमही चालवता येतात.

अॅप्स
स्मार्टफोनप्रमाणेच आपल्या आयुष्यात अमुलाग्र बदल घडविण्यामध्ये अेनक अॅप्सचा समावेश आहे. यात प्रवासी अॅप्सहे लोकांच्या सर्वाधिक पसंतीचे असल्याचे दिसून आले आहे. बाहेर गेल्यावर आपल्या हातात कोणतीही माहिती असावी या उद्देशाने बहुतांश लोक प्रवासाला जाताना विशेष अॅप्स डाऊनलोड करून घेतात.

एनटीईएस
तुम्ही प्रवास करत असलेली गाडी कुठल्या स्थानकापर्यंत पोहोचली आहे, किती मिनिटे उशिरा धावत आहे ८ आदी माहितीसाठी सेंट्रल रेल्वे माहिती प्रणालीतर्फे एनटीईएस अॅप बाजारात आणले आहे. या अॅपमध्ये ट्रेन सध्या कुठे आहे, लाइव्ह स्टेशन, गाडय़ांचे वेळापत्रक, दोन स्थानका ंदरम्यानच्या गाडय़ा, रद्द झालेल्या गाडय़ा, वेळा बदललेल्या गाडय़ा, मार्ग बदललेल्या गाडय़ा आदी पर्याय उपलब्ध आहेत. लाइव्ह स्टेशन या पर्यायामध्ये आपण निवडलेल्या स्थानकावर सध्या कोणत्या व किती गाडय़ा आहेत याची माहिती उपलब्ध आहे. हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी १.७ एमबीची जागा लागते.

आयआरसीटीसी कनेक्ट
आपण राहत असलेल्या ठिकाणापासून आपण जाऊ इच्छिणारया ठिकाणापर्यंत रेल्वेने कसे जाता येईल इतकेच नव्हे तर आरक्षण किंवा आरक्षणाची उपलब्धता आदींची माहिती आपल्याला या अॅपवर उपलब्ध होणार आहे. हे भारतीय रेल्वेचे अधिकृत अॅप असून यामध्ये आपल्याला एका गाडीच्या आरक्षणाची उपलब्धता तसेच एकाच वेळी अनेक गाडय़ांची उपलब्धता पाहता येऊ शकते. आपण या अॅपमधून एकदा आरक्षण केले की आरक्षणात नमूद करण्यात आलेली नावे आणि त्यांचे वय अॅपमध्ये सेव्ह राहते. यामुळे ड्टाविष्यात आपण जेव्हा पुन्हा आरक्षण करतो त्या वेळेस आपल्याला पूर्वीची नावे प्रवासी यादी या पर्यायातून घेता येतात. याशिवाय या अॅपच्या माध्यमातून आपण आयआरसीटीसीचे नवीन लॉगइन तयार करू शकतो. आपण एकदा तिकीट खरेदी केल्यावर आपल्या प्रवासाच्या आधी आपल्याला अलर्ट्सही या अॅपच्या माध्यमातून मिळतात.  हे अॅप अँड्रॉइड आणि आयओएसवर उपलब्ध आहे. यासाठी ५.६ एमबीची जागा लागते.

मोटो एक्स
मोटोरोला कंननीला भारतात किरकोळ बाजारात फोन विक्री करण्यास बंदी असली तरी या कंपनीने बाजारात आणलेले अनेक मोबाइल हे ई-रीटेल संकेतस्थळांवरून भारतात चांगलेच लोकप्रिय ठरले. यामध्ये मोटो जीसही मोटो एक्सचाही समावेश आहे. हा फोन तंत्रप्रेमी आणि तंत्रज्ञानींना चांगलाच भावला. कारण या फोनमध्ये अँड्रॉइड या ऑपरेटिंग सिस्टिमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न करता देण्यात आले आहे. यामुळे आपण आपल्या सोयीने यात अनेक गोष्टी करून घेऊ शकतो. या फोनला ५.२ इंचांचा एचडी स्क्रीन असून त्याची जाडी कमी असल्यामुळे तो हातात अगदी सहज मावतो. याची बॅटरी क्षमाताही चांगली देण्यात आली आहे. यामुळे हा फोनपूर्ण चार्ज केल्यावर बारा तास पर्णूपणे वापर केला तरी त्याची बॅटरी कायम राहते. याची किंमत ७५०० ते १०००० दरम्यान आहे.