मोबाइलमध्ये काही तास इंटरनेट नसले की अस्वस्थ व्हायला होते. एकदा का नेट सुरू झाले की जिवात जीव येतो रे. भारत मोबाइल इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत गेल्या वर्षभरात चांगलीच वाढ झाली आहे. देशातील इंटरनेटचा प्रवास टूजीपासून सुरू होऊन तो आता फोरजीकडे जाऊ लागला आहे. देशातील मोबाइल इंटरनेटचा वाढता वापरासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या निमित्ताने.
देशात मोबाइल इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत एका वर्षांत तब्बल ७४ टक्के वाढ झाली आहे. नोकिया नेटवर्क्‍सच्या एमबीट इंडेक्स या वार्षिक अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे. स्मार्टफोनच्या किमती जशा कमी झाल्या आणि बाजारात मोबाइल नेटवर्क्‍सच्या किमती जशा कमी झाल्या. त्या प्रमाणात वापरकर्त्यांची वाढ होऊ लागली. सन २०१४मध्ये ग्राहक संख्या ७४ टक्क्यांनी वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामध्ये थ्रीजी इंटरनेट वापरणाऱ्यांची सख्ंया ११४ टक्क्यांनी वाढली तर टूजी इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ५९ टक्क्यांनी वाढल्याचे उघड झाले आहे.
अहवालातील ठळक नोंदी
* जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत एकूण मोबाइल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ७४ टक्क्यांनी वाढली आहे.
* थ्रीजी इंटरनेटचा वापर सन २०१४मध्ये दरमहा ६८८ एमबीने वाढत होता. यामध्ये सन २०१३च्या तुलनेत २९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
* टूजी इंटरनेटचा वापर दरमहा २१६ एमबी वाढत होता. ही वाढ ४८ टक्के इतकी नोंदविली गेली आहे.
* सप्टेंबर महिन्यात थ्रीजी इंटरनेट वापरकर्त्यांनी टूजीच्या वापरकर्त्यांच्या संख्येला मागे टाकले.
* टूजीवरून थ्रीजीवर आलेल्या वापरकर्त्यांनी डेटाचा वापर ३.२ पटीने वाढविला आहे.
* थ्रीजी सुविधा पुरविणाऱ्या उपकरणांमध्ये थ्रीजी डेटा वापरण्यासाठी आवश्यक असलेली २१.१ एमबीपीएसची क्षमता ५४ टक्के उपकरणांमध्ये उपलब्ध झाली. सन २०१३मध्ये केवळ २३ टक्के उपकरणांमध्येच होती.
* देशात ५० लाख मोबाइल वापरकर्त्यांकडे फोरजीची सुविधा असणारे मोबाइल आहेत. मात्र त्यातील केवळ ८५ हजार वापरकत्रेच याचा वापर करताना दिसतात. तसेच थ्रीजी सेवेची सुविधा असलेल्या उपकरणांची संख्या १३ कोटीहून जास्त आहे. यापैकी केवळ सहा कोटी जणच थ्रीजी वापरताना दिसतात.
Untitled-1
फोरजीची नांदी
महाराष्ट्रासह देशातील विविध भागांमध्ये फोरजी सेवांचा वापर सुरू झाला आहे. ही सुविधा जसजशी लोकांपर्यंत पोहचेल तसा इंटरनेटचा वापर आणखी वाढू लागणार आहे. सध्या बहुतांश मोबाइल नेटवर्क सुविधा पुरविणाऱ्या कंपन्या फोरजीसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचा कामाला लागल्या आहेत. यामध्ये रिलायन्स जीओ आघाडीवर असून एअरटेल, व्होडाफोनसारख्या कंपन्याही स्पध्रेसाठी सज्ज झाल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी रिलायन्स जीओने आयआयटी मुंबईच्या टेकफेस्टमध्ये आयआयटीच्या कॅम्पसमध्ये फोरजी मोफत उपलब्ध करून दिले होते. यामुळे विद्यार्थ्यांना फोरजीच्या वेगाचा अंदाज घेता आला.
फोर्थ जनरेशनचे संक्षिप्त रूप म्हणजे फोरजी. मोबाइल टेलिकम्युनिकेशन्स टेक्नोलॉजीची चौथी जनरेशन असा त्याचा अर्थ होतो. थ्रीजीनंतरचा आणि फाइव्हजी पूर्वीचा हा टप्पा आहे. थ्रीजीपेक्षा पाचपटीने जास्त वेग असणारं फोरजी इंटरनेट ब्राऊजिंगचा सर्वोत्तम अनुभव देतं. याचा एवढा वेग असतो की ३० मिनिटांपेक्षाही कमी काळात १० चित्रपट डाऊनलोड करता येण शक्य होतं. २०१२च्या एप्रिल महिन्यामध्ये कोलकात्यामध्ये फोरजी सेवा लाँच करणारी एअरटेल ही देशातली पहिली कंपनी होती. या लाँचमुळे, फोरजीच्या जागतिक लाँचला समांतर लाँच करून ती सेवा व्यावसायिकदृष्टय़ा राबवणाऱ्या देशांमधला एक देश अशी भारताची ओळख बनली. फेब्रुवारी २०१४ मध्ये बेंगळुरूमध्ये एअरटेलने मोबाइलसाठी फोरजी सेवा सादर केली. एअरटेल वायफाय, सीपीईज, डाँगल्स आणि मोबाइल फोन्स अशा सर्व माध्यमांमध्ये फोरजीसाठी परवडण्याजोगे आणि पशाचं पुरेपूर मूल्य देणारे अनेक मनी पॅक्स आणि प्लान्स देतो. एअरटेल फोरजी सेवा सध्या भारतातल्या १६ महत्त्वाच्या शहरांमध्ये उपलब्ध असून त्यात बेंगळुरू, कोलकाता, चंदीगड, अमृतसर, जालंधर, लुधियाना, होशियारपूर, कपूरथळा, मोहाली, पंचकुला, पटियाला, फगवाडा, पुणे, नाशिक, नागपूर आणि वसई-विरार-नालासोपारा यांचा समावेश आहे.

फोरजी वापरण्यासाठी
फोरजी वापरण्यासाठी सुविधा असणारा मोबाइल फोन खरेदी करावा लागेल. एअरटेलने रेडमीचा फोरजी सुविधा असलेला मोबाइल भारतात आणला आहे. हा फोन ९९९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवा सॅमसंग अल्फा, सॅमसंग नोट फोर, सॅमसंग एफाइव्ह, सॅमसंग नोट फोर एज, सॅमसंग एसफाइव्ह, एलजी जीटू, एलजी जीथ्री, आयफोन फाइव्हसी, आयफोन सिक्स, आयफोन सिक्स प्लस, झोलो एलटी ९००, ओप्पो फाइण्ड सेव्हनए, लेनोवो व्हाइब एक्सटू, मायक्रोमॅक्स यूव्ही युरेका, नोकिया ल्युमिया ६३८, एचटीसी वन, एमएट आय हे फोन उपलब्ध आहेत.