प्रश्न – अ‍ॅप डाऊनलोड करताना अ‍ॅप परमिशन्स विचारल्या जातात. याचा अर्थ काय? त्यापासून काही धोका असतो का? – किशोर टेमकर
उत्तर – गुगल प्लेवरून अ‍ॅप इन्स्टॉल करताना आपल्याला अ‍ॅप परमिशनची एक खिडकी दिसते. यामध्ये आपण एखादे अ‍ॅप इन्स्टॉल करत असताना आपल्या मोबाइलमधील कोणकोणती माहिती वापरण्याचे अधिकार या अ‍ॅप कंपनीला देतो याची यादी असते. आपण ते सर्व न वाचता अ‍ॅक्सेप्ट करून मोकळे होतो. काही अ‍ॅप्समध्ये त्या अ‍ॅपला आवश्यक नसलेल्या गोष्टींचीही परवानगी मागितली जाते. उदाहणार्थ एखाद्या गेमच्या अ‍ॅपमध्ये आपल्या कॉन्टॅक्ट्सची माहिती घेतात. पण प्रत्यक्षात गेम खेळण्याचा आणि कॉन्टॅक्ट्सचा काहीच संबंध नसतो. तसेच एखाद्या अलार्म अ‍ॅपला तुमचे संदेश वाचण्याची गरज नसते. पण अनेक अलार्म अ‍ॅप्समध्ये संदेशासाठीची परवानगी घेतली जाते. यामुळे अशी अनावश्यक माहिती अनोळखी कंपनींना जाऊ नये यासाठी अ‍ॅप परमिशन्स नक्की वाचून घ्या. आपण जे अ‍ॅप घेत आहोत त्या अ‍ॅपला खरोखरीच या सर्व गोष्टींची गरज आहे का हेही पडताळून पाहा. कारण गुगल प्लेवरील सर्वच अ‍ॅप सुरक्षित असतात असे नाही. तसेच एखादे नवीन अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्या अ‍ॅपचे रेटिंग तसेच त्याच्यावर वापरकर्त्यांच्या आलेल्या कमेंट्स आपण सहसा वाचत नाही. पण जर त्या वाचल्या तर आपल्याला नक्कीच अ‍ॅप विषयी काही माहिती मिळू शकते.

प्रश्न – मोबाइलमध्ये साठवलेल्या विविध फाइल्सचे व्यवस्थापन करणे अनेकदा अवघड जाते. हे व्यवस्थापन करण्यासाठी एखादे अ‍ॅप सुचवा. – प्रज्ञेश दिवेकर
उत्तर – आपल्या मोबाइलमध्ये मोठय़ा प्रमाणावर माहिती असते. या माहितीचे व्यवस्थापन करणे म्हणजे आपल्यासाठी अनेकदा डोकेदुखी ठरते. तरीही मोबाइलमध्ये आपण फोल्डर करून त्यामध्ये माहिती वेगवेगळ्या प्रकारे साठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर विविध माहितीसाठी वेगवेगळ्या रंगांचे लोगो मिळाले आणि त्यानुसार आपण माहिती साठवली तर ती माहिती शोधणेही सोपे जाते. यासाठी अँड्रॉइडवर सध्या उपलब्ध असलेले सुपर फाइल मॅनेजर हे अ‍ॅप खूप लोकप्रिय होत आहे. या अ‍ॅपमध्ये आपल्याला व्हिडीओ, गाणी, छायाचित्रे आदी वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या गोष्टी देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर हे अ‍ॅप आपली मोबाइल डिरेक्टरीही खूप चांगल्याप्रकारे हाताळते. यामुळेही आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती व्यवस्थापन करता येणे शक्य होते. तसेच यामध्ये कुरिअरची सुविधा देण्यात आली आहे. म्हणजे आपण एखादी फाइल नेटवर्क नसतानाही हे अ‍ॅप असलेल्या व्यक्तीशी शेअर करू शकतो. या अ‍ॅपमध्ये माहिती काँप्रेस करून साठवली जाते यामुळे फोनमध्ये अधिक जाग उपलब्ध होणेही शक्य होते.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
Upcoming WhatsApp feature to tell you when someone was recently online will also show you a list of people
लास्ट सीन सोडा, आता व्हॉट्सॲप दाखवणार यादी; कोण, कधी ऑनलाइन आहे मिनिटांत कळणार
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र