प्रश्न – संकेतस्थळ सुरू करावयाचे असेल तर कसे करता येईल याची माहिती द्यावी. -सिया करमरकर
उत्तर – संकेतस्थळ सुरू करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही संकेतस्थळ कशासाठी आणि कोणत्या स्वरूपात सुरू करू इच्छिता हे तपासणे गरजेचे आहे. म्हणजे जर व्यावसायिक पातळीवर असेल तर तुम्हाला डॉमेन नाव उपलब्ध आहे की नाही इथपासून सुरू करावे लागेल. यासाठी तुम्ही व्यावसायिक संकेतस्थळ विकासकाचे मार्गदर्शन घेतलेले योग्य. संकेतस्थळ विकसित करण्यासाठी एचटीएमएल, मायएसक्यूएलसारख्या विविध संगणकीय भाषांची गरज पडते. या भाषा येणारे किंवा कुणी तंत्रज्ञानी तुमच्याकडे असेल तर यू टय़ुबवर उपलब्ध असलेल्या टय़ुटोरिअल्सवरूनही तुम्ही संकेतस्थळासाठी आवश्यक प्रोग्रामिंग करून ते विकसित करू शकता. जर तुम्हाला काही काळापुरते किंवा हौस म्हणून संकेतस्थळ बनवायचे असेल तर तुम्ही गुगल किंवा वर्डपोस्टसारख्या संकेतस्थळांची मदत घेऊ शकता. या संकेतस्थळांच्या साहाय्याने स्वत:चे संकेतस्थळ विकसित करणे तसे सोपे असते. यासाठी तुम्ही लॉगइन केल्यानंतर क्रिएट वेबसाइट हा पहिला पर्याय निवडावा लागतो. यानंतर तुम्ही त्या संकेतस्थळाचे नाव द्यायचे. हे नाव उपलब्ध आहे की नाही याची माहिती तातडीने तेथे येते. उपलब्ध असल्यास ओके म्हणून तुम्ही संकेतस्थळासाठी तेथे उपलब्ध असलेले टेंपलेट निवडू शकता. टेंपलेट निवडल्यानंतर त्यात माहिती, फोटो अद्ययावत करून तुम्ही सेव्ह केल्यावर संकेतस्थळ तयार होते. त्याचा पत्ता तुम्ही बाहेर कुणाला दिल्यावर त्यांना थेट ते संकेतस्थळ दिसेल.   –

 

IITM Pune Bharti 2024
Pune Jobs : IITM पुणे येथे नोकरीची संधी, आजच अर्ज करा, एवढा मिळणार पगार
pune marathi news, computer engineer young girl crime marathi news
विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाखांची फसवणूक
enforcement directorate contact with apple to check kejriwal s mobile
केजरीवाल यांचा मोबाइल तपासण्यासाठी ‘अ‍ॅपल’शी संपर्क; मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी ईडीचे पुढचे पाऊल  
TJSB Sahakari Bank recruitment for 2024
TJSB Sahakari Bank recruitment : टीजेएसबी बँकेत ‘या’ पदासाठी भरती! माहिती पाहा