उन्हाळा आला की, वातावरणातील पारा वाढत जातो. पण घरातील वातावरण नियंत्रित ठेवण्यासाठी घराघरांमध्ये वातानुकूलित यंत्र अर्थात एसीविषयी चर्चा सुरू होते. कोणत्या कंपनीचे एसी घ्यायचे इथपासून ते एसीची निवड कशी करायची इथपर्यंतचे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. याचसंदर्भात बाजारात सध्या उपलब्ध असलेले काही कंपन्यांच्या एसीचे पर्याय आणि ते निवडताना नेमकी कोणती काळजी घ्यायची याविषयी जाणून घेऊया.


सॅमसंगचे त्रिकोणी एसी

मोबाइलमध्ये आधिराज्य गाजवणाऱ्या सॅमसंग या कंपनीने टीव्ही, फ्रिज, अशी सर्वच उपकरणे बाजारात आणली आहेत. यात एसीचाही समावेश आहे. या कंपनीने नुकतेच त्रिकोणी आकाराचे एसी जागतिक बाजारात आणले आहेत. यामुळे घरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात एसीची हवा जाणे सोयीचे होते आणि एसीच्या थंडाव्याची मज्जा घेता येऊ शकते. यात वापरण्यात आलेल्या मोठय़ा पंख्यामुळे वातावरण नियंत्रणात ठेवण्याची क्षमता २६ टक्क्यांनी वाढते. या एसीमध्ये डिजिटल इन्व्हर्टर वापरण्यात आले आहे. यामुळे विजेचा वापर आतापर्यंतच्या सर्व एसींना लागणाऱ्या विजेपेक्षा ६० टक्केवीज कमी लागते. यामध्ये स्वयंचलित वातावरण नियंत्रण सुविधा देण्यात आली आहे. यातील फास्ट कूल पर्यायामध्ये आपली खोली कमी वेळात थंड होते. एकदा खोली थंड झाल्यावर आपोआप एसी कम्फर्ट कूल या पर्यायामध्ये जातो. यामुळेही वीज कमी लागत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. याचबरोबर मध्ये मध्ये आपोआप बंद आणि चालू होत असतो. यामुळे आपल्याला हाताने एसी बंद किंवा चालू करण्याची गरज भासत नाही. हा एसी लवकरच भारतीय बाजारात येणार आहे. या एसीची वाट पाहायची नसेल तर तुम्हाला याच कंपनीच्या विविध थ्री स्टार स्प्लिट एसींचाही पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये क्रिस्टल कोटिंग असलेल्या विविध रंगांच्या एसींचाही समावेश आहे. आपल्या घरातील रंगाला मॅचिंग असा पर्याय आपल्याला यामध्ये मिळू शकतो. हे एसी मल्टी जेट तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये तुम्ही ऑटो टायमर लावून ठेवू शकता. म्हणजे तुम्ही एकदा वेळ सेट केली की, त्या वेळात एसी सुरू होणार आणि त्याच वेळात बंद होणार. यामध्ये स्मार्ट सेव्हर वापरण्यात आला आहे. याशिवाय या एसीमध्ये ऑटो क्लीनचा पर्याय देण्यात आला आहे. यामुळे आपल्याला वारंवार एसी स्वच्छ करण्याची गरजही भासत नाही.
किंमत – टनानुसार २९ हजारापासून पुढे.


व्होल्टाज एसी

व्होल्टाज ही एसीमधील सर्वात जुनी आणि आघाडीची कंपनी मानली जाते. या कंपनीनेच सन १९८४ मध्ये सर्वप्रथम स्प्लिट एसी बाजारात आणले होते. त्या वेळी एसी म्हणजे श्रीमंतांची चन होती. आता एसी मध्यमवर्गीयांच्या घरातही पोहचू लागले आहेत. या कंपनीचे टू स्टार आणि थ्री स्टार स्प्लिट आणि िवडो एसी बाजारात उपलब्ध आहेत. टू स्टार एसीमध्ये कंपनीने अँटी डस्ट आणि नॅनो सिल्व्हर फिल्टरचा पर्याय दिला आहे. याचबरोबर यामध्ये सेल्फ टायमर, ऑटो रिस्टार्ट पर्याय देण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये स्लीप, टबरे, िस्वग, टायमर या सर्व गोष्टी रिमोट कंटोलवर देण्यात आल्या आहेत. यातील हवेचा प्रवाह तिरक्या रेषेत देण्यात आला आहे, जेणेकरून हवा घराच्या कानाकोपऱ्यात पोहचू शकते. तर थ्री स्टार एसीमध्ये अँटी डस्ट आणि नॅनो सिल्व्हर फिल्टरबरोबरच अॅक्टिव्ह कार्बन, सिल्व्हर आयन, व्हिटॅमिन सी असे विविध प्रकार फिल्टरमध्ये देण्यात आले आहेत. यामध्येही सेल्फ टायमर, ऑटो रिस्टार्ट पर्याय देण्यात आले आहे. याशिवाय यामध्ये स्लीप, टबरे, िस्वग, टायमर या सर्व गोष्टी रिमोट कंट्रोलवर देण्यात आल्या आहेत.
किंमत – २९४९० पासून पुढे


शार्पचा इन्व्हर्टर एसी

शार्प या कंपनीनेही सॅमसंगसारखा इन्व्हर्टर एसी बाजारात आणला आहे. या स्प्लिट एसीमध्ये पंख्याच्या वेगाला तीन प्रकारच्या सेटिंग देण्यात आल्या आहेत. यात ऑटो रिस्टार्ट फंक्शन देण्यात आला आहे. याचे वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये आपल्याला डाय मोडचा पर्याय देण्यात आला आहे. ज्याचा फायदा आपल्याला हवेत मॉइश्चर जमा झाल्यावर करता येऊ शकतो. यामध्ये आपल्याला हवेचा झोत आडवा ठेवता येऊ शकतो. याशिवाय यामध्ये इन्व्हर्टर कंट्रोल दिल्यामुळे विजेची बचतही होते. हा एसी कमी व्होल्टेजवर चालविण्याचा पर्यायही यामध्ये देण्यात आला आहे.
किंमत – २९००० पासून पुढे.


व्हिडीओकॉनचे एमपीसीएस तंत्रज्ञान

मल्टी पॉइंट कूिलग सिस्टिम (एमपीसीएस) या नवीन तंत्रज्ञानावर आधारित ३२ प्रकारचे एसी व्हिडीओकॉन या कंपनीने बाजारात आणले आहेत. एसी क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी व्हिडीओकॉनची ही नवी रेंज कंपनीला मदत करू शकणार आहे. या नवीन तंत्रज्ञानामुळे अगदी कमी वेळात तुमची खोली थंड होऊ शकणार आहे. यातील अत्याधुनिक सíकट डिझाइनमुळे खोली थंड होण्याचा वेग पूर्वीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. यासाठी कंपनीने शहरी आणि निमशहरी ग्राहकांना लक्ष्य केले आहे. या नवीन तंत्रज्ञानावर आधारित स्प्लिट आणि िवडो अशा दोन्ही प्रकारचे एसी तीन रंगांमध्ये बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये देण्यात आलेल्या नवीन तंत्रज्ञानामुळे खोली लवकर गार झाली की तेवढी वीज आपली आपोआप कमी वापरली जाते.
किंमत – २७४९० पासून पुढे

बाजारात नव्या तंत्रज्ञानाला पसंती
एसी निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात. सध्या बाजारात कोणत्या प्रकारच्या एसीची मागणी आहे. याबाबत व्हिडीओकॉन कंपनीच्या एसी विभागाचे सीओओ संजीव बक्षी यांनी मांडलेले अभ्यासात्मक विचार.
शहरांमध्ये वाढणारा मध्यमवर्गीयांची वाढती संख्या आणि छोटी कुटुंब यामुळे एसीची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला आरोग्यदायी आणि आरामशीर जीवन हवे असते. यामध्ये एसी महत्त्वाची भूमिका बजावत असल्यामुळे पुन:पुन्हा एसीची खरेदी होताना दिसते. सध्या बाजारात आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या तरुण खरेदीदारांची संख्या वाढली आहे. या तरुणांची पहिली पसंती एसीलाच असते. सरकारच्या बीईई स्टार रेटिंग धोरणामुळे सन २०१४ मध्ये विजेची बचत करणारे एसी मार्केटमध्ये आले आहेत. यामुळे देशांतर्गत संशोधन आणि उत्पादनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे देशातील आयात कमी झाली आहे. व्हिडीओकॉन कंपनीनेही एसीमध्ये विविध संशोधन सुरू केले आहे.
बाजारात स्प्लिट एसीची मागणी खूप जास्त आहे. ज्यांच्याकडे जुने िवडो एसी आहेत ती मंडळीही स्प्लिट एसीकडे वळत आहेत. सध्याच्या एसीच्या विक्रीमध्ये ८० टक्के स्प्लिट एसीची विक्री आहे. एसी विकत घेतलेल्यानंतर त्यावर होणारा खर्च, सेवेची रक्कम यामुळे लोक एमपीसीएस सारख्या नवीन तंत्रज्ञान असलेल्या उत्पादनांना अधिक पसंती देतात.