नवीन वर्ष होऊन सहा महिने उलटून गेले दर महिन्याला काही ना काही नवीन गॅजेट किंवा तंत्रज्ञान आपल्यासाठी उपलब्ध होत आहेतच. गेल्या सहा महिन्यांत बाजारात आलेल्या काही महत्त्वपूर्ण गॅजेट्सबाबत जाणून घेऊयात.

ब्लॅकबेरीचा स्वस्त फोन
ब्लॅकबेरीने नुकताच आपला नवा आणि महत्त्वाचं म्हणजे खिशाला परवडणारा झेड३ स्मार्टफोन बाजारात आणलाय. यामध्ये १.३ जीएचझेड क्वाल्कॉम ४०० प्रोसेसर देण्यात आला आहे. शिवाय या फोनमध्ये १.५ जीबी रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये इंटरनल स्टोअरेज ८ जीबीचे असून मायक्रो एसडी कार्डचीही सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये ब्लॅकबेरी १० ही ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. याचा कॅमेरा पाच मेगापिक्सेलचा असून त्याला एलईडी फ्लॅशचीही सुविधा देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा हा १.१ मेगापिक्सेला आहे. यामध्ये एचडी व्हिडीओ रेकॉर्डिगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय फोनमध्ये थ्रीजी, वायफाय, ब्लू टय़ूथ, जीपीएस आदी सुविधाही देण्यात आल्या आहेत. याची बॅटरी २५०० एमएएचची आहे.

असूसचा झेन फोन
असूस या मदरबोर्ड बनविणाऱ्या कंपनीने झेन फोन आणि फोनपॅड बाजारात आणला आहे. झेनफोन या मालिकेमध्ये चार ते सहा इंची स्क्रीनचे फोन्स देण्यात आले आहे. याशिवाय फोनपॅड७ हाही बाजारात आणला आहे. या नीवीन स्मार्टफोनमध्ये सुदंर आयपीएस डिस्प्ले, इंटेलचा अ‍ॅटम क्वाड थ्रेड हायपर थ्रेडिंग तंत्रज्ञानासह प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा कॅमेरा हा १३ मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे. झेलफोन ५ आणि सहा मध्ये पेनटच आणि ग्लोव्हटच तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे ग्लोव्ह घातेलल्यांनाही फोनचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये आठ जीबी, १६ जीबी इंटरनल मेमरीचे फोन्सही देण्यात आले आहेत.

झेलफोन मालिकेतील फोन्सची किंमत –
झेलफोन ४ – ५,९९९ रुपये.
झेलफोन ५ – ९,९९९ रुपये.
झेलफोन ६ – १६,९९९ रुपये.

नोकिया लुमिया ६३०
लुमिया ६३० हा फोन िवडोज ८.१ या नव्या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत पहिलाच मोबाइल असणार आहे. या फोनमध्ये इतर सर्व सुविधांबरोबरच आपल्या आरोग्यावर नजर ठेवणारे एक विशेष सन्सर आणि अ‍ॅपही देण्यात आले आहे. आरोग्यावर नजर ठेवण्यासाठी सध्या बाजारात अनेक गॅजेट उपलब्ध आहेत. हे सर्व गॅजेट मोबाइलशी जोडले गेले की आपल्याला आपण दिवसभरात किती चाललो, आपण किती खायला हवे किंवा दिवसभर खाण्यामुळे किती कॅलेजरीज मिळाल्या आहेत, याबाबत माहिती मिळत असते. यासाठी आपल्याला हे गॅजेट वेगळे बाळगावे लागते. पण लुमिया ६३०मध्ये देण्यात आलेल्या सेन्सर मुळे आपण मोबाइल खिशात ठेवला की तो आपोआप आपल्या आरोग्यवर नजर ठेवून असतो. याच एक फिटनेस अ‍ॅप दिले आहे. या अ‍ॅपद्वारे आपल्याला आपला रिपोर्ट सातत्याने मिळत असतो. िवडोज ८.१ या नवीन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालणारा हा पहिलाच मोबाइल असून यामध्ये मेमरी कार्डच्या मदतीने आपण १२८ जीबीपर्यंत मेमरी वाढवू शकणार आहोत. बारा हजारपेक्षा कमी किंमतीच्या फोनमध्ये एवढी मेमरी देणारा हा एकमेव फोन असणार आहे.

वायफाय डोंगल्स
फोन्सबरोबरच डोंगल्सही नवे बाजारात आले आहेत. एअरटेल या कंपनीने नुकताच वायफाय डोंगल बाजारात आणला आहे. या पाठोपाठ आयडियानेही वायफाय डोंगल्स बाजारात आणले आहेत. हे डोंगल्स घरगुती किंवा कार्यालयामध्ये वापरता येणार आहेत. २१.६ एमबीपीएस वेग असलेले थ्रीजी केनेक्टिव्हिटीयामध्ये आपल्याला वापरता येणार आहे. यामुळे आता आपल्याला घरांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये वायफाय वापरण्यासाठी वायफाय राऊटर्स घ्यायची गरज भासणार नाही. त्या ऐवजी तुम्ही हे डोंगल्स वापरू शकता.

स्पाइसचा स्टेलर
मोबाइल निर्माता कंपनी ’स्पाइस’ने क्वेर्टी की-पॅड असलेला टच अ‍ॅण्ड टाइप स्मार्टफोन ’स्पाइस स्टेलर ३६०’ बाजारात आणला आहे. या फोनचा लूक ब्लॅकबेरीच्या स्मार्टफोन सारखा आहे. विशेष म्हणजे टच अ‍ॅण्ड टाइप असलेल्या स्मार्टफोनला यूजर्सकडून मोठी मागणी आहे. ब्लॅकबेरीने यापूर्वी टच अ‍ॅण्ड टाइप स्मार्टफोन बाजारात आणला होता.  मात्र, ब्लॅकबेरीचा हा मिड-रेंज स्मार्टफोन सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही. टच अ‍ॅण्ड टाइप फोन बाजारात कमी असल्याने ’स्टेलर ३६०’ला यूजर्सकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा स्पाइस कंपनीला आहे. टच अ‍ॅण्ड टाइप फीचर्स ’कार्बन’ तसेच ’इंटेक्स’च्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहेत. ’स्पाइस स्टेलर ३६०’ला या कंपन्यांच्या टच अ‍ॅण्ड टाइप फीचर्स असलेल्या स्मार्टफोनशी स्पर्धा करावी लागण्याची शक्यता आहे.
या फोनची किंमत ५९९९ रूपये इतकी आहे.