मायक्रोसॉफ्टने विंडोज आठ ही ऑपरेटिंग सिस्टिम बाजारपेठेत दाखल केल्यानंतर अनेकांची त्या बद्दल असलेली उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सुरुवातीच्या टप्प्यात बाजारपेठेत येऊन दाखल झाले ते विंडोज ८ असलेले लॅपटॉप्स आणि टॅब्लेटस्. पण त्याची किंमत बऱ्यापैकी होती आणि ते बहुतांश ‘ऑन द गो’ अशा पिढीसाठी होते. त्यानंतर अनेकांना असे वाटू लागले होते की, विंडोज ८ असलेला डेस्कटॉप पीसी यायला हवा. ती गरज आणि इच्छा आता डेलने पूर्ण केली आहे. मुळात विंडोज ८ही सतत अपडेटेड आणि अपडेटस् देणारी अशी लाइव्ह सिस्टिम आहे. त्यामुळे तिच्या वापरच्या क्षमता लक्षात घेऊन तशी मशीनची रचना त्यानुसार असणे आवश्यक आहे. हे सारे लक्षात घेऊन डेल या प्रसिद्ध कंपनीने विंडोज ८ च्या मालिकेत डेल इन्स्पिरेशन २३३० हा डेस्कटॉप पीसी बाजारात आणला आहे. हा ऑल इन वन प्रकारातील टच स्क्रीन पीसी आहे. विंडोज आठसाठी त्यात थर्ड जनरेशन इंटेल आय सेव्हन प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे डेस्कटॉपवर विंडोज आठचा वेगळा अनुभव घेणे शक्. झाले आहे. यासोबत एचडी ऑडिओ युनिटही असून वेव्ह मॅक्स ऑडिओथ्री स्पीकर्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ देखणेपणाच नव्हे तर त्याला सुश्राव्यतेचीही जोड मिळाली आहे.
भारतीय बाजारपेठेतील किंमत : रु. ४५,९९०/-