अलीकडेच जगात अभिनव कल्पना मांडणाऱ्या काही व्यक्तींची निवड रोलेक्स पुरस्कारासाठी झाली. लंडनच्या रॉयल सोसायटीकडून दिला जाणारा हा पुरस्कार निश्चितच नवीन कल्पनांना बळ देणारा आहे यात शंका नाही. एकूण पाच जणांना या वर्षी गौरवण्यात आले असून, त्यात भारताच्या नीती कैलाश यांचा समावेश आहे. नीती कैलाश या भारतात कर्णबधिर मुलांच्या उपकरणांमध्ये सुधारणा घडवण्याचे काम करीत आहेत. त्यासाठीच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. नीती कैलाश यांचा जन्म २२ एप्रिल १९८५ मध्ये झाला. अहमदाबाद येथे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन टेक्नॉलॉजी येथून त्यांनी प्रॉडक्ट डिझाइनचा डिप्लोमा पूर्ण केला. नंतर त्यांनी कॅलिफोíनयातील आर्ट सेंटर कॉलेज ऑफ डिझाइन येथून औद्योगिक डिझाइन या विषयात मास्टर्स पदवी घेतली. आरोग्याच्या विषयावर त्यांनी अभ्यास करताना अल्ट्रासाऊंड मशीन विकसित केले. २०११ मध्ये त्यांनी पॅरिसमध्ये इनसीड येथे शिक्षण घेतले. नंतर स्वित्र्झलड येथे नेस्ले कंपनीत डिझायनर म्हणून काम केले. अमेरिकेत डिझाइन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केले. टीव्हीएस मोटार कंपनीतही त्यांनी काम केले. इलेक्ट्रिक हायब्रीज स्कूटर या त्यांच्या निर्मितीला डिझायिनगचा पुरस्कार मिळाला.  त्या अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट या संस्थेत शिकल्या असून, त्यांचे सहकारी जेव्हा वेगळय़ा उत्पादनांवर काम करीत होते तेव्हा त्यांनी मात्र आरोग्याशी संबंधित डिझाइिनगचे काम हाती घेतले. त्यांनी भारतातील सर्व रुग्णालयांतील बेडपॅन्सचे डिझाइन तयार केले आहे. वृद्ध व आजारी व्यक्तींना बेडपॅनचा उपयोग असतो. अगदी आपल्याकडच्या खुच्र्याचे डिझाइन बघितले तरी ते फारसे चांगले नसते. त्यात संगणकावर काम करताना आराम कधीच मिळत नाहीत किंवा मणक्याची दुखणी लागतात, म्हणून डिझाइन महत्त्वाचे आहे.

बेडपॅन प्रकल्प
नीता यांचे पती नितीन सिसोदिया यांनी त्यांचे बेडपॅन प्रकल्पाचे स्वप्न साकार केले. नीता यांनी त्यांच्या सोहम इनोव्हेशन प्रयोगशाळेत त्याची रचना तयार केली होती, पण उत्पादन महत्त्वाचे होते. नितीन हे अभियंता आहेत, त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प तडीस नेला.

कर्णबधिर मुलांची तपासणी
आपल्याकडे वर्षांला एक लाख बालके कर्णबधिर जन्माला येतात, पण ते कर्णबधिर आहेत याची चाचणी लगेच शक्य होत नाही. नीता कैलाश यांच्या मते असे कर्णबधिरत्व ओळखणारी उपकरणे असली तरी ती हाताळण्यास कौशल्य प्राप्त असलेल्या व्यक्ती लागतात. आम्ही कर्णबधिरत्वाचे निदान करण्याचे जे उपकरण शोधले आहे त्यात विशेष कौशल्यांची आवश्यकता नाही. कर्णबधिरतेमुळे सहा महिन्यांच्या बाळाचे श्रवण, बोलणे व बोधन या प्रक्रियांवर परिणाम होतो, त्यामुळे कर्णबधिरता लगेच ओळखता आली पाहिजे. त्यामुळे पुढे बोलण्याचे कौशल्य जाते ते टळू शकते.

डिझाइनच्या मदतीने लोकांचे प्रश्न सोडवता येतात व समाजावर मोठा प्रभाव टाकता येतो. भारतात लिंबू पिळण्याचे पुढच्या पिढीतील चांगले यंत्र येईल काय, असा माझा सवाल आहे.               
नीती कैलाश

कर्णबधिरत्व तपासणारे उपकरण
नीती यांच्या मत्रिणीचा मुलगा कर्णबधिर निघाला व ते उशिरा लक्षात आले. तेव्हा नीती यांना यातले धोके कळले. त्यांना यातूनच लहान बाळांचे कर्णबधिरत्व तपासण्यासाठी यंत्र तयार करण्याची कल्पना सुचली.
या यंत्रात तीन इलेक्ट्रोड हे बाळाच्या डोक्याला लावले जातात व ते मेंदूच्या ऑडिटरी सिस्टीमकडून येणारे संदेश टिपतात. ऑडिटरी सिस्टीमला प्रेरणा देण्याचे काम इलेक्ट्रोडच करीत असतात. जर मेंदूने अशा प्रेरणेला प्रतिदाद दिला नाही, तर मुलाला कर्णबधिरत्व आहे असे समजतात. या उपकरणात बॅटरीचा वापर केलेला आहे. त्यात शरीराला कुठे छेद द्यावा लागत नाही. या यंत्रणेचे पेटंट घेतले आहे. ते वापरण्यास सोयीचे आहे. त्यात इतर आवाज आपोआप गाळले जातात. भारतातील रुग्णालयांच्या परिसरात अजिबात शांतता नसते, त्यामुळे भलतेच आवाज त्यात मिसळू शकतात. २०१६ पर्यंत हे उपकरण विक्रीस आणण्याचा त्यांचा इरादा असून, पहिल्या वर्षी २ टक्के मुलांचे कर्णबधिरत्व तपासले जाईल. ग्रामीण भागात घरोघरी जाऊन बाळांची तपासणी करता येईल. लहान बाळांची नेत्रक्षमता तपासण्याचे उपकरण तयार करण्याचाही त्यांचा मानस आहे.
भारतीयांना उद्योजक होण्यासाठी फार प्रेरणा लागत नाही, जेव्हा आयटी बूम आपण पाहिली, इंटरनेट कॅफे कावळय़ाच्या छत्र्यांसारखे उगवले तेव्हा उद्योजक भराभर पुढे आले, पण वैद्यक जगतात उद्योजकता तेही किफायतशीर दरात करायला फार कमी लोक पुढे येतात.