दी नेचर लव्हर्स मालाड या संस्थेमार्फत २५ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान ‘राजगड प्रदक्षिणा’चे आयोजन करण्यात आले आहे. राजगड ही शिवाजी महाराजांची राजधानी आहे. गडप्रदक्षिणा म्हणजे या गडाला तळातून विविध गावांतून, जंगल-झाडीतून फेरी मारली जाणार आहे. संस्थेमार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे यंदाचे हे २९वे वर्ष आहे. या उपक्रमात राजगड प्रदक्षिणेचा साहसी अनुभव तर आहेच, पण इतिहासाचे दर्शन देखील घडवले जाणार आहे.  इतिहास अभ्यासक अप्पा परब व भगवान चिले यांच्या मार्गदर्शनाखाली गडाचे चहूअंगाने दर्शन आणि शिवकाळावरील व्याख्याने असा हा साहस आणि इतिहासाची सांगड घालणारा उपक्रम आहे. इतिहासकालीन
पारंपरिक पोशाखातील मिरवणूक, ढोल-दिवटय़ांच्या सोबतीने पारंपरिक खेळ अशा अनोख्या कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी रचना कुलकर्णी (९८२१३४२७०२), कक्षा खांडेकर (९८६९५३०१३१) यांच्याशी संपर्क साधावा.