ताडोबा हेमलकसा भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. आर्द्र-पानगळीच्या या जंगलात बांबू, ऐन, मोह, कांडेळ, धावडा, काटेसावर आदी प्रमुख वृक्ष आहेत. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५० हून प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. अशा या जंगलाच्या अभ्यास सहलीचे ‘वसुंधरा’तर्फे आयोजन केले आहे. २१ ते २८ जानेवारी या कालावधीत जाणाऱ्या या सहलीमध्ये आनंदवन, हेमलकसा, सोमनाथ, सेवाग्राम आणि पवनार आदी प्रकल्पांनाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी शिल्पा (९९७०१८०३१३) यांच्याशी
संपर्क साधावा.

रायरेश्वर भटकंती
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या ३० नोव्हेंबर रोजी रायरेश्वर येथे भटकंतीचे आयोजन केले आहे. या सहलीत रायरेश्वर पठाराची भौगोलिक आणि ऐतिहासिक ओळख करून दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.

श्रीलंकेच्या जंगलात
भारताचा शेजारी असलेला श्रीलंका देश हा जैवविविधतेने नटलेला देश आहे. या देशातील विलापट्टू हे सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे. या जंगलात बिबटे, हत्ती, अस्वल असे ३५ प्रकारचे सस्तन प्राणी पाहण्यास मिळतात. ‘सिंघराजा’ या राखीव जंगलाचा तर ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे. या जंगलात १४७ प्रकारचे पक्षी पाहण्यास मिळतात. ‘विहंग’तर्फे येत्या २८ मार्च ते ३ एप्रिल २०१५ दरम्यान या जंगलाच्या भटकंतीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी मकरंद जोशी (९८६९३०४०५३) यांच्याशी संपर्क साधावा.

ताडोबा जंगल भ्रमंती
ताडोबा हे वाघांसाठी प्रसिद्ध असलेले जंगल आहे. वाघांबरोबरच बिबटय़ा, सांबर, चितळ, वानर, अस्वल, गवा, रानडुक्कर, नीलगाय आदी प्रमुख प्राणी इथे आढळतात. याशिवाय २५०हून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचे इथे दर्शन घडते. ‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे ४ ते ६ फेब्रुवारी २०१५ दरम्यान या जंगलाच्या अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – – abhijit.belhekar@expressindia.com