धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com

कच्छची निसर्ग भ्रमंती
‘जीविधा’ संस्थेतर्फे येत्या ११ ते १६ फेब्रुवारी २०१५ दरम्यान कच्छ रणाच्या भ्रमंतीचे आयोजन केले आहे. ‘लिटिल रण ऑफ कच्छ’ नावाने ओळखला जाणारा हा भाग अहमदाबादपासून ११० किलोमीटर अंतरावर आहे. हे एक ‘पक्षितीर्थ’ म्हणून ओळखले जाते. या भागात गोडय़ा पाण्याची तळी, खाडीचे खारट पाणी अशा पाणथळीच्या अनेक जागा पाहावयास मिळतात. या पाणथळींवर येणारे हजारोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो ऊर्फ रोहित पक्षी, क्रेन्स, विविध जातीची बदके, बगळे, करकोचे, घुबड, गरुड आढळतात. हा प्रदेश संरक्षित अभयारण्य आहे. इथे पक्ष्यांशिवाय रानगाढवे, रानडुक्कर, नीलगाय, रानमांजर, वाळवंटी कोल्हा आदी प्राणीही दिसतात. या जंगलभ्रमंतीच्या जोडीनेच मोढेरा येथील सूर्यमंदिर आणि पाटण येथील ‘राणी की बाव’ या सातमजली विहिरीलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी राजीव पंडित (९४२१०१९३१३) यांच्याशी संपर्क साधावा.

तोरणा भ्रमंती सायकलवर
स्पदंन संस्थेतर्फे येत्या १३ आणि १४ डिसेंबर रोजी पुणे ते तोरणा सायकल भ्रमंतीचे आयोजन केले आहे. सायकल मोहिमेनंतर तोरणा किल्ला चढणे या उपक्रमात समाविष्ट आहे. अधिक माहितीसाठी निनाद पंडित (९०२२३६४९१९) यांच्याशी संपर्क साधावा.

विजापूर, बदामी, हंपी भ्रमंती
‘निसर्ग दर्शन’ तर्फे येत्या २५ ते २९ डिसेंबर रोजी कर्नाटकातील विजापूर, बदामी, हंपी, होस्पेट परिसरातील ऐतिहासिक स्थलदर्शन सहलीचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी चंद्रशेखर शेळके (९८५०२६२६५७) यांच्याशी संपर्क साधावा.

मोराची चिंचोली
पुण्याच्या जवळ ५५ किलोमीटर अंतरावर मोराची चिंचोली नावाचे गाव मोरांसाठी प्रसिद्ध आहे. या पेशवेकालीन गावच्या लोकसंख्येएवढीच मोरांची संख्या आहे. याशिवाय वृक्षराजी मोठय़ा संख्येने आहे. यामध्ये चिंचेची झाडे मोठय़ा संख्येने आहेत. या आगळय़ा-वेगळय़ा गावात निसर्ग अभ्यास सहलीचे ‘निसर्ग टूर्स’तर्फे १० ते ११ जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. या सहलीमध्ये मोराची चिंचोलीबरोबरच निघोज येथील कुकडी नदीतील रांजणखळगे आणि रांजणगाव गणपतीला भेट दिली जाणार आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी
संपर्क साधावा.